नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बल्गेरियातील बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणी दरवर्षी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. भविष्यकार बाबा वेंगा यांनी २०२३ साठी देखील अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यांनी २०२२ साठी वर्तवलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. २०२३ संपायला अजून एक महिना शिल्लक आहे. या काळात पृथ्वीवर मोठं संकट कोसळू शकतं असं भाकित बाबा वेंगा यांनी केलं आहे.
२०२३ संपण्यापूर्वी पृथ्वीवर एक आण्विक आपत्ती येईल, अशी धक्कादायक भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी केली आहे. बाबा वेंगा यांनी अमेरिकेच्या ९/११ हल्ल्याचं कथित भाकीत खरं ठरलं होतं असं सांगितलं जातं. आता २०२३ संपण्यापूर्वी मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या स्फोट होईल, ज्यामुळे विषारी ढग आशियावर स्थिर होतील, असा दावा बाबा वेंगाच्या भविष्यवाणीत करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, बाबा वेंगा यांचा जन्म व्हेंजेलिया पांडेवा दिमित्रोव्हा झाला होता. एका मोठ्या वादळात वयाच्या बाराव्या वर्षी त्यांची दृष्टी अचानकपणे गेली होती. काही दिवसांनंतर जेव्हा तिच्या कुटुंबीयांना ती सापडली. या बल्गेरियन महिलेचा मृत्यू अनेक दशकांपूर्वी झाला होता, पण तिच्या मृत्यूनंतर अनेक अंदाज खरे ठरले आहेत. आता, तिचे काही अनुयायी असा दावा करतात की, बाबा वेंगा यांनी २०२३ मध्ये मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या स्फोटाचा इशारा दिला होता. ही भविष्यवाणी खरी ठरेल
तिसरे महायुद्ध
२०२३ मध्ये तिसरं महायुद्ध होऊन मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होईल आणि पैशाचं देखील नुकसान होईल, अशी भविष्यवाणी बाबा वेंगाने केली होती. ही भविष्यवाणी खरी ठरल्याचं मानलं जात आहे. कारण, २०२३ मध्ये तिसरं महायुद्ध जरी सुरु झालं नसलं तरी एकीकडे रशिया युक्रेन युद्ध आणि दुसरीकडे इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे हजारो नागरिकांचा बळी गेला असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही झालं आहे. ही युद्ध पुढे तिसऱ्या महायुद्धाचं रूप घेऊ शकतात, असं बाबा वेंगा यांनी भाकित केले आहे.
कोण आहे बाबा वेंगा?
बाबा वेंगा यांची ‘बाल्कनच्या नॉस्ट्राडेमस’ अशी ओळख आहे. वयाच्या १२ व्या वर्षी बाबा वेंगा यांची दृष्टी गेली. बाबा वेंगा यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९११ रोजी झाला. त्यांचं खरं नाव ‘वांगेलिया पांडेवा गुश्तारोवा’ होतं. जे बाबा वेंगा म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी ९/११ चा दहशतवादी हल्ला, ब्रेक्झिट यासह अनेक भविष्यवाणी केली होती, जी खरी ठरली.