बांगलादेशचे टीम इंडियासमोर २६६ धावांचे आव्हान

0
37

कोलंबो ः वृत्तसंस्था

आशिया चषक २०२३ चा शेवटचा सुपर-४ सामना भारत आणि बांंगलादेश यांच्यात कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात असून भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ८ बाद २६५ धावा केल्या. शाकिब अल हसनने कर्णधारपदाला साजेशी अशी खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येनजीक नेले.
प्रथम फलंदाजी करताना बांंगलादेश संघाने आठ विकेट गमावून २६५ धावा केल्या. कर्णधार शाकिब अल हसनने सर्वाधिक ८० धावांचे योगदान दिले. तौहीद हृदयॉयने ५४ आणि नसूम अहमदने ४४ धावा केल्या. भारताकडून शार्दुल ठाकूरने तीन आणि मोहम्मद शमीने दोन विकेट्स घेतल्या. प्रसिद्ध कृष्णा, अक्षर आणि जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
अष्टपैलू रविंद्र जडेजा याच्यासाठी बांगलादेशविरुद्धचा हा सामना महत्वाचा ठरला. जडेजाने आपल्या २०० एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट्स पूर्ण केल्याच, पण एका खास विक्रमात कपिल देव यांच्या पावलावर पाऊल टाकले.
अष्टपैलू रविंद्र जडेजा याने बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात शमीम हुसेन याला पायचीत पकडले. बांगलादेशच्या डावातील ३५व्या षटकात त्याला ही विकेट मिळाली. वन डे क्रिकेटमधील जडेजाची ही २०० वी विकेट होती. अष्टपैलू जडेजाने फलंदाज म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८१ सामन्यांमधील १२३ डावांमध्ये २५७८ धावा केल्या आहेत. माजी दिग्गज कपिल देव यांच्यानंतर जडेजा केवळ दुसरा भारतीय खेळाडू आहे, ज्याने वन डे क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून २००० धावा आणि गोलंदाजी करताना २०० विकेट्स घेतल्या आहेत. कपिल देव यांनी आपल्या वन डे कारकिर्दीत २२५ सामने खेळले यापैकी २२१ सामन्यांमध्ये त्यांना २५३ विकेट्स मिळाल्या तर फलंदाजी करताना ३७८३ धावा केल्या.
तिलक वर्माचे वनडेमध्ये पदार्पण
तत्पूर्वी बांगलादेश आणि भारत यांच्यातील सामन्यासाठी टीम इंडियात मोठे बदल करण्यात आले असून त्याचसोबत तिलक वर्माला भारताकडून वनडेमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आहे.रोहित शर्माकडून त्याला पदार्पण कॅप मिळाली आहे.रोहित शर्माने संघात पाच बदल करण्यात आले आहेत. तिलक वर्माने वनडेमध्ये पदार्पण केले आहे.मोहम्मद शमी,शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा सहित सूर्यकुमार यादवलाही या सामन्यात संधी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here