केळी उत्पादक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी व्हीआर कोड जनरेट करावा

0
6

जळगाव : प्रतिनिधी

सी.एम.व्ही.रोगामुळे नुकसानग्रस्त जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी लवकरच सीएससी केंद्रावर केवायसी करून व्हीआर कोड जनरेट करावा असे आवाहन खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केले आहे.
कुकुंबर मोझॅक व्हायरस रोगामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी खासदार श्र रक्षाताई खडसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी कुकुंबर मोझॅक व्हायरस रोगामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी केंद्रावर आपली केवायसी करून व्हीआर कोड जनरेट करावयाचा आहे. केवायसी व व्हीआर कोड मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या कृषी विभागामार्फत मागविण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळ ेयांनी खासदार रक्षाताई खडसे यांना दिली. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांनी तत्काळ आपल्या जवळच्या सीएससी केंद्राला भेट देऊन आपली माहिती अद्यायवत करून घ्यावी, असे आवाहन खासदार रक्षाताई खडसे यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here