बाळासाहेब दामोदर यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

0
9

मलकापूर : प्रतिनिधी
नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा मलकापूर-नांदुरा विधानसभा क्षेत्रात आपल्या सामाजिक कार्याने सदैव अग्रेसर बाळासाहेब दामोदर यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या अकोला येथील यशवंत भवन येथे प्रत्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह नुकताच प्रवेश केला. त्यांच्यासोबत अनेक मुस्लिम बांधवांनीही प्रवेश केला. त्यामध्ये प्रामुख्याने मलकापूर येथील उद्योगपती अशपाक खान, अफसर खान अनिस खान यांचा समावेश आहे.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा प्रभारी प्रदीप वानखेडे, जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे, जिल्हा महासचिव अतिश खराटे, ॲड. सदानंद ब्राह्मणे, जिल्हा उपाध्यक्ष भगवान इंगळे, गणेश वानखेडे जिल्हा सहसचिव, प्रल्हाद इंगळे, वसंत तायडे जिल्हा संघटक, अजबराव वाघोदे तालुका अध्यक्ष नांदुरा, अनिल तायडे तालुका सदस्य, विलास काळे तालुका उपाध्यक्ष मलकापूर, नांदुरा बाजार समितीचे संचालक प्रवीण भिडे आदी उपस्थित होते.
राजकीय समीकरणांवर प्रभाव पडणार
आगामी निवडणुकांमध्ये या प्रवेशामुळे नक्कीच राजकीय समीकरणांवर प्रभाव पडणार आहे. बाळासाहेब दामोदर यांनी गेली पंचवीस वर्षे टाकळी येथील ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंचपदी राहिलेले आहे. नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पदही त्यांनी भुषविलेले आहे. गेल्या २५ वर्षात राजकीय घौडदौड करत बाळासाहेबांचा प्रवास हा थक्क करणारा आहे. समाजातील प्रत्येक स्तरात असलेल्या त्यांचा चाहता वर्ग आहे. सर्व जाती धर्मांमध्ये त्यांच्याबद्दल कमालीची आपुलकी दिसून येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here