सेवा हक्क कायद्यानुसार वीज ग्राहकांना सेवा देण्याच्या सूचना जळगाव (प्रतिनिधी) – जनतेला विविध नागरी सेवा विहित कालावधीत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने सेवा हक्क कायदा २०१५ अंमलात आणला आहे. महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश महावितरण कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी दिले. सेवा हक्क पंधरवडानिमित्ताने महावितरणकडून विविध सेवा वीज ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हयगय करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. वीज ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरण पोर्टल सुरू केले आहे. यातून प्राप्त तक्रारींचे निराकरण विहित कालावधीत करण्यात येणार आहे. या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी केले. बैठकीत कल्याण…
Author: Vikas Patil
जिल्ह्यातील १० पोलिसांना महासंचालक सन्मानचिन्ह जळगाव (प्रतिनिधी) – उत्कृष्ट कामगिरीसाठी जिल्ह्यातील १० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे. सोमवारी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी ही घोषणा केली. पोलिस दलात उत्तम कामगिरीबद्दल हे सन्मानचिन्ह दिले जाते. राष्ट्रपतींच्या पोलिस पदक, शौर्य पदकानंतर ही घोषणा केली जाते. सन २०२४ च्या महासंचालक सन्मानचिन्ह पदकाची यादी जाहीर झाली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील १० जण आहेत. सहायक पोलिस निरीक्षक शामकांत पाटील, जगन्नाथ पाटील, हवालदार रमेश कुमावत, हरिश कोळी, जितेंद्र पाटील, गोरखनाथ बागुल, विनोद पाटील, दिलीप कुलकर्णी, आशिष चौधरी व पोलिस शिपाई जागृती काळे यांचा समावेश आहे.
जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचा उद्या शुभारंभ जळगाव (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय विभागांतर्गत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचा शुभारंभ १ मे रोजी सकाळी करण्यात येणार आहे. उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय सामाजिक न्याय भवन, येथून कार्यान्वित होणार असून दिव्यांग व्यक्तींना एकत्रित सुविधा उपलब्ध होणार आहेत. जिल्हास्तरीय कार्यालये स्वतंत्रपणे सुरु करण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता यांच्याकडे त्यांच्या पदाचा कार्यभार सांभाळून जिल्हा दिव्याग सक्षमीकरण अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार तात्पुरता सोपविण्यात आला आहे. जळगाव जिल्हयाकरीता समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, दिव्यांग कल्याण विभागातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता माधुरी भागवत यांच्याकडे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण…
केंद्र सरकार जातीनिहाय जनगणना करणार नवी दिल्ली (न्युज नेटवर्क)- केंद्र सरकार जातीनिहाय जनगणना करणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी निर्णयाची माहिती दिली आहे. कॅबिनेट बैठकीनंतर वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. स्वतंत्र भारतात १९५१ साली पहिली जनगणना करण्यात आली होती. २०११ साली यूपीए सरकारच्या काळात अखेरची जनगणना झाली होती. २०२१ मध्ये पुन्हा ही जनगणना करणे अपेक्षित होते. मात्र, केंद्र सरकारने जनगणना केली नाही. परिणामी विरोधक तीन वर्षांपासून सरकारवर टीका करत जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करत होते. अखेर केंद्र सरकारने आता जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा…
विद्यार्थ्यांना माहिती व्हावी म्हणून शालेय अभ्यासक्रमात सरकारी सेवांचा समावेश करा- मुख्यमंत्री मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लोकाभिमुख झाला पाहिजे यासाठी १५ ऑगस्ट पर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन करा. १५ ऑगस्टपर्यंत जो विभाग त्यांच्या सेवा ऑनलाईन करणार नाहीत त्या विभागाला दरदिवशी प्रत्येक सेवेकरीता एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. शासनाकडून कोणत्या सेवा दिल्या जातात याची शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी या अधिनियमाचा अभ्यासात समावेश करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे सामान्य प्रशासन विभाग व राज्य सेवा हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या अंमलबजावणीची ‘दशकपूर्ती’ आणि ‘प्रथम सेवा हक्क…
लहानपणापासूनच पूजा करतो – शरद पवार ठाणे (प्रतिनिधी)- माझ्याबाबतीत अर्धसत्य सांगितले जाते पण, मी लहानपणापासूनच पूजा करतो. मुख्यमंत्री असताना तीन ते चार वेळा पांडुरंगाची पूजा केली आणि त्याचबरोबर तुळजापूरला जाऊनही पूजा करतो, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ठाण्यात पत्रकारांशी दिले. ठाण्याच्या पाचपाखाडी भागातील गणेशवाडी येथे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुळजाभवानीचे मंदिर उभारले असून या मंदिरातील तुळजाभवानी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आली. कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, शिवसेनेचे आमदार मिलिंद…
२ मे पासून मुंबई ते सहरसा अमृत भारत एक्स्प्रेस धावणार जळगाव (प्रतिनिधी ) – जळगाव आणि भुसावळच्या मध्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते सहरसादरम्यान नवीन साप्ताहिक अमृत भारत एक्स्प्रेस २ मेपासून सुरू होत आहे. या गाडीला जळगाव आणि भुसावळ येथे थांबा असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे. ११०१५ क्रमांकाची गाडी एलटीटी येथून दर शुक्रवारी दुपारी १२ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी दुपारी २ वाजता सहरसा येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ११०१६ क्रमांकाची गाडी सहरसा येथून दर रविवारी पहाटे ४.२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी दुपारी ३.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. या गाडीला ठाणे,…
जळगाव विभागातून उन्हाळी सुट्यांमध्ये धावणार जादा ७५९ बसफेऱ्या जळगाव (प्रतिनिधी ) – शाळांच्या परीक्षा संपल्या आहेत. यंदा पंधरा दिवस उशिरा शाळांना सुट्या लागल्या.हे लक्षात ठेवून एसटी महामंडळाने उन्हाळी जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. २७ एप्रिलपासून ७५९ उन्हाळी जादा बसेसच्या फेऱ्या जळगाव विभागाकडून सुरू झाल्या आहेत. राज्य शासनाने सर्व शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू केल्याने यंदा प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या परीक्षा पंधरा दिवस लांबल्या. एसटीच्या जादा फेऱ्या २७एप्रिलपासून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची दरवर्षी गर्दी लक्षात घेता यंदा जळगाव एसटी विभागाकडून नियोजन केले गेले असून, ११ आगारातील ७५९ बसचे फेऱ्यांचे नियोजन एसटी विभागाने केले आहे. जळगाव शहरातून तसेच अन्य आगारातून लांब पल्ल्याच्या…
ॲड. महेश ढाके यांना पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान पुणे (प्रतिनिधी ) – कायदा आणि ग्राहक संरक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ॲड. महेश निळकंठ ढाके यांना पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई प्रतिष्ठान, उरुळी कांचन, पुणे व राष्ट्र सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, पुणे येथे झालेल्या समारंभात नुकताच प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भोळे होते. सनराईझ इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड, मुंबईचे मॅनेजिंग डायरेक्टर एन. व्ही. चौधरी, भातृ मंडळ, पुणेचे सल्लागार कृष्णा खडसे, ज्येष्ठ साहित्यिक मुरलीधर पाटील उपस्थित होते. ॲड. ढाके यांनी गेली…
विनोद पाटील यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जळगाव (प्रतिनिधी) – सावदा पोलीस ठाण्याचे हवालदार विनोद बळीराम पाटील यांना त्यांच्या १५ वर्षांच्या प्रामाणिक आणि उत्कृष्ट सेवेसाठी जिल्हा पोलीस विभागातर्फे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. कर्तव्यदक्षता, उत्कृष्ट कार्यप्रदर्शन आणि निष्कलंक अभिलेख यामुळे त्यांनी हा पुरस्कार पटकावला आहे. हा सन्मान सोहळा महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान विनोद पाटील यांना सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि विशेष सत्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. विनोद पाटील यांनी सावदा पोलीस ठाण्यासह रावेर पोलीस ठाण्यात ७ वर्षे सेवा देताना कर्तव्यनिष्ठेने आणि कार्यकुशलतेने सर्वांचे मन जिंकले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सावदा…