दिल्लीसाठी भुसावळामार्गे धावणार ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ जळगाव (प्रतिनिधी)- लवकरच भुसावळामार्गे पुणे ते नवी दिल्ली दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. या वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे प्रवाशांना जलद प्रवासाचा अनुभव मिळेल. व्यावसायिक, पर्यटक आणि कुटुंबांसाठी हा उत्तम पर्याय ठरेल. पुण्यातून लवकरच दिल्लीसाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे. पुण्यातून निघणारी वंदे भारत स्लीपर १५८९ किमीचे अंतर २० तासांत पार करेल. या ट्रेनला भुसावळ स्थानकावर थांबा असेल. यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना जलद प्रवासाचा अनुभव मिळेल. भुसावळहुन नवी दिल्लीचे अंतर १०९८ किमी असून जवळपास १३ तासात दिल्ली पोहोचेल. वंदे भारत स्लीपर ट्रेन १६० किमी प्रतितास वेगाने धावेल, अशी माहिती…
Author: Vikas Patil
किरकोळ वादातून दोन गटात राडा; परस्पर विरोधात गुन्हे जळगाव (प्रतिनिधी)- घरासमोरील रस्त्यावर काचेच्या बाटल्या फेकू नका असे सांगितल्याचे वाईट वाटल्याने दोन गटामध्ये तुफान राडा झाला. दोन्ही गटाकडून एकमेकांच्या घरावर दगडफेक करुन लाकडी दांडक्याने मारहाण केली. दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या गटातील वर्षा बागडे (वय २३, रा. जाखनीनगर, कंजरवाडा) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन, १ रोजी रात्री काही तरुण त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर काचेच्या बाटल्या फेकत होते. त्यांना वर्षा बागडे यांनी घरासमोर बाटल्या फेकू नका असे सांगितले. त्याचा राग आल्याने आठ जणांच्या टोळक्याने बागडे यांना शिवीगाळ केली. त्यावेळी निलेश बागडे याला लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी…
प्रेमविवाहाचा राग, वृद्धेचा विनयभंग; एकावर गुन्हा अमळनेर (प्रतिनिधी)- तालुक्यातील शिरूड गावात ६० वर्षीय वृद्ध महिलेचा तिच्या मुलाने प्रेम विवाह केल्याचा राग मनात धरून एकाने विनयभंग केल्याची घटना २ मेरोजी सायंकाळी घडली. अमळनेर पोलिस ठाण्यात ३ मेरोजी दुपारी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शिरूड गावात ६० वर्षीय वृध्द महिला मुलासोबत वास्तव्याला आहे. वृद्ध महिलेच्या मुलाने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून रवींद्र वैराळे याने वृद्ध महिलेला शिवीगाळ, मारहाण केली व अश्लील चाळे करत विनयभंग केला. त्याने महिलेच्या जेठाणीलादेखील शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील करीत आहेत.
पुर्ववैमनस्यातून मारहाणीत तरूणासह वडील, काकाही गंभीर जखमी भडगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील वाक येथे तरुणाला जुन्या वादातून तलवारीने मारहाणीत त्याच्या मानेला जखम झाली व डाव्या हाताच्या मनगटाला गंभीर दुखापत झाली आहे. कुटुंबीय मदतीसाठी धावले असता त्याचे वडील व काका यांनाही मारहाण करण्यात आली. भडगाव पोलीस स्टेशनला संशयित चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश पाटील (वय २८, रा. वाक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २ मे रोजी रात्री गावातील योगेश पाटील, उमेश पाटील, सतिष पाटील, अक्षय पाटील हे इंडिका व्हिस्टा गाडी क्रमांक (एम. एच.४२ ए यु ४२४९)ने आले. वाहन योगेश चालवत होता. योगेश याने फिर्यादी राकेश पाटील याला…
भुसावळात दोघांकडून २ गावठी कट्टे, ७ जिवंत काडतूसे जप्त भुसावळ (प्रतिनिधी) – येथील तार ऑफिस परिसरातील एका हॉटेलजवळ शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने २ तरुणांकडून त्यांच्या कमरेला लावलेले २ गावठी कट्टे आणि सात जिवंत काडतूस जप्त केले आहेत. पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांना माहिती मिळाली होती. तार ऑफिसजवळील हॉटेल जवळ पथकाने सापळा रचला. तेथे एक तरुण संशयास्पद स्थितीत उभा होता.त्याला विचारपूस केल्यावर त्याच्या झडतीत १ गावठी कट्टा व ४ जिवंत काडतूसे सापडली. त्याचे नाव ऋतिक निंदाने (वय २४, रा.वाल्मिक नगर भुसावळ) आहे. तो आणखी एकाची वाट पाहत होता. पोलिसांनी तेथेच थांबून त्या तरुणाची वाट पाहिली व त्यालाही ताब्यात घेतले. या दुसऱ्याचे…
अनैतिक संबंधाच्या वादातून तरुणाचा खून, ५ जणांविरुद्ध गुन्हा जळगाव (प्रतिनिधी)- शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील श्री प्लाझा परिसरात शनिवारी रात्री तरुणाचा धारदार हत्यारांनी वार करून खून करण्यात आला. ५ संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस दलाकडून धरपकड केली जात आहे. पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून झालेल्या वादात हा खून झाल्याची माहिती फिर्यादीतून समोर आली आहे. आकाश पंडित भावसार (सोनार वय २७, रा. अशोक नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. ट्रान्सपोर्ट व्यवसाय करून तो उदरनिर्वाह करत होता. ३ मे रोजी रात्री आकाश याची पत्नी पूजा भावसार हिचा मावस भाऊ अजय…
मनपा निवडणुकीची तयारी वेगात ; सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी मुंबई (प्रतिनिधी) – मुंबई महापालिकेने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी दिवशीच निवडणुकांच्या तयारीसाठी अधिकाऱ्यांना रुजू होण्याचे आदेश दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना केंद्रस्तरीय अधिकारी पदावर रूजू होण्याचेही आदेश दिले आहेत. अन्यथा, कारवाई होऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवडसह २३ महापालिकांवर प्रशासकीय राजवट आहे. सर्वच पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. या निवडणुका आणि ओबीसी आरक्षण न्यायप्रविष्ट आहे. राज्यात अनेक ठिकाणी चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मोठे फेरबदल मुंबईः (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार सुनील भुसारा यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विश्वासात घेऊनच फेरबदल होत असल्याची माहिती मिळालेली आहे. आमदार रोहित पवार यांच्याकडेही महत्त्वाचे पद दिले जाईल, अशी शक्यता आहे. युवक प्रदेशाध्यक्षपदासाठी आ. रोहित पाटील यांना संधी दिली जाऊ शकते रोहित पवार यांच्याकडे संघटनात्मक सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. आठवडाभराच्या बैठकांनंतर संभाव्य पदाधिकाऱ्यांची यादीही निश्चित झाली असून शरद पवारांच्या होकारानंतर घोषणा होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेत्यांकडे विभागवार प्रभारीपदे वाटून दिली जाणार आहेत.…
पेपर तपासणीसाठी ‘एआय’चा वापर सोलापूरः (प्रतिनिधी) – ‘ग्लोबर टीचर’ पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी सोलापूर जिल्हा परिषद शाळेच्या 225 विद्यार्थ्यांच्या उत्तरप्रत्रिका कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तपासून अंतिम निकाल लावल्याचा अभिनव प्रयोग केला आहे. या ‘एआय मॉडेल’मुळे शैक्षणिक क्षेत्रात क्रांती होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. डिसले म्हणाले, की यंदा उत्तरपत्रिका तपासून अंतिम निकाल तयार करण्यासाठी शिक्षकांकडे पुरेसा वेळ नव्हता. त्यामुळे ‘एआय’चा वापर करून उत्तरपत्रिका तपासण्याचा प्रयोग करण्यात आला. छोट्या गटावर करण्यात आलेल्या प्रयोगाचे निकाल उत्साहवर्धक आहेत. त्यामुळे हे ‘एआय मॉडेल’ सक्षम बनवण्यासाठी मदत होईल. यंदा आम्ही सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 12 शाळांच्या 225 विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेच्या उत्तरपत्रिका वर्गाचे शिक्षक व…
शासकीय रुग्णालयातील ‘थ्री टी एमआरआय’ मशीनचे लोकार्पण जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांसाठी ‘थ्री टी एमआरआय मशीन’ या अत्याधुनिक उपकरणाचे लोकार्पण ३ मेरोजी सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या स्थापनेनंतर ८ वर्षांमध्ये क्ष किरण विभागांमध्ये आता सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. एक्स-रे, सोनोग्राफी, सिटीस्कॅनसोबत थ्री टेस्ला एमआरआय मशीनची देखील सुविधा रुग्णांना उपलब्ध झाली आहे. यासाठी सरकारी शुल्क नियमानुसार राहणार आहे. सुरुवातीला केवळ रुग्णालयात दाखल रुग्णांसाठी ही सुविधा सुरू राहील. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने एमआरआयची सुविधा ओपीडी तत्त्वावर रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात येईल. क्ष किरण विभागाचे प्रभारी प्रमुख डॉ. मारोती पोटे…