अवैध गॅस रिफीलिंग; १३ सिलिंडर्स जप्त जळगाव (प्रतिनिधी)- घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून रिक्षात अवैध गॅस रिफीलींग करणाऱ्यावर गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. १३ भरलेले व ५ रिकामे सिलिंडर्स जप्त करण्यात आले. या कारवाईत आफताब आलम शेख रहीम (२८, रा. रहमतपूर नशिराबाद) विरुद्ध शुक्रवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोहेकॉ कमलाकर बागुल, गजानन देशमुख, गोपाळ गव्हाळे, संघपाल तायडे, सचिन पोळ यांचे पथक रात्री गस्तीवर होते. त्यांना नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध घरगुती गॅस सिलिंडरमधून प्रवासी रिक्षा रिफिलींग करतांना दिसले. रिक्षा चालकास कुणकूण लागल्याने तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. त्यानंतर…
Author: Vikas Patil
छत्रपती शिवाजी महाराज थीम पार्क जळगावात उभारणार- मंत्री शंभूराज देसाई नाशिक (प्रतिनिधी)- जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी निफाड, पिंपळगाव, नांदगाव, येवला शिवसृष्टीचे काम सुरू असून छत्रपती शिवाजी महाराज थीम पार्कचे काम जळगाव येथे करण्यात येणार असल्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेमध्ये सांगितले. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली होती. या समितीने नाशिकऐवजी जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज थीम पार्क उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राज्यातील पाच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील घटनांवर आधारित डिजिटल थीम पार्क उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले. रायगड…
औरंगजेबाच्या कबरीला कायदेशीर संरक्षण, घाईने कोणतेही पाऊल उचलता येणार नाही – फडणवीस मुंबई (प्रतिनिधी)- काही दिवसांपासून औरंगजेबाची कबर राजकारणाच्या केंद्रस्थानी आलीये. औरंगजेबाची कबर काढून टाकावी अशी मागणी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबरीबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करत काँग्रेसवर आरोप केला. त्यांनी सांगितले की, ही कबर काँग्रेस सरकारच्या काळात जतन करण्यात आली आणि ती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या संरक्षणाखाली आहे. त्यामुळे काँग्रेसची भूमिका स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, औरंगजेबाच्या कबरीला कायदेशीर संरक्षण आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. घाईघाईने कोणतेही पाऊल उचलता येणार नाही. दुसरीकडे आमदार नितेश राणे…
नाशिक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात विवाहपूर्व संवाद केंद्र स्थापन होणार नाशिक (प्रतिनिधी) – जिल्ह्यात विवाह पूर्व संवाद केंद्राच्या माध्यमातून नियोजित वधु-वरांचे समुपदेशन होणार असून, विचार व मतांच्या आदान-प्रदानातून कौटूंबिक नाती अधिक दृढ होतील, असा विश्वास व्यक्त करीत प्रत्येक तालुक्यात विवाहपूर्व संवाद केंद्र स्थापन होणार आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. महिला दिनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या उपक्रमातून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर येथे ‘तेरे मेरे सपने’ विवाह पूर्व संवाद केंद्र उद्घाटन कार्यक्रमात जिल्हाधिकारी जलज शर्मा बोलत होते. यावेळी महिला व बाल विकास उपायुक्त चंद्रशेखर पगारे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी…
१५ मार्चपर्यंत कापूस नोंदणी हमीभावासाठी आवश्यक जळगाव (प्रतिनिधी)- किमान हमीभावाने सीसीआयकडे कापूस विक्रीला पात्र ठरण्यासाठी शेतकऱ्यांनी १५ मार्चपूर्वी सीसीआय केंद्राकडे नोंदणी आवश्यक असल्याचे पत्रक पणन सहसंचालक स्नेहा जोशी यांनी दिले आहे. ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबर २०२५ च्या हंगामासाठी शेतकऱ्यांना कापूस विकण्यासाठी पात्र ठरायचे असेल आणि एमएसपीचा लाभ मिळण्यासाठी सीसीआय केंद्रांकडे नोंद करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणी नसलेल्या शेतकऱ्यांना कापूस सीसीआयकडे विकता येणार नाही. अमळनेरसारख्या तालुक्यात सीसीआयचे केंद्रच सुरू झालेले नाही. अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी कोठे करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना पात्र ठरायचे असेल तर धरणगाव , पारोळा तालुक्यात जावे लागेल. त्यासाठी शेतकऱ्यांचा…
लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्याला प्रारंभ मुंबई (प्रतिनिधी)- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी महिन्यातील हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येईल, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र, महिलांच्या खात्यात १५०० रूपये जमा झाले आहेत. त्यामुळे संभ्रम असून मार्चचा हप्ता कधी येणार? असा प्रश्न विचारला जात आहे. आता याबाबत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे (यांनी पोस्ट करत माहिती दिली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे की, लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थीना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा निधी वितरित करण्याची प्रक्रिया ७ मार्चपासून सुरू झालेली आहे. ही प्रक्रिया…
प्रशांत कोरटकरच्या विरोधातील तक्रार कोल्हापुरच्या गुन्ह्यात समाविष्ट होणार अमळनेर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवराय व संभाजी महाराजांवर गरळ ओकणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्यावर कोल्हापूर येथे दाखल गुन्ह्यात अमळनेर बहुजन समाजाची तक्रार समाविष्ट करून घेतो असे आश्वासन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शिष्टमंडळाला दिल्याने मोर्चा स्थगित करण्यात आला. प्रशांत कोरटकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी अमळनेर तालुक्यातील बहुजन समाजाने अमळनेर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केले होते. गुन्हा दाखल होत नसल्याने समाज आक्रमक झाला होता. त्यावेळी डिवायएसपी विनायक कोते व प्रभारी परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले यांनी बहुजन समाजाला पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी बोलावल्याचे सांगितले. शिष्टमंडळाने शनिवारी रेड्डी यांची भेट घेतली गुन्हा दाखल करण्याचा…
प्रेमविवाहाच्या रागातून मामाचा भाचीवर हत्याराने वार जळगाव (प्रतिनिधी)- लहानपणापासून सांभाळ केलेल्या भाचीने पळून जावून प्रेमविवाह केल्याने संतप्त झालेल्या मामाने केळी कापणीच्या शस्त्राने (बख्खी) तिच्यावर हल्ला केल्याची घटना यावल तालुक्यातील पिंप्री गावात घडली भाची गंभीर जखमी झाली आहे. यावल तालुक्यात पिंप्री गावात चेतन कोळी यांच्यासोबत लव्ह मॅरेज करून वैष्णवी तायडे (वय 18 )आली होती. स्वप्निल सपकाळे याच्या घरात ती होती. शनिवारी वैष्णवी तायडेचा मामा उमाकांत कोळी (रा. पाडळसा ) आला आणि त्याने बक्खी या हत्याराद्वारे भाचीच्या गळ्यावर वार केला. या हल्ल्यात ती व वैशाली सपकाळे ही देखील जखमी झाली. नागरिकांनी दोन्ही महिलांची त्याच्या तावडीतून सुटका करून रुग्णालयात आणले. नागरिकांनी उमाकांत कोळी…
महिला कर्मचाऱ्यांच्या संचालनाखाली मालगाडी रवाना भुसावळ रेल्वे विभागात जागतिक महिला दिवस उत्साहात भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ विभागामध्ये जागतिक महिला दिवस विविध कार्यक्रमांसह उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व रेल्वे स्थानकांवर विशेष कार्यक्रम घेण्यात आले, महिला कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. भुसावळ रेल्वे स्थानकावरून खंडवा दिशेने मालगाडी पूर्णतः महिला कर्मचाऱ्यांच्या संचालनाखाली रवाना करण्यात आली. या ट्रेनचे नेतृत्व महिला लोको पायलट ज्योती सिंग, सहायक लोको पायलट शिवानी आणि गुड्स ट्रेन मॅनेजर भाग्यश्री पिंपळे यांनी केले. या गाडीला मंडळ रेल्वे प्रबंधक इति पाण्डेय यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. मंडळ रेल्वे प्रबंधक इति पाण्डेय यांनी भुसावळ स्टेशनवरील टीटीई लॉबीमध्ये महिला टिकट तपासणी कर्मचाऱ्यांशी संवाद…
बोधगया महाविहार मुक्तीसाठी धरणे जळगाव (प्रतिनिधी) – बोधगया हे जगातील सर्व बौध्दांचे पवित्र स्थान आहे. या महाविहाराची निर्मिती सम्राट अशोक यांनी केली होती. या महाविहारावर ब्राह्मणांनी अनधिकृत कब्जा केला आहे. ते बौध्दांच्या ताब्यात देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी ८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर पाचपैकी दुसऱ्या टप्प्यातील धरणे आंदोलन करण्यात आले. महाबोधी टेम्पल ॲक्ट १९४९ बनविण्यात आला. यामुळे या महाविहारावर ब्राह्मणांचा अनधिकृत कब्जा आहे. या कायद्यामुळे आंतरराष्ट्रीय विरासत कायद्याचेही उल्लंघन होत आहे. हा कायदा रद्द करावा व हे महाविहार बौध्दांच्या ताब्यात देण्यात यावे. १८९५ वर्षी अनागरिक धर्मपाल विरुध्द महंत या वादाचा निकाल न्यायालयाने बौध्दांच्या बाजुने दिलेला असतानाही या महविहारावर…