प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक मुंबई (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा तसेच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक केल्याची माहिती समोर आली आहे. कोरटकर २५ फेब्रुवारीपासून फरार होता. त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु होता. अखेर पोलिसांना त्याचा सुगावा लागला. प्रशांत कोरटकर सुरुवातीला नागपुरातून फरार होऊन चंद्रपूरमध्ये लपून बसला होता. नंतर कोल्हापूर पोलिस त्याला अटक करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणाहूनही तो फरार झाला होता. प्रशांत कोरटकरला आता एका महिन्यानंतर तेलंगणामधून अटक केल्याची माहिती मिळत आहे. नोंद केल्यानंतर कोल्हापूर पोलिस त्याला ताब्यात घेतील. यानंतर त्याला…
Author: Vikas Patil
महात्मा ज्योतिबा फुले-सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ देण्याचा विधानसभेत ठराव मुंबई (प्रतिनिधी)- क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करावे, या मागणीसाठी विधानसभेत सोमवारी ठराव मंजूर करण्यात आला. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी हा ठराव सभागृहात मांडला होता, त्याला छगन भुजबळ यांनी पाठिंबा दर्शवला. हा ठराव एकमताने संमत करण्यात आला. महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाही, हा ऐतिहासिक ठराव एकमताने संमत झाला. हा ठराव प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राच्या लौकिकात भर घालणारा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केले. हा ठराव लोकभावनेचा आदर करणारा आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराचा गौरव वाढवणारा…
तोतया टीसी लोहमार्ग पोलिसांनी पकडला भुसावळ (प्रतिनिधी)- गोरखपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या सतर्कतेमुळे एस ८ कोचमध्ये नकली तिकीट तपासनीस असल्याचे उघड झाले. रेल्वे अधिकाऱ्यांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आणि गुन्हा दाखल करण्यासाठी भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे सोपवले. भोपाळ विभागाचे डीवाय सीटीआय मनोज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ मार्चरोजी नियमित तपासणी दरम्यान एस ८ कोचमध्ये प्रफुल गजभिये नावाची व्यक्ती तिकीट तपासणी करत असल्याचे आढळले. अधिकृत ओळखपत्र त्याच्याकडे आढळले नाही. प्रवाशांनी सतर्कता दाखवत खंडवा ते नेपानगर दरम्यान हा नकली टीसी असल्याचे ओळखले आणि रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती दिली. नंतर रेल्वे प्रशासनाने कारवाई करत भुसावळ रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांना माहिती…
रस्त्यासाठी महापालिकेसमोर निदर्शने जळगाव (प्रतिनिधी)- शहरातील दुर्वांकुर पार्क ते गुड्डूराजा नगर, पिंप्राळा रोडपर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी संतप्त नागरिकांनी आज महापालिकेच्या निष्क्रिय कारभाराविरोधात घोषणाबाजी, निदर्शने केली. आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद न साधता केबिनमध्ये निघून गेल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आणि तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. या परिसरातील रहिवासी ३५ वर्षांपासून रस्त्याच्या समस्येला तोंड देत आहेत. ते नियमित कर भरत असले तरी अद्याप योग्य रस्ता मिळालेला नाही. कच्च्या रस्त्यामुळे धूळ, चिखल आणि अपघातांची समस्या निर्माण झाली आहे. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारही नसल्याने पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका असतो. अनेकवेळा तक्रारी करूनही कामे न झाल्याने नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्विकारला. संतप्त नागरिकांनी प्रशासनाला सांगितले की,…
विधानसभा उपाध्यक्षांची निवड २६ मार्चला मुंबई (प्रतिनिधी)- विधानसभा उपाध्यक्षपदासाठी २५ मार्चरोजी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर २६ मार्चरोजी उपाध्यक्षाची निवड होणार आहे. विधानपरिषदेचे सभापतीपद भाजपच्या तर उपसभापतीपद शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला गेले आहे. त्यामुळे आता महायुतीत विधानसभा उपाध्यक्षपद अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. यामुळे आता राष्ट्रवादीकडून विधानसभा उपाध्यक्षपद कुणाला मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
जुन्या वादातून चाकूहल्ला; तिघांवर गुन्हा जळगाव ( प्रतिनिधी )- शहरातील बजरंग बोगदा भागातील गणपती मंदिराजवळ जुन्या भांडणातून तरुणावर चाकूने वार करून पाठीला दुखापतीसह लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना २२ मार्चरोजी रात्री घडली. २३ मार्चरोजी दुपारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मोहित गुजर (वय १८) हा परिवारासह मयूर कॉलनी, पिंप्राळा येथे वास्तव्याला आहे. २२ मार्चरोजी रात्री मोहित बजरंग बोगद्याजवळ गणपती मंदिरासमोर जात असताना संशयित गणेश मराठे याने दोन साथीदारांसोबत जुन्या भांडणावरून मोहितवर चाकूने वार करून जखमी केले. इतर दोघांनी लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केली. तपास पो ना राजेश पदमर करीत आहेत.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या माजी खासदार संभाजीराजे यांच्या भूमिकेला इंद्रजीत सावंत यांचेही समर्थन कोल्हापूर (न्यूज नेटवर्क)- छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरच्या समाधीजवळच्या कुत्र्याच्या समाधीबाबत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये वाघ्या कुत्र्याच्या पात्राचा कुठेही उल्लेख नाही, असे इंद्रजित सावंत यांनी म्हटले आहे. वाघ्या कुत्र्याची निर्मित्ती कुठून झाली यावरही त्यांनी भाष्य केलं. राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मित्ती झाल्याचं त्यांनी सांगितलं. माजी खासदार संभाजीराजे यांनी हा समाधीचा मुद्दा उपस्थित करत ही समाधी कपोलकल्पित असून तिला इतिहासाचा आधार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. वाघा कुत्र्याची ही समाधी हटविण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांना पत्रही लिहिलं होतं. रायगडावरील…
विरोधकांकडे बोट दाखवत फडणवीसांचे कुणाल कामरावर कारवाईचे संकेत मुंबई (प्रतिनिधी)- कुणाल कामराचं गाणं समोर आल्यावर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून आक्षेपानंतर विधानसभेत याचे पडसाद उमटले. आमदार अर्जुन खोतकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर निवेदन करताना विरोधकांकडे बोट दाखवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुणाल कामरावर कारवाईचे संकेत दिले आहेत. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या गाण्यावरून रविवारी संध्याकाळपासून चर्चा सुरू झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या शिवसेनेला लक्ष्य करणारं विनोदी गाणं कुणाल कामराने स्टँडअप कॉमेडी शोमध्ये गाऊन दाखवलं. त्याच्या या गाण्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. कुणाल कामराने मुंबईच्या खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये कॉमेडी शो केला. या शोमध्ये एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र…
दोन चिमुकल्यांचा विनयभंग जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एका भागात दोन अल्पवयीन मुलींसोबत अश्लिल चाळे करत ३५ वर्षीय तरुणाने विनयभंग केल्याची घटना २३ मार्चरोजी पहाटे घडली आहे. रात्री ११ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरात ६ आणि ९ वर्षीय या दोन अल्पवयीन मुली परिवारासह वास्तव्याला आहे. संशयित आरोपी मनोज धनगर याने या दोन्ही मुलींसोबत अश्लील चाळे करत त्यांचा विनयभंग केला. हा प्रकार २३ मार्चरोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडला नंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी शनीपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली रात्री ११ वाजता संशयित आरोपी मनोज धनगरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहेत.
युवराज कोळी हत्याकांडातील फरार पिता पकडला पोलिसांनी केला जेरबंद जळगाव (प्रतिनिधी)- कानसवाडा-शेळगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांच्या खूनाच्या गुन्ह्यात भरत पाटील या तिसऱ्या संशयितास नशिराबाद पोलिसांनी रविवारी अटक केली. युवराज कोळी यांचा २१ मार्चरोजी सकाळी खून करण्यात आला. या गुन्ह्यामध्ये भरत पाटील, त्यांची दोन्ही मुले देवेंद्र पाटील आणि परेश पाटील या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता यादोघेही भावंडांना पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांना २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे दरम्यान तिसरा संशयित आणि फरार असलेला पिता भरत पाटील याला नशिराबाद पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याने शिताफीने अटक केली. सपोनि ए. सी. मनोरे, सहायक फौजदार संजय महाजन, पोहेकॉ. शरद भालेराव,…