विहिरीत पडलेल्या हरणाला तरुणांमुळे जीवदान अमळनेर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मंगरूळ शिवारात मोडक्या विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाला तेथील तरुणांनी जीवाची पर्वा न करता वाचवले. मंगरूळ येथील कैलास पाटील यांच्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या कल्पेश पाटील यांना २ एप्रिलरोजी सकाळी आठ महिन्यांचे हरणाचे पिल्लू पाण्यात धडपडताना दिसले. त्यांनी सरपंच समाधान पारधी यांना माहिती दिली. त्यानंतर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना कळवण्यात आले आणि त्यांनी वनविभागाच्या पथकाला पाठवले. तोपर्यंत मंगरूळ येथील भूषण भदाणे आणि धनंजय पाटील यांनी भीती न बाळगता खोल आणि मोडक्या विहिरीत उड्या घेतल्या. विहिरीत पाणी खूप खोल होते आणि कठडे तुटलेले असल्याने बचावकार्य कठीण झाले होते. दोघांनी हरणाला पकडले, सरपंच समाधान पारधी,…
Author: Vikas Patil
अज्ञात वाहनाच्या धडकेत माजी सरपंच ठार; घातपाताचा संशय चाळीसगाव (प्रतिनिधी )- चाळीसगाव-धुळे महामार्गावर भोरस शिवारात मंगळवारी रात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भाजपचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच प्रकाश पाटील यांचा मृत्यू झाला. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला. या संशयावरून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. प्रकाश पाटील दुचाकीवरून प्रवास करत असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली. नातेवाईकांनी आणि समर्थकांनी हा घातपात असू शकतो, अशी शक्यता वर्तवली या वादामुळे चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात वातावरण तणावपूर्ण बनले. तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी प्रकाश पाटील यांच्या…
वैद्यकीय शिक्षण आता मराठीतून मुंबई (प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरातील माधव नेत्रालय प्रीमियर सेंटरच्या नवीन इमारतीची पायाभरणी करण्यात आली. नागपूरच्या दौऱ्यावर असलेल्या मोदींनी विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. पंतप्रधान मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात करत नागरिकांना गुढीपाडवा आणि नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. वैद्यकीय शिक्षण मराठीतून उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेता यावे यासाठी मातृभाषेत वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. यामुळे मराठी भाषिक विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळेल. मोदींनी सांगितले की, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाखो नागरिकांना मोफत उपचार मिळत आहेत. देशभरात एक हजार डायलिसीस सेंटर स्थापन करण्यात आली…
राज्यात “जिवंत सातबारा” मोहीम जळगाव (प्रतिनिधी)- महसूल विभागाने राज्यात “जिवंत सातबारा” मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सातबारावरील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अद्ययावत केल्या जाणार आहेत. या मोहिमेचा उद्देश मयत खातेदारांच्या वारसांना आवश्यक कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद वेळेत व्हावी हा आहे. अनेकदा वारसांची नोंद नसल्यामुळे अडचणी येतातजिल्ह्यातील ज्यांच्या सातबारावर अशा नोंदी राहिल्या असतील त्यांनी तलाठ्याकडे जाऊन नोंदी करून घ्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. १ ते ५ एप्रिल : तलाठी गावांमध्ये चावडी वाचन करून मयत खातेदारांची यादी तयार करतील. ६ ते २० एप्रिल: वारसांनी आवश्यक कागदपत्रे तलाठ्यांकडे जमा करायची आहेत. तलाठी पडताळणी करून वारस ठराव मंजूर करतील. २१ एप्रिल…
खामगाव ते शेगाव मार्गावर अपघातात पाच ठार ; सहा गंभीर जखमी बुलडाणा (प्रतिनिधी) बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते शेगाव रोडवर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला या घटनेत २५ जण जखमी झाले असून सहा प्रवाशी गंभीर जखमी झाल्याने मृतांची संख्या वाढण्याची भिती आहे. खामगाव ते शेगाव दरम्यान जयपूर लांडे फाटासमोर हा अपघात झाला पुणे येथून परतवाडा येथे जाणाऱ्या एसटी बसला मागून चार चाकी वाहनाने आधी धडक दिली, नंतर खाजगी ट्रॅव्हल्सने या दोन्ही वाहनांना उडवले.. सकाळी पाच वाजता झालेल्या या तिहेरी अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.. जखमींना स्थानिक शासकीय रुग्णालयात…
महात्मा गांधींच्या पणती नीलमबेन पारीख यांचे निधन नवसारी (वृत्तसंस्था )- गुजरातमधील नवसारी येथे महात्मा गांधींच्या पणती नीलमबेन पारीख यांचे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. नीलमबेन पारिख यांनी महात्मा गांधी आणि त्यांचा मोठा मुलगा हरिलाल गांधी यांच्यातील मतभेदांवर पुस्तक लिहिले होते, ज्यामुळे त्या प्रकाशझोतात आल्या होत्या. नीलमबेन यांनी आपले आयुष्य समाजकार्याला वाहिले होते. त्यांनी आदिवासी महिलांना शिक्षण, स्वावलंबन आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मार्गदर्शन केले. हरिलाल गांधी आणि त्यांच्या पत्नी गुलाब यांना पाच अपत्ये होती. त्यापैकी रामीबेन यांची कन्या म्हणजे नीलमबेन. त्या खादीच्या प्रसारासाठी ओळखल्या जात होत्या. त्यांच्या निधनाबाबत माहिती देताना त्यांचे चिरंजीव डॉ. समीर पारिख यांनी सांगितले की,…
जळगावात ‘ईद पाडवा’; सामाजिक एकतेचा जागर जळगाव ( प्रतिनिधी )- गुढी पाडवा आणि ईद या दोन सणांनिमित्त शहरात सामाजिक एकोप्याचा संदेश देणारा ‘ईद पाडवा’ सोहळा साजरा झाला. हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सौहार्द आणि शांततेचा संदेश दिला. कट्टर हिंदूत्व, कट्टर इस्लाम मनात बाळगताना कट्टर देशभक्ती देखील असावी, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी यावेळी केले. प्रत्येकाने आपल्या धर्म, जातीचा अभिमान बाळगताना दुसऱ्याचा अपमान होईल असे कृत्य करू नये. अगोदर बॅनर, पोस्टरमुळे वाद व्हायचे आता सोशल मीडियामुळे होतात. एकाने काही पोस्ट केली तर दुसरा त्याला उत्तर देतो आणि त्यातून वाद वाढतो. विशेषतः १५ ते २५ वयोगटातील मुलांमध्ये हे प्रमाण…
भक्तांना पाच लाखापर्यंत विमा संरक्षण; साई संस्थानची घोषणा शिर्डी (प्रतिनिधी)- येथे दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांना आता ५ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळणार आहे. हा निर्णय भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. शिर्डीमध्ये दररोज लाखो भक्त दर्शनासाठी येतात. साईबाबांच्या भक्तांमध्ये सर्व स्तरांतील लोकांचा समावेश असतो. काही वेळा यात्रेदरम्यान अपघात, आजारपण किंवा इतर आपत्ती अशा घटना घडतात अशा परिस्थितीत साई संस्थानाने दिलेल्या विमा सुविधेचा लाभ संबंधित भक्त किंवा त्यांच्या कुटुंबीयांना मिळणार आहे. साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी साई संस्थानच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे बंधनकारक असेल. भक्तांनी प्रवासापूर्वी नोंदणी करावी लागेल. नोंदणी झाल्यावर, भक्त घरातून निघाल्यापासून दर्शन होईपर्यंतच्या कालावधीसाठी विमा संरक्षणाच्या कवचाखाली असतील. या कालावधीमध्ये काही…
महावितरणच्या ‘लकी डिजिटल ग्राहक’ योजनेचा पहिला लकी ड्रा ७ एप्रिलला बुलढाणा प्रतिनिधी महावितरणच्या ‘लकी डिजिटल ग्राहक’ योजनेचा पहिला लकी ड्रा ७ एप्रिलरोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. राज्यभरातील विजेत्यांना स्मार्टफोन आणि स्मार्ट वॉच बक्षीस दिले जाणार आहेत. योजनेनुसार, प्रत्येक उपविभागस्तरावर एक प्रमाणे पहिल्या क्रमांकासाठी ६५१ विजेत्यांना स्मार्टफोन मिळेल. दुसऱ्या क्रमांकासाठी प्रत्येकी दोन प्रमाणे १,३०२ विजेत्यांना स्मार्टफोन आणि तिसऱ्या क्रमांकासाठी प्रत्येकी दोन प्रमाणे १,३०२ विजेत्यांना स्मार्ट वॉच प्रदान केले जाणार आहे. पुढील लकी ड्रॉ मे आणि जूनमध्ये घेतले जातील. महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा सहभाग वाढवण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीत तीन अथवा…
मध्यरात्री मशिदीत जिलेटीनचा स्फोट, दोघे ताब्यात बीड (प्रतिनिधी )- बीड जिल्हा पुन्हा हादरला आहे. आता गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात दोन युवकांनी मशिदीत स्फोट घडवून आणल्याने खळबळ उडाली आहे. अर्धमसला गावात मध्यरात्री मशिदीत स्फोट घडवण्यात आला. या स्फोटासाठी जिलेटीनच्या कांड्यांचा वापर करण्यात आला होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गावात तणाव निर्माण झाला आहे. स्थानिक प्रशासनाने त्वरित परिस्थिती नियंत्रणात आणली पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन युवकांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत हा प्रकार गावातील वादातून घडल्याचे समोर आले आहे. मात्र, या घटनेमागे मोठे षडयंत्र आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. बीडचे पोलीस अधीक्षक स्वतः…