जळगाव : प्रतिनिधी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्म शताब्दी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम व पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन संगमनेर येथे करण्यात आले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे होते तर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला,कर्नाटकचे मंत्री एच.के. पाटील,काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात,आमदार जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, माजी विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार समतेचे तत्वज्ञान जपणारे माजी आमदार उल्हास दादा…
Author: Kishor Koli
नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचा सामना करण्यासाठी एकत्रित आलेल्या विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या जागा वाटपावर राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रा सुरु होण्यापुर्वी शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.त्यासाठी इंडिया आघाडीतील सपा नेते अखिलेश यादव,तृणमूलच्या ममता बॅनर्जी,जदयूचे नितीशकुमार व राजदचे लालूप्रसाद यादव हे आग्रही भूमिका घेत असल्याचे वृत्त आहे. यात्रा १४ जानेवारीपासून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी ‘भारत जोडो यात्रे’नंतर आता मणिपूर ते मुंबई अशी पदयात्रा काढणार आहेत. या यात्रेला ‘भारत जोडो न्याय यात्रा’ असे नाव देण्यात आले आहे. ही यात्रा १४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता मणिपूरची राजधानी इम्फाळमधून सुरू…
जळगाव : प्रतिनिधी यावल अभयारण्य आणि प्रादेशिकच्या सीमेवर जंगलामध्ये शनिवारी यावल प्रादेशिक वनविभागाने लावलेल्या उच्च क्षमतेच्या ट्रॅप कॅमेऱ्यात पट्टेदार वाघाची छबी कैद झाल्याची माहिती वन विभागाकडून प्राप्त झाली आहे. १७५.५८ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या यावल अभयारण्याची वन आणि वन्यजीव संपदा कधीकाळी जगभरात दखलपात्र होती. मेळघाट ते अनेर डॅम या नैसर्गिक टायगर कॉरिडॉर असल्याने कोरोना काळातही यावल अभयारण्यामध्ये २०२१ मध्ये वाघ आढळून आला आहे. वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये असलेला वाघ हा नर आहे की मादी आणि याचे साधारण वय किती असू शकते याची माहिती लवकरच उपलब्ध होईल, अशी माहिती यावल उप वनसंरक्षक जमीर शेख यांनी दिली आहे.
राजकोट : वृत्तसंस्था न्यायाचा ध्वज येणाऱ्या पिढ्यांसाठी फडकत राहील अशा पद्धतीने कार्य करण्याचे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांंनी केले. गुजरात दौऱ्यादरम्यान ते राजकोट येथे बोलत होते. “प्रत्येक नागरिकाला न्याय हक्काची हमी देणाऱ्या समाजाची कल्पना करताना, जिल्हा न्यायालये प्रत्येक नागरिकासाठी प्रारंभिक आधार म्हणून उदयास येतात. नागरिक प्रथमतः सर्वोच्च न्यायालयात येत नाहीत. ते जिल्हा न्यायालयात येतात. त्यामुळे बारचे सदस्य म्हणून तुमच्या कामात तुम्ही आत्मविश्वास निर्माण कराल. न्यायाचा हा ध्वज येणाऱ्या पिढ्यांमध्ये फडकत राहील याची आम्ही खात्री देतो, हे जिल्हा न्यायालयातील वकील म्हणून आमच्या कार्यक्षमतेत आहे”, असे चंद्रचूड राजकोटमध्ये म्हणाले. दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यात त्यांनी भेट दिलेल्या द्वारका आणि सोमनाथ मंदिरांवरील ध्वजाचा…
जालना : वृत्तसंस्था मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही, म्हणजे नाही, असा निर्धार मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे तसेच आता ओबीसी आयोग आहे की मराठा आयोग, अशी शंकाही भुजबळांनी व्यक्त केली आहे. ते पंढरपुरात आयोजित करण्यात आलेल्या ‘ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलत होते. भुजबळांच्या या वक्तव्यांवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेऊन दाखवणार, असे प्रत्युत्तर मनोज जरांगे यांनी दिले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मराठा विरुद्ध ओबीसी असे युद्ध चालू आहे. यामुळे दोन्ही समाजाचे नेते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. मराठा समाज आणि ओबीसी समाजविरोधात शाब्दिक युद्ध सुरू झाल्याने दोन्ही समाजातील नेते एकमेकांवर…
नवीदिल्ली : वृत्तसंस्था टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक आता जाहीर करण्यात आले आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेमका कधी आणि कुठे होणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे. टी-२० वर्ल्ड कप हा १ जूनपासून सुरु होणार आहे. हा वर्ल्ड कप वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन्ही देशांत संयुक्यरीत्या खेळवण्यात येणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना हा आयर्लंडबरोबर होणार आहे. भारत व आयर्लंड यांच्यातील लढत पाच जूनला होणार आहे. भारताचा या वर्ल्ड कपमधील दुसरा सामना हा पाकिस्तानबरोबर होणार आहे. ९ जूनला भारत व पाकिस्तान सामना होणार आहे. त्यानंतर १२ जूनला भारत अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. या तीन लढती…
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. सर्व पक्षांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहेत. त्यातच मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा दावा केला आहे. निवडणुकीच्या आधी १५ ते २० दिवसांत मोठे राजकीय भूकंप पाहायला मिळतील असे मोठे विधान महाजन यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ते पुढे म्हणाले की,…आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी राजकीय भूकंप होणार आहेत. त्यावेळी आपल्याला कळेल कुठल्या पक्षात काय-काय घडतंय पण निश्चित निवडणुकीच्या तोंडावर पुढच्या १५ ते २० दिवसांत मोठे भूकंप झालेले बघायला मिळतील. शरद पवारांकडे पक्ष शिल्लक नाही यावेळी बोलतांना गिरीश महाजनांनी राष्ट्रवादी कांँग्रेसचे अध्यक्ष शरद…
जळगाव : प्रतिनिधी भोरगाव लेवा पंचायतीच्या भुसावळ शाखेतर्फे आठवा सामुहिक विवाह सोहळ्यात आज १२ जोडपी विवाहबद्ध झाली. संतोषीमाता हॉल येथे भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेतर्फे या आठव्या सामुहिक विवाहांचे आयोजन करण्यात आले होते या विवाह सोहळ्यासाठी मान्यवर, प्रतिष्ठित हजर होते. सर्वप्रथम उपक्रम चेअरमन आरती चौधरी यांनी विवाहबद्ध होणाऱ्या मुला मुलींचे विवाहपूर्व समुपदेशन केले. नंतर विवाहविधींची सुरवात झाली. या विवाहा सोहळ्यासाठी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह भावी कुटुंबनायक ललीत पाटील उपस्थित होते. त्यांनी संभाजीनगरहून आलेले उद्योगपती वसंत पाटील, किरण महाजन, चंद्रकांत चौधरी, मनिष चौधरी, भंगाळे गोल्डचे भागवत भंगाळे, अरूण बोरोले, यांचा सत्कार केला. प्रस्ताविकात आरती चौधरी यांंनी भोरगाव लेवापंचायतच्या कार्यक्रमांविषयी माहिती…
जळगाव : प्रतिनिधी कालच्या आणि आजच्या पत्रकारितेत फार मोठी दरी निर्माण झाली आहे त्यामुळे आचारसंहितेची लाचारसंहिता होऊ लागली आहे.अशावेळी दिशाहिन सत्ताधाऱ्यांना भानावर आणण्याचे काम पत्रकारांनी जागृतपणे करावे असे आवाहन अमळनेर येथील पत्रकार संदीप घोरपडे यांनी केले तर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रशासन आणि पत्रकारिता या विषयावर प्रबोधन करतांना,पत्रकारांनी सत्याची चाड धरुन पत्रकारितेची विश्वासार्हता जपण्यासाठी लेखणी झिजवली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे येथील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व ज्येष्ठ पत्रकार श्री.घोरपडे यांनी पत्रकारितेतील होणारे बदल व निर्भिड पत्रकारितेची गरज स्पष्ट केली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ.राजूमामा भोळे यांनीही पत्रकारांना शुभेच्छा…
कोहिमा : वृत्तसंस्था रणजी ट्रॉफी २०२४च्या हंगामाला सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील एक मॅच नागालँड आणि हैदराबाद यांच्यात नागालँड क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात राहुल सिंह गहलोतने वादळी फलंदाजी करत १४३ चेंडूत द्विशतक झळकावले. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील हे दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान द्विशतक ठरले. राहुल जेव्हा बाद झाला तेव्हा त्याने १५७ चेंडूत २३ चौकार आणि ९ षटकारांसह २१४ धावा केल्या होत्या. राहुलची फलंदाजी सुरू असताना एक वेळ असे वाटत होते की, तो भारताचे माजी प्रशिक्षक आणि फलंदाज, ऑलराउंडर रवी शास्त्रींचा सर्वात वेगवान द्विशतकाचा विक्रम मोडतोय की काय पण शास्त्रींचा विक्रम थोडक्यात बचावला असे म्हणावे लागले. रवी शास्त्रींनी फक्त १२३ चेंडूत बडोदा…