Author: Kishor Koli

पुणे : प्रतिनिधी सनी स्पोर्ट्स किंग्डम सोमेश्वर फाऊंडेशनच्यावतीने माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या स्मरणार्थ ५७ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा ४ ऑगस्ट २०२३ पासून सनीज वर्ल्ड, पाषाण सुस रोड, पुणे येथे सुरु झाली आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने व क्रीडा जागृती यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या स्पर्धेत १५ जिल्ह्यातील एकंंदर ४३६ खेळाडूंनी भाग घेतला असून विद्यमान विश्वविजेता संदीप दिवे, माजी विश्व विजेते प्रशांत मोरे व योगेश परदेशी यांचा यात समावेश आहे. शिवाय पुरुष गटात आंतर राष्ट्रीय कॅरमपटू संदीप देवरुखकर, महम्मद घुफ्रान, अभिजित त्रीपनकर, अनिल मुंढे, राष्ट्रीय विजेता योगेश धोंगडे  तर महिला गटात…

Read More

नवीदिल्ली ः वृत्तसंस्था आपला प्रियकर सचिनसाठी सीमा ओलांडून भारतात दाखल झालेल्या सीमा हैदरला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लोकसभेचे तिकीट देणार असल्याची चर्चा रंगली आहे पण खरंच आरपीआय सीमा हैदरला निडणुकीसाठी तिकीट देणार आहे का? यासंबंधी पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पक्षाचा नेमका काय विचार आहे हे सांगितले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मासूम किशोर यांनी सांगितले होते की,  “सीमा हैदर पाकिस्तानातून भारतात आली आहे. भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी सीमाला क्लिन चीट दिल्यास आणि तिला भारतीय नागरिकत्व मिळाल्यास तिचे पक्षात स्वागत आहे. भारताचा नागरिक असलेल्या प्रत्येक व्यक्तीला निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी म्हटले.…

Read More

वृंदावन : वृत्तसंस्था प्रेम कधी, कुठे आणि कसं कोणाला मिळेल हे सांगू शकत नाही. एखाद्या ठिकाणी अचानक झालेली भेट ही काहींना आयुष्याभराचा जोडीदार देते.असाच काहीसा अनुभव भारतात देवदर्शनासाठी आलेल्या एका रशियन तरुणीला आला आहे. 36 वर्षीय तरुणी भारत दौऱ्यावर आली असता तिला आपला जोडीदार सापडला आहे. इतके च नाही तर तिने त्याच्याशी लग्नगाठही बांधली.हिंदू परंपरेप्रमाणे त्यांचा विवाहसोहळा पार पडला.यानंतर तिने आपल्या भारतीय पतीसह गोसेवाही केली. वृंदावनला धार्मिक शहर म्हणून ओळखले जाते.अनेकांच्या ह्रदयात वृंदावनसाठी एक वेगळे महत्त्व आहे.फक्त भारतातूनच नाही तर जगभरातील असंख्य भाविकांना वृंदावन आकर्षित करत असते. लाखो विदेशी नागरिकही वृंदावन येथे देवदर्शन तसेच मनाच्या शांतीसाठी येत असतात. त्यातच रशियामधील…

Read More