Author: Kishor Koli

सिडनी : वृत्तसंस्था आगामी एकदिवसीय विश्वचषकाच्या सुमारे दोन महिने आधी, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मार्की स्पर्धेसाठी १८ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.या १८ खेळाडूंमधून १५ खेळाडूंची निवड केली जाईल आणि उर्वरित खेळाडूंना राखीव ठेवण्यात येईल. विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात लाबुशेनचे नाव नाही म्हणजेच विश्वचषक योजनेतून आणि संघातून त्याला वगळण्यात आले आहे. कमिन्स व वेगवान गोलंदाज जोश हेझलवुडनेही पुनरागमन केले आहे.ऑस्ट्रेलियाला विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि नंतर भारताविरुद्ध वन डे मालिका खेळायची आहे.त्याचबरोबर या संघात तनवीर सांघा आणि ॲरॉन हार्डी हे सरप्राईज पॅकेज आहेत.३४ वर्षीय ग्लेन मॅक्सवेल दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळणार नाही कारण तो…

Read More

लखनऊ ः  वृत्तसंस्था लग्नसोहळ्यातील अनेक धक्कादायक गोष्टी बातम्यांच्या माध्यमातून समोर येतात. नवरा-नवरी नटून थटून आल्यानंतर लग्नमंडपात एखादी विचित्र घटना घडते आणि पाहुण्यांनाही धक्का बसतो.असाच एक भयंकर प्रकार उत्तर प्रदेशच्या बरेली येथे घडला आहे.लग्नाची सर्व तयारी झाली असताना नवरी लग्नमंडपात आली आणि नवऱ्याची वाट बघतच राहिली. कारण नवऱ्याने चक्क त्याच्या मेहुणीला पळवून नेले आणि नवरीला याचा पत्ताही लागला नाही. ही भयानक घटना बरेलीच्या नवाबगंज येथे घडली. नवऱ्या नवरीच्या बहिणीला पळवून नेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. नवरा-नवरीचे लग्न दोघांच्या आणि कुटुंबाच्या परवानगीनेच ठरले होत परंतु नवरीच्या बहिणीशी नवऱ्याचे अफेअर असल्याचे लग्नमंडपात घडलेल्या प्रकारानंतर समोर आले अन्‌‍‍ सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.नवऱ्याने लग्नमंडपाच्या वेशीजवळ…

Read More

ग्वाल्हेर ः वृत्तसंस्था कोर्टात अनेक प्रकरण दिर्घकाळ प्रलंबित असतात. अशी अनेक उदाहरणं आहेत. मध्यप्रदेशमधल्या ग्वालिअरमध्ये अशीच एक अजब घटना समोर आली आहे. एका जोडप्याने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केला होता. या अर्जावर तब्बल ३८ वर्षांनी निकाल देण्यात आला आहे. १९८५ मध्ये पतीने हायकोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला. या अर्जावर आता निकाल देण्यात आला असून दोघांना स्वतंत्र्य राहाण्यास परवानगी देण्यात आली आहे. तब्बल ३८ वर्षांनंतर कोर्टाने हा निकाल दिला आहे. निकालाचा हा कालावधी इतका मोठा होता की, घटस्फोटासाठी अर्ज करणाऱ्या जोडप्याची मुले या दरम्यान मोठी झाली आणि त्यांची लग्नही झाली. घटस्फोटाचे हे प्रकरण भोपाळ कोर्टापासून सुरु झाले. त्यानंतर हे प्रकरण कौटुंबिक कोर्ट, ग्वालिअर…

Read More

इस्लामाबाद ः वृत्तसंस्था पाकिस्तानात एका व्यक्तीने केलेल्या दुसऱ्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली आहे. याचे कारण आधीच ६ मुले आणि ५ मुलींचा बाप असणाऱ्या या व्यक्तीचे वय तब्बल ९५ वर्षं आहे. मोहम्मद झकारिया असे या व्यक्तीचे नाव असून २०११ मध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांची नातवंडं आणि नातवंडांची मुले पकडून एकूण ९० जण आहेत पण यानंतरही त्यांना दुसरे लग्न करण्याची इच्छा होती. विशेष म्हणजे, त्यांच्या लेकानेच त्यांचे धुमधडाक्यात लग्न लावून दिले. उत्तर- पश्चिम पाकिस्तानच्या मानसेहरा  शहरात राहणारे जकारिया यांनी पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर १२ वर्षांनी दुसरे लग्न केले आहे. मोहम्मद झकारिया यांच्या लग्नाला त्यांची ११ मुलं आणि ३४ नातवंड,…

Read More

पुणे ः प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांंनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.त्याबद्दल केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी भाष्य केले. केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह आज केंद्रीय सहकार संस्थेने निर्माण केलेल्या केंद्रीय निबंधक सहकारी संस्था कार्यालय या पोर्टलचे अनावरण करण्यासाठी पुण्यात आले होते. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख केला. “अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच आम्ही एकत्र एकाच व्यासपीठावर आलो आहोत.अजितदादा तुमच्यासाठी हीच योग्य जागा आहे पण इथे पोहोचायला तुम्ही उशीर केला”, असे विधान अमित शाह यांंनी केले. अमित शाह यांनी भाषणाला सुरुवात करताच अजितदादांचा उल्लेख करून त्यांंनी इथे (भाजपासमवेत) यायला उशीर केला…

Read More

गंगाखेड (परभणी) : वृत्तसंस्था राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि परभणीतल्या गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे भाजपात जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यामुळे भाजपाने आपल्या मित्रपक्षाचा आमदार फोडला, अशी टीकाही सुरू होती. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या आठवड्यात परभणी जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात ते रत्नाकर गुट्टे यांना भेटले होते. त्या भेटीनंतर बावनकुळे यांनी सांगितले की, आगामी विधानसभा निवडणुकीत रत्नाकर गुट्टे हे भाजपाचे गंगाखेडचे उमेदवार असतील परंतु, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज गंगाखेडला जाऊन गुट्टे यांनी भेट घेतली तसेच या भेटीनंतर जानकर यांनी जाहीर केले की, रत्नाकर गुट्टे रासप सोडून जाणार नाहीत. रासपचे प्रमुख महादेव…

Read More

पणजी : वृत्तसंस्था छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी ख्रिश्चन धर्मगुरु फादर बोलमेक्स परेरांविरोधात गोव्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोलमेक्स परेरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी वास्को पोलीस ठाण्याबाहेर राजपूत करणीसेना, बजरंग दल यांसह सुमारे १०० शिवप्रेमींनी गर्दी केली होती. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. फादर बोलमेक्स परेरा हे दक्षिण गोव्यातली सेंट फ्रान्सिस झेव्हियर्स चर्चचे फादर आहेत. किरण नाईक मुरगाव येथील इतर गावकरी यांनी फादर परेरा यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली. फादर परेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत आणि यामुळे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडू शकते असे…

Read More

डुबलिन : वृत्तसंस्था भारतीय संघ काही दिवसांत आयर्लंडच्या दौऱ्यासाठी सज्ज होणार आहे.या दौऱ्यात भारत आणि आयर्लंड यांच्यात टी-२० सामन्यांनी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी भारताच्या कर्णधारपदी जसप्रीत बुमराची निवड करण्यात आली आहे. आता भारताविरुद्धच्या या मालिकेसाठी आयर्लंडच्या संघाची निवड करण्यात आली आहे. आयर्लंडने १५ खेळाडूंचा संघ काल जाहीर केला. भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये १८ ऑगस्टपासून नियोजित तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरु होणार आहे. या आयर्लंडच्या संघात प्रामुख्याने अशा खेळाडूंचा समावेश आहे जे गेल्या महिन्यात यशस्वी विश्वचषक पात्रता मोहिमेचा भाग होते पण लीन्स्टर लाइटनिंग आणि अष्टपैलू फिओन हँडला संघात पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.जूनमध्ये झिम्बाब्वेमध्ये झालेल्या मनगटाच्या दुखापतीतून बरे…

Read More

पुणे : प्रतिनिधी विनायक निम्हण यांच्या स्मरणार्थ सानिज वर्ल्ड, पुणे येथे ५७ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेला सांघिक गटाने सुरुवात झाली.त्यापूर्वी सकाळी सानिज वर्ल्डचे मॅनेजिंग डायरेक्टर सनी निम्हण यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र शाह, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण  व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष भारत देसडला,सचिव नंदू सोनावणे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. निकाल : पुरुष सांघिक गट सातारा विजयी वि. धुळे ३-०, मुंबई विजयी वि. पालघर ३-०, जळगाव विजयी वि. कोल्हापूर २- १. महिला सांघिक गट : मुंबई विजयी वि. ठाणे ३-०, सिंधुदुर्ग विजयी वि. रत्नागिरी २-१, पुणे विजयी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी    वस्तू व सेवा कर विभागाच्या वतीने विशेष मोहीमे अंतर्गत 119 कोटींची खोटी देयके सादर करून 26 कोटींची करचोरी करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अशी माहिती वस्तू व सेवा कर  विभागाच्या जळगाव विभागाचे राज्यकर सह आयुक्त सुभाष भवर यांनी दिली आहे. बनावट बिलांच्या विक्रीमध्ये  सहभागी असलेल्या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून जळगाव येथील मे.अग्रवाल असोसिएटसची चौकशी करण्यात आली. यामध्ये मे.अग्रवाल असोसिएटसचे मालक नैनेश संतोष अग्रवाल यांनी प्रत्यक्षात कुठल्याही मालाची विक्री न करता खोटी बिले देऊन बनावट कर वजावटीचा पुरवठा केला. या प्रकरणात नैनेश अग्रवाल…

Read More