नवी दिल्ली : वृत्तसंस्था यावर्षी एकदिवसीय विश्वचषकाचे सामने भारतात भरवले जाणार आहेत.विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यात कुणाचं पारडं जड राहणार? याबाबत क्रिकेटतज्ज्ञांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतच आहेत पण धार्मिक गुरू बागेश्वर बाबा यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने अलीकडेच बागेश्वर बाबांची मुलाखत घेतली.या मुलाखतीत त्यांना क्रिकेट पाहता का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बागेश्वर बाबांनी होकारार्थी उत्तर दिले.त्यानंतर हा सामना कोण जिंकणार? असे विचारल्यानंतर बागेश्वर बाबा म्हणाले, “बाप बाप होता है”. 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यात भारतीय संघच जिंकेल, असे संकेत बागेश्वर बाबांनी…
Author: Kishor Koli
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतात होणाऱ्या भारत-पाकिस्तान वनडे विश्वचषक सामन्याची तारीख बदलवण्यात आली आहे.याशिवाय इतर आठ सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादमध्ये रविवारी १५ ऑक्टोबर रोजी होणार होता परंतु तो एक दिवस आधी म्हणजेच आता शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी त्याच ठिकाणी होणार आहे.परिणामी, दिल्लीतील अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंडचा सामना शनिवार १४ ऑक्टोबरला होणार नसून तो सामना आता रविवार १५ ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. हैदराबादमध्ये पाकिस्तानचा श्रीलंकेविरुद्धचा सामना आता गुरुवार, १२ ऑक्टोबरशिवाय मंगळवारी १० ऑक्टोबरला होणार आहे आणि लखनऊमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा ऑस्ट्रेलियाचा मोठा सामना एक दिवस मागे सरकवण्यात आला आहे आणि आता शुक्रवार १३ ऑक्टोबरऐवजी १२ ऑक्टोबरला…
मुंबई : प्रतिनिधी जीवनावश्यक वस्तुंच्या किमती एकीकडे गगनाला भिडत असताना दुसरीकडे बेरोजगारांची संख्या वाढत आहे त्यात यावर्षी महागाईने जनता होरपळून निघत आहे कारण, टोमॅटो दिडशे ते दोनशे रुपये किलोने विकला जात होता.त्यापाठोपाठ कोथिंबीर, मेथीची जुडी चाळीस ते पन्नास रुपयांना विकली गेली आणि त्यानंतर विविध भाजीपाला तसेच कडधान्यांच्या किमती देखील गगनाला भिडल्या. त्यामुळे सर्वसामान्यांचे आणि गृहिणींचे बजेट कोलमडलेले पाहायला मिळाले. मात्र, आता टोमॅटो पाठोपाठच कांदा देखील सर्वसामान्यांच्या डोळ्याला पाणी आणणार असल्याचे पाहायला मिळत आहे. कांद्याचा दर हा गेल्या काही महिन्यांपासून स्थिर होता मात्र, सध्या कांद्याच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आणि गृहिणींना पुन्हा एकदा कांदा रडवणार की काय अशी…
मुंबई ः प्रतिनिधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय घेणार आहेत. त्यासाठी सुरुवातीला ठाकरे गटातील आमदारांची बाजू ऐकून घेणार आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागलं आहे. अशात बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. आमदार अपात्रतेची निर्णय एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागेल, असे बच्चू कडू यांनी म्हटलं. यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाष्य केले आहे. बच्चू कडू काय म्हणाले? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाबाबत मजबुतीने आणि चलाखीने कामगिरी बजावली. त्यामुळे अपात्रतेचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागेल, असे विधान बच्चू कडू यांनी केले. अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल…
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट (Indian Cricket) नियामक मंडळ (BCCI) सध्या जागतिक क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात बीसीसीआयने कोट्यवधी रुपयांचा आयकर सरकारकडे जमा केला यावरूनही याचा अंदाज लावता येतो. बीसीसीआयची या आर्थिक वर्षात एकूण कमाई ७६०६ कोटी रुपये होती. त्यानंतर बीसीसीआयने सरकारला एकूण ११५९ कोटी रुपये दिले, मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ३७% अधिक कर भरला आहे. भारत सरकारचे (Indian Government) अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ८ ऑगस्ट रोजी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना बीसीसीआय (BCCI) आयकर जमा करत असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी बीसीसीआयचे गेल्या ५ वर्षातील उत्पन्न आणि त्यानंतर जमा झालेल्या कराची संपूर्ण…
लखनऊ ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. भाजपाने नाहीतर, शिवसेनेने युती तोडली नाही, असं हल्लाबोल पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. तसेच, २०२४ साली होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) विजय होणार, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केल्याचं ‘इंडिया टुडे’ला सूत्रांनी सांगितलं. महाराष्ट्रातील ‘एनडीए’च्या खासदारांना पंतप्रधान मोदींनी संबोधित केलं. तेव्हा बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “भाजपाने नाहीतर, शिवसेनेनं युती तोडली. विनाकारण वाद निर्माण करण्यात आले, तरीही आम्ही ते सहन केलं. एकीकडे सत्तेत राहायचं आणि दुसरीकडे टीका करायची, हे कसं चालणार?” बिहारमध्ये २०२० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा ७४ जागा आणि जनता…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मणिपूरवरून संसदेत आक्रमक भाषण करून तसेच मोदी सरकारवर टीकेची झोड उठवून आपले भाषण संपवून निघालेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाईंग किस दिल्याचा अतिशय गंभीर आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. असे कृत्य केवळ महिलाद्व्ोषी मनुष्यच करू शकतो. संसदेत असे कृत्य करणे अशोभनीय आहे. राहुल गांधी यांच्या या कृत्याविरोधात आम्ही लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार आहोत, असा आक्रमक पवित्रा स्मृती इराणी यांनी घेतला. विरोधी आघाडीने मोदी सरकारवर आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर संसदेत विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. अविश्वास प्रस्तावाच्या पहिल्या दिवशी भाषण न केलेल्या राहुल गांधी यांनी दुसऱ्या दिवशी जोरदार भाषण ठोकून…
मुंबई ः प्रतिनिधी कोविड घोटाळा प्रकरणात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरेंच्या काळातील आणखी एक घोटाळा बाहेर काढला आहे. मुलुंड येथे तात्पुरते कोविड सेंटर बांधण्यात आले होते. या कोविड सेंटरमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेत्याने १०० कोटींचा घोटाळा केला असल्याचा दावा किरीट सोमय्या यानी केला आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही किरीट सोमय्या यांनी केली असून याबाबतची तक्रार मुंबई पोलीस, आयकर विभाग, प्रवर्तन निदेशालय (ईडी), कंपनी मंत्रालय यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. याबाबत सोमय्या यांनी ट्वीटद्वारे माहिती दिली. मुलुंड रिचार्डसन क्रुडास मैदानावर तात्पुरते कोविड सेंटर बांधण्यात आले होते. उद्धव…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आज आणि उद्या संसदेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा केली जाणार आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधी काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी मी कुणाच्याच बाजुची नाही, असे विधान केले आहे. पुढील दोन दिवस संसदेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. यावर राहुल गांधीही बोलतील, तुमची भूमिका काय असेल? असे विचारले असता नवनीत राणा म्हणाल्या की, “तुम्ही कालच राज्यसभेतील चित्र पाहिले असेल तर आकडेवारीबाबत तुम्हाला सगळे समजले असेल. एखादे विधेयक राज्यसभेत अशा आकडेवारीने पास होत असेल तर ही मोठी…
सोलापूर : वृत्तसंस्था शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते असले तरी त्यांच्या पक्षातील अजित पवारच सगळा पक्ष घेत आता भाजपकडे गेल्यानंतर पवारांकडे राहिले ते काय, असा सवाल करत हा पक्ष आता भाजपवासी झाला असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. दरम्यान, अजित पवार भाजपकडे गेले तरी त्यांच्यावरील आरोपांपासून ते पळ काढू शकत नाहीत. यातून त्यांची सुटका होऊ शकणार नाही, असेही आंबेडकर म्हणाले. अक्कलकोट येथे जाहीर सभेसाठी आंबेडकर आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी वार्तालाप केला. यावेळी त्यांनी भाजपसह राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला. आंबेडकर म्हणाले की , शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अनुभवी…