मास्को ः वृत्तसंस्था रशियाच्या चांद्रयान मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. रशियाचे लुना-२५ हे यान चंंद्रावर कोसळलं आहे. लुना-२५ हे यान २१ ऑगस्टला चंंद्रावर अलगदपणे उतरण्याचा प्रयत्न करणार होते पण त्यापूर्वीच हे यान कोसळले आहे. रशियन अंतराळ संंशोधन संस्था रोस्कोसमॉसने ही माहिती दिली आहे. जगात चंद्राबाबत दोन मोहिमा सुरु होत्या. त्यात इस्रोची चांद्रयान-३ आणि रशियाची लुना-२५ यांचा समावेश होता. इस्रोच्या यानाने १४ जुलैला चंद्राकडे कूच केली होती. यानंतर २६ दिवसांंनी म्हणजेच १० ऑगस्टला रशियाच्या लुना-२५ यानाचे प्रक्षेपण झाले होते.चांद्रयान-३ हे २३ ऑगस्टला, तर दोन दिवस आधी २१ ऑगस्टला लुना-२५ हे यान चंद्रावर उतरणार होते. २० ऑगस्टला रात्री लुना-२५ हे यान कक्षा…
Author: Kishor Koli
मुंबई ः प्रतिनिधी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांची गुप्त भेट झाल्याची सध्या चर्चा आहे. या वृत्ताचे दादा भुसे यांनी खंडन केले असले तरी यावर आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे सध्या नाशिक शहरातच आहेत. त्याचबरोबर आमदार आदित्य ठाकरेदेखील सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. याचवेळी दोघांमध्ये गुप्त बैठक झाल्याची बातमी काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केली. तेव्हापासून यावर राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची भेट घेतली. गेल्या १७ महिन्यांपासून ईडीच्या (सक्तवसुली संचालनालय) तुरुंगात असलेले नवाब…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंडियन प्रीमियर लीग २०२४ साठी लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्सच्या संघात परतला आहे. मलिंगा जेव्हा खेळत असे तेव्हा तो मुंबई इंडियन्सच्या संघातील महत्त्वाचा गोलंदाज होता. मलिंगाच्या गोलंदाजीवर सगळेच फिदा होते. आता हाच मलिंगा त्याच्या जुन्या संघासोबत पुन्हा एकदा आयपीएल २०२४ मध्ये दिसणार आहे. कोणती जबाबदारी मिळाली? लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्सच्या संघात वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून सामील होत आहे.तो मुंबई इंडियन्समध्ये न्यूझीलंडचा क्रिकेटर शेन बाँडची जागा घेणार आहे. यापूर्वी तो राजस्थान रॉयल्सशी संबंधित होता.राजस्थान रॉयल्समध्ये वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली होती.सपोर्ट स्टाफ म्हणून मुंबई इंडियन्ससोबत मलिंगाचा हा दुसरा कार्यकाळ असेल. याआधी २०१८ मध्येही तो मुंबईच्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय निवड समिती एकदिवसीय विश्वचषकापूर्वी सर्व संभाव्य पर्यायांची तपासणी करण्यासाठी सज्ज झाली आहे. बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आज २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. मुख्य निवडकर्ता म्हणून आगरकर यांचा हा पहिलाच माध्यमांशी संवाद असेल. ते आशिया चषकासाठी संघाची घोषणा करणार आहे. याआधी सकाळी निवडकर्त्यांची बैठक होणार आहे, ज्यामध्ये टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देखील सहभागी होणार आहेत. आशिया चषक स्पर्धेसाठीच्या संघात अशाच खेळाडूंचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे जे आगामी विश्वचषक संघाच्या कल्पनेचा भाग आहेत.रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बीसीसीआय आशिया कपसाठी १५ नव्हे तर १७ सदस्यीय संघ…
रत्नागिरी : वृत्तसंस्था उदय सामंत फाऊंडेशन व रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन आयोजित भारतीय आयुर्विमा महामंडळ,इंडियन ऑइल, इन्फिगो आय केअर,ओएनजीसी व पितांबरी प्रायोजित राज्यस्तरीय आमंत्रितांच्या रत्नागिरी कॅरम लीग सिझन ६ मध्ये पालघरच्या यंगस्टरने बाजी मारली.अंतिम फेरीत त्यांनी शिवगर्जना लायन्स संघाला अतिशय अटीतटीच्या सामन्यात २-१ अशी मात करून विजय मिळविला. यंगस्टरने पहिल्या एकेरीच्या सामन्यात विश्व्विजेत्या संदीप दिवेने शिवगर्जना लायन्सच्या अहमद अली सय्यदवर २५-०, २५-५ अशी सहज मात केली मात्र यंगस्टरच्या अमोल सावर्डेकर व सिद्धांत वाडवलकर जोडीला शिवगर्जना लायन्सच्या रियाझ अकबर अली व महम्मद घुफ्रान विरुद्ध ५-१५, १-२५ असे सहज पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे तिसरा व अंतिम मिश्र दुहेरीचा सामना निर्णायक ठरला.…
जळगाव ः प्रतिनिधी अहमदाबाद, महू, असंसोल येथे होणाऱ्या अखिल भारतीय रायफल शुटींग स्पर्धांसाठी जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनच्या ८ खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे त्यात वैभव प्रमोद सोनवणे,दीपक भाऊलाल कोळी,दिलीप लक्ष्मण गवळी,भावेश प्रकाश गवळी,कुमारी सिमरा आसिफ खान आदींचा समावेश आहे. १८ ते ३० ऑगस्ट २०२३ दरम्यान अहमदाबाद (गुजराथ) येथे १० वी वेस्ट झोन शुटींग चॅम्पीयनशीप स्पर्धा तसेच १ ते १० सप्टेंबर २०२३ पर्यंत महू (मध्य प्रदेश) येथे ३२ व्या ऑल इंडिया जी.व्ही. मावळणकर शुटींग चॅम्पीयनशीप या रायफल प्रकारातील स्पर्धा होत असून ९ ते १६ सप्टेंबर पर्यंत असंंसोल (वेस्ट बंगाल) येथे होणाऱ्या ३२ व्या ऑल इंडिया जी.व्ही.मावळणकर शूटींग चॅम्पीयनशिप या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय क्रिकेट नियामक मंडळ पुरुषांच्या वरिष्ठ निवड समितीची सोमवारी (२१ ऑगस्ट) दिल्लीत बैठक होत आहे. भारतीय संघाने आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेसाठी आपल्या प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीच्या चिंतेने अद्याप संघ जाहीर केलेला नाही. पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश या देशांनी आधीच आपले संघ जाहीर केले आहेत. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने विश्वचषकासाठी तात्पुरते संघ जाहीर केले आहेत.भारताचे तीन प्रमुख खेळाडू जसप्रीत बुमराह,के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर हे दुखापतीमुळे खेळापासून दूर राहिले. राहुलने नुकतीच फलंदाजी करायला सुरुवात केली असून तो पुनरागमनासाठी तयार आहे.आता त्याची संघात निवड होते की नाही, हे पाहावे लागेल. श्रेयस अय्यरच्या फिटनेसवर अजूनही शंका…
संभाजीनगर ः वृत्तसंस्था आज सामना देखील म्हणाला आहे सांभाळून राहा, राज्याचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला गद्दारी करणाऱ्या नेतृत्वाच्या हाताखाली काम करावे लागते.ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये बैलगाडीभर सत्तर हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार असणारे पुरावे घेऊन यायचे, आधी अजितदादा चक्की पिसिंग पिसिंग म्हणायचे आणि आता अजितदादा किसिंग किसिंग चालू आहे,असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी कोणी कितीही गुडघ्याला बाशिंंग बांधून बसले तरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जिंकणार असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला. शिंदे गट लढेल किंवा भाजप लढेल,आम्हाला त्यांच्याशी काही घेणंं देणं नाही.त्यांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुरून उरणार असे म्हणत दानवेंनी…
बाकू (अझरबैजान) : वृत्तसंस्था भारताचे ग्रँडमास्टर डी. गुकेश आणि विदित गुजराथीचे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. त्याचवेळी प्रज्ञानंद आणि अर्जुन यांच्यातील लढत दोन डावानंतर बरोबरीत राहिल्यामुळे आता ‘टायब्रेकर’मध्ये या लढतीचा निर्णय लागेल. गुकेशला माजी जगज्जेता अग्रमानांकित मॅग्नस कार्लसन, तर विदितला अझरबैजानच्या निजात अबासोवविरुद्ध पराभव पत्करावा लागला. प्रज्ञानंद पहिल्या डावात अर्जुनकडून पराभूत झाला होता. मात्र, बुधवारी दुसऱ्या डावात प्रज्ञानंदने मुसंडी मारताना ७५ चालीत अर्जुनवर मात करून पारंपारिक पद्धतीमधील डाव १-१ असे बरोबरीत सोडवली. आता जलदगती पद्धतीमधील ‘टायब्रेकर’मध्ये या लढतीचा विजेता ठरेल. गुकेश कार्लसनविरुद्ध पहिला डाव हरला होता. त्यामुळे दुसऱ्या डावात कार्लसनला बरोबरीही पुरेशी होती. काळय़ा मोहऱ्यासह दुसऱ्या डावात…
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याने पक्षातील अनेक निष्ठावान आणि जुन्या नेत्यांनी अजित पवारांची साथ केली आहे. तर, शरद पवारांकडे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच सहकारी थांबले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सातत्याने होत असतात. यावरून जयंत पाटलांनी सडेतोड उत्तर दिले आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात जयंत पाटलांचा सुनिल तटकरेंसोबतचा एक फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यानंतर, जयंत पाटील अजित पवार गटात जाणार असल्याचीही चर्चा रंगली होती. त्याच काळात जयंत पाटील यांच्या भावाला ईडीची नोटीस आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर जयंत पाटीलही शरद पवारांची साथ सोडणार असल्याचं सांगण्यात येत होतं.…