मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लागू केलं आहे. या कराचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संतप्त भावना उमटू लागल्या आहेत.केंद्राच्या या निर्णयाविरोधात राज्यातले शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.अशातच केंद्र सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.फडणवीस यांनी म्हटले आहे की, कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. २,४१० रुपये प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना कांदा प्रश्नावरून टोला लगावला आहे.…
Author: Kishor Koli
पिंपरी : वृत्तसंस्था केंद्र सरकार केवळ सत्ता टिकवण्याचा विचार करत आहे. सरकार नामर्दासारखे वागत आहे.केवळ सत्तेसाठी ग्राहकाचा, खाणाऱ्याचा विचार केला जातो मग पिकवणाऱ्या विचार का केला जात नाही. सरकारने ही नालायक वृत्ती सोडली पाहिजे, अशा घणाघाती शब्दांत आमदार बच्चू कडू यांनी मोदी सरकारवर प्रहार केला. कांद्यावर लादण्यात आलेले ४० टक्के निर्यातशुल्क आणि किरकोळ बाजारपेठेत कांद्याच्या वाढलेल्या दरावरुन सध्या राज्यात प्रचंड गदारोळ सुरु आहे. पिंपरी येथे ‘दिव्यांग विभाग आपल्या दारी’या कार्यक्रमासाठी आलेल्या बच्चू कडू यांनी या सगळ्या परिस्थितीवर सविस्तरपणे भाष्य केले.यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार ताशेरे ओढले. ज्या लोकांना कांदा परवडत नसेल त्यांनी लसुण किंवा मुळा खाण्यात काही गैर नाही.…
मुंबई ः प्रतिनिधी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असे आता मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. शरद पवारांविषयी दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी एक वक्तव्य केले. त्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण देतांना सारवासारव केली आहे. शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशात नाही असे आपण म्हणतो. पण दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्या एकट्याच्या बळावर महाराष्ट्रातल्या जनतेने एकदाही राष्ट्रवादीला पूर्ण बहुमत दिले नाही. शरद पवार पूर्ण बहुमतावर एकदाही मुख्यमंत्री झाले नाहीत.ममता बॅनर्जी स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या,मायावतीही झाल्या होत्या मात्र शरद पवार हे उत्तुंग नेते असतानाही राष्ट्रवादीने ठराविक संख्येच्या पुढे मजल मारलेली नाही. पक्षाचे…
ठाणे ः प्रतिनिधी भाजपा नेते आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचा उल्लेख करत केलेल्या एका वक्तव्यामुळे ते सध्या चर्चेत आले आहेत. गावितांवर सध्या विरोधकांकडून टीका सुरू आहे. एका भाषणादरम्यान, विजयकुमार गावित म्हणाले, “तुम्ही ऐश्वर्या रायला बघितलेय ना? ती बंगळुरूच्या समुद्राच्या किनारी राहणारी. ती दररोज मासे खायची. बघितले ना तिचे डोळे? तसे तुमचेही डोळे होणार. मासे खाण्याचे दोन फायदे आहेत. मासे खाल्ले तर बाईमाणूस चिकनी दिसायला लागते, डोळेपण तरतरीत दिसतात. कुणीही बघितले तरी पटवूनच घेणार. आपली त्वचाही चांगली दिसते.” यावेळी गावित यांनी मासे खाण्याचे इतर फायदे, त्यातल्या तेलाचे फायदे सांगितले. विजयकुमार गावित यांच्या या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था येत्या ३० ऑगस्टपासून बहुप्रतीक्षित असा आशिया चषक २०२३ खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंका अशा दोन देशांमध्ये खेळवली जाणार आहे. पहिला सामना ३० ऑगस्ट रोजी पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियाचा पाकिस्तान आणि नेपाळसह अ गटात समावेश आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका ब गटात आहेत. या आशिया चषकासाठी बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय संघाची घोषणा केली. अपेक्षेप्रमाणे जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन झाले आहे, तर संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे असेल. या संघात तिलक वर्माची…
मुंबई ः प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या काळात गृहमंत्री असताना पदाचा गैरवापर करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप अनिल देशमुखांवर आहे. १०० कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी त्यांना जेलवारीही झाली होती. आता याप्रकरणात अनिल देशमुख यांनी भाजपाला लक्ष्य करत त्यांनी मोठा आरोप केला आहे. “भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा समझोता करण्यासाठी दबाव होता.समझोता करण्यास नकार दिला, त्यामुळे परमवीर सिंग यांना माझ्यावर खोटे आरोप करायला लावले आणि माझ्यावर कारवाई करायला लावली, हे शंभर टक्के खरे आहे. ज्या पद्धतीने माझ्यावर दबाव होता, मी सरळ सांगितले की, मी कोणत्याही पद्धतीने समझोता करणार नाही आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझ्यावर रेड पडली. आणि माझ्यावर कारवाई करण्यात आली, ही वस्तुस्थिती आहे”, अशी…
जळगाव : प्रतिनिधी येथील जिल्हा कारागृहात बंदी असलेला कैदी सिव्हिल हॉस्पिटलात उपचारासाठी दाखल झाला होता. उपचारानंतर कारागृहात परत जात असताना त्याच्या तपासणीत चप्पलेत लपवलेला गांजा आढळून आला. याबाबत हवालदाराने दिलेल्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील संभाजीनगरातील विठ्ठल उर्फ माऊली तुकाराम हटकर हा न्यायालयीन बंदी असून त्याला प्रकृती अस्वास्थामुळे कारागृहातून जिल्हा रुग्णालयातील कैदी कक्षात उपचारासाठी बुधवारी दाखल करण्यात केले होते. उपचार पूर्ण झाल्यावर दोन दिवसांनी शुक्रवारी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयातून कारागृहात परत नेण्यात आले. त्यावेळी त्याने घातलेल्या चप्पलमध्ये आठ ग्रॅम गांजा आढळून आला. याप्रकरणी कारागृहातील हवालदार सुरेश बडगुजर यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद…
जळगाव : प्रतिनिधी फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी आर चौधरी दिनांक ३१ जुलै रोजी प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झालेत. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा मित्रपरिवार, गौरव ग्रंथ प्रकाशन समिती, मधुस्नेह संस्था परिवार आणि कौटुंबिक सदस्य यांचेतर्फे कमल पॅराडाईजमध्ये भव्य गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजन गौरव ग्रंथ समिती, मित्रपरिवार आणि कौटुंबिक सदस्य आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह शाल, श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. तसेच मधुस्नेह संस्था परिवारातर्फे आमदार शिरीष चौधरी यांचेहस्ते सत्कार करण्यात आला. मधुस्नेह परिवारातर्फे शुभेच्छापत्राचे वाचन प्राध्यापक सागर धनगर यांनी केले. गौरव ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉ. सतीश देशपांडे…
मुंबई : प्रतिनिधी जळगावातील राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीच्या पथकाकडून नुकतीच छापेमारी करण्यात आली होती.या कारवाईदरम्यान ईडीने तब्बल १ कोटी रुपयांची रोकड आणि ३९ किलो सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त केले होते.या दागिन्यांची किंमत तब्बल २५ कोटी रुपयांच्या घरात आहे मात्र या छाप्यात ईडीच्या हाती १३०० किलोपैकी केवळ ४० किलो सोने हाती लागल्याची चर्चा रंगू लागली आहे. राजमल लखीचंद ज्वेलर्सचे मालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्यावरील ईडी कारवाईपाठी राजकीय दबाव असल्याची चर्चाही रंगली आहे. ईश्वरलाल जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि पक्षाचे खजिनदार होते. त्यामुळे ईडीच्या या कारवाईचा संबंध शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय वादाशी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कांँग्रेसच्या नव्या वर्किंग कमिटीची घोषणा काल करण्यात आली असून या कमिटीमध्ये महाराष्ट्रातील आठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे मात्र पूर्वीच्या समितीत असलेले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांंना आता वगळण्यात आले आहे तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचा समावेश नव्या वर्किंग कमिटीत नसल्याचे दिसत आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्यावेळी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी प्रचारासाठी थेट संगमनेरला आले होते.त्या निवडणुकीवेळी ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांंच्यासह अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचे चित्र होते. अशा परिस्थितीत थोरात निष्ठेने पक्षासोबत राहिले. शिवाय थोरात हे गांधी परिवाराच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे राहुल गांधी…