Author: Kishor Koli

जळगाव : प्रतिनिधी परिवर्तन जळगाव संस्थेतर्फे जेष्ठ वास्तूविशारद शिरीष बर्वे यांचा सन्मान करण्यात आला. जळगाव शहरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि वास्तुशास्त्र विषयात कार्य करणारे शिरीष बर्वे हे उत्तम वास्तू विशारद म्हणून ओळखले जातात. त्यांना यापूर्वी यंग आर्किटेक्ट ऑफ एशिया या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेले आहे. कल्पकता आणि नाविन्यपूर्णता यांच्या बळावर त्यांनी निर्माण केलेल्या अनेक वास्तू आपल्याला पाहायला मिळतात. पण या सोबतच जळगाव शहरातून जाणाऱ्या हायवेचे चौपदरीकरण व्हावे यासाठी न्यायलयीन लढाई लढली होती. यासोबतच पर्यावरणाच्या क्षेत्रातही त्यांचे कार्य आहे. सोबतच गेल्या अनेक वर्षांमध्ये सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीत देखील त्यांचे योगदान राहिलेले आहे. आजवरच्या त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून परिवर्तन प्रेक्षक सभासद…

Read More

मुंबई : प्रतिनिधी आमदार अपात्रतेबाबत ठाकरे आणि शिंदे गट या दोन्ही आमदारांची सुनावणी विधानसभा अध्यक्षांकडे पूर्ण झाली असून आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. १० जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्षांना निर्णय सुनावण्याची मुदत आहे. त्यातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आक्षेप घेतला आहे. ज्यांच्याकडून निकालाची अपेक्षा आहे त्यांनी ज्यांच्यावर सुनावणी सुरू आहे त्यांची भेट घेणे हे संशयास्पद आहे असे शरद पवारांनी म्हटले आहे. शरद पवारांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत म्हटले की, ज्यांच्यापुढे प्रकरण आहे आणि ज्यांची केस आहे. ती केस मांडणे चुकीचे नाही. परंतु ज्यांच्यासमोर केस मांडली आहे आणि…

Read More

कोलकाता : वृत्तसंस्था संगीत क्षेत्रात विख्यात असलेले उत्साद रशिद खान यांचे आज (मंगळवारी) निधन झाले.वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. संगीत सम्राट अशी ओळख असलेले उस्ताद रशिद खान हे गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. ही झुंज अपयशी ठरली. कोलकाता या ठिकाणी असलेल्या रुग्णालयात त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. उस्ताद राशिद खान यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि मुलगी असा परिवार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याविषयीची घोषणा केली.आम्ही त्यांना वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केले पण त्यांची प्राणज्योत मालवली असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

Read More

नाशिक : प्रतिनिधी अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाला निमंत्रित न केल्याने शिवसेनेच्या ‘उबाठा’ गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे नाशिकच्या श्री काळाराम मंदिरात आरती करणार असल्याने ठाकरे यांच्या आरतीच्या भूमिकेला छेद देण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यापूर्वीच श्री काळाराम मंदिरात आरती करणार आहेत.भाजपकडून शिवसेनेला चेकमेट देण्याचा हा प्रयत्न राज्यभर चर्चेत आला आहे. २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहे. त्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून भाजपकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. नाशिकमध्ये ‘महाविजय २०२४’ च्या परिपूर्तीसाठी मंगळवारी (ता. ९) नाशिकसह चार लोकसभा मतदारसंघांतील स्थितीचा आढावा घेतला गेला आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, प्रदेश कार्यालय प्रभारी तथा उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘इंडिया’तील घटक पक्षांशी जागावाटपासाठी काँग्रेसच्या वाटाघाटी होत असल्या तरी, स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची वेळ आली तर त्यासाठी देखील तयारी केली जात आहे. लोकसभेच्या ५४१ जागांचा आढावा घेतला जात असून प्रत्येक मतदारसंघात निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. या निरीक्षकांकडून अहवाल सादर झाल्यानंतर काँग्रेस महत्त्वाच्या राज्यांतील जागावाटपावर अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ जागांसाठीही निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहे. कोल्हापूरसाठी पृथ्वीराज चव्हाण, सांगलीसाठी सतेज पाटील, साताऱ्यासाठी रवींद्र धंगेकर, जळगावसाठी यशोमती ठाकूर, रावेरसाठी प्रणिती शिंदे, वर्ध्यासाठी नितीन राऊत, अमरावतीसाठी चंद्रकांत हंडोरे, हिंगोलीसाठी अशोक चव्हाण, नांदेडसाठी विजय वडेट्टीवार, परभणीसाठी रजनी पाटील, भिवंडीसाठी अनिस अहमद,…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था वर्षभर 20-20 आंतरराष्ट्रीय सामन्यापासून दूर राहिलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानविरुद्ध संघात दिलेली संधी संघ निवडीनंतर चोवीस तासाच्या आत कळीचा मुद्दा ठरत आहे. एकदिवसीय सामन्यात निर्णायक सामन्यात आलेले अपयश आणि तोपर्यंत या दोन प्रमुख फलंदाजांनी दाखवलेला सूर आणि दोघांचेही निवृत्तीच्या वाटेवर असलेले वय लक्षात घेता दोघांनाही ट्व्‌ोन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी एक अखेरची संधी द्यावी अशा मागणीने जोर धरला होता. विशेष म्हणजे दोन्ही खेळाडू विश्वचषक स्पर्धेसाठी तयार आहेत असे त्यांच्याकडून अजून समोर आलेले नाही. अशा वेळी निवड समितीने दक्षिण आफ्रिकेत जाऊन अनेक खलबते करून या दोघांबरोबर प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मन वळवल्याचे बोलले जात…

Read More

जयपूर : वृत्तसंस्था भाजपने काँग्रेसला पराभूत करत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. भाजपने भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री बनवलें. सरकार स्थापन झाल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानमधील करणपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार रुपिंदर सिंग कुन्नर यांनी भाजपचे उमेदवार आणि कृषीमंत्री सुरेंद्रपाल सिंग यांचा पराभव केला आहे. कांँग्रेसचे रुपिंदर सिंग यांनी ११ हजार२८३ मतांनी विजय मिळवला. त्यांना ९४ हजार ९५० मते मिळाली. कांँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या निवडणुकीतील विजयानंतर रुपिंदर सिंग कुन्नर यांचे अभिनंदन केले आहे.गेहलोत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,करणपूरच्या जनतेने भाजपच्या अभिमानाचा पराभव केला आहे. इथल्या जनतेने भाजपला धडा शिकवला आहे.…

Read More

मुंबई : प्रतिनिधी जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे बंडखोरी केली आणि भाजपसोबत सत्तेत सहभागी होऊन ते मुख्यमंत्रीही झाले. शिंदे यांच्या बडानंतर उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना निकाल देण्याचे आदेश दिले. त्यानंतर यासंदर्भात अध्यक्षांसमोर सुनावणी झाली. या सुनावणीतील पुरावे, कागदपत्रे, साक्षी अशी कार्यवाही पूर्ण होत अखेर शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाची तारीख निश्चित झाली आहे. १० जानेवारीला दुपारी ४ वाजेपर्यंत या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निकालाबाबत शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देणार?त्यांच्यासमोर कोणते पर्याय आहेत? याचीच चर्चा राज्यभरात सुरू झाली आहे.…

Read More

नवीदिल्ली : वृत्तसंस्था बिल्किस बानो सामुहिक बलात्कार प्रकरणातील ११ आरोपींची शिक्षा माफ करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला होता. या निर्णयावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या निर्णयासंदर्भात बिल्किस बानो यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. अखेर बिल्किस बानो यांना न्याय मिळाला असून गुजरात सरकारने या ११ आरोपींची शिक्षा माफ करण्याचा घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे. त्यामुळे गुजरात सरकारला हा मोठा दणका मानला जात आहे. काय आहे बिल्किस बानो प्रकरण? २००२ च्या गुजरात दंगलींदरम्यान बिल्किस बानो यांच्यावर ११ आरोपींनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. त्यापाठोपाठ त्यांच्या कुटुंबातील सात जणांची निर्घृण हत्याही करण्यात आली होती. त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या…

Read More

रायपूर : वृत्तसंस्था देशांतर्गत क्रिकेटमध्ये रियान परागची दमदार कामगिरी सुरूच आहे. रायनने रणजी ट्रॉफी हंगामातील पहिल्याच सामन्यात आसामसाठी तुफानी खेळी केली आहे. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात रायनने रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील दुसरे सर्वात जलद शतक झळकावले. पहिल्या डावात स्वस्तात बाद झाल्यानंतर आसामचा संघ छत्तीसगडविरुद्ध फॉलोऑन खेळत आहे. रायनचे ५६ चेंडूत शतक आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या २२ वर्षीय अष्टपैलू रायन परागने अवघ्या ५६ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. त्याने ७ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील हे दुसरे सर्वात वेगवान शतक आहे. सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम ऋषभ पंतच्या…

Read More