पल्लिकल : वृत्तसंस्था भारताचा पाकिस्तानबरोबरचा सामना पावसामुळे रद्द झाला. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत आणि तिथे पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे जसा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाऊस पडला तसा जर भारत आणि नेपाळ सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होऊ शकते,याचे समीकरण आता समोर आले आहे. भारत आणि पाकिस्तानचा सामना पावसामुळे रद्द झाला त्यामुळे दोन्ही संघांना समान गुण दिले पण पाकिस्तानचा मात्र चांगलाच फायदा झाला कारण पाकिस्तानचा संघ आता सुपर – ४ मध्ये पोहोचला आहे. पण भारत मात्र अजून सुपर – ४ मध्ये पोहोचू शकलेला नाही पण आता जर नेपाळबरोबरचा सामना पण पावसामुळे रद्द झाला तर नेमकं काय होणार, हा प्रश्न भारतीय…
Author: Kishor Koli
जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व हॉकी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या नेहरू चषक हॉकी स्पर्धा जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत रविवारी झालेल्या १७ वर्षातील मुलांच्या गटात बियाणी पब्लिक स्कूल भुसावळने बी झेड उर्दू हायस्कूल भुसावळचा ३-० ने पराभव करीत अंतिम विजेतेपद पटकाविले. अशाप्रकारे नेहरू चषक स्पर्धेत बियाणी पब्लिक स्कूलने १५ वर्ष आतील मुलांच्या गटात,१७ वर्षा आतील मुलींच्या गटात व आज १७ वर्षा आतील मुलांच्या गटात विजय संपादन करून तिहेरी मुकुट मिळवलेला आहे. या संघाना चषक देण्यासाठी जळगाव मेमन बिरादरीचे जिल्हाध्यक्ष कादर कच्ची, महाराष्ट्र हॉकीच्या उपाध्यक्षा डॉक्टर अनिता कोल्हे, हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख, उपाध्यक्ष निवेदिता…
जालना : वृत्तसंस्था जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात शनिवारी राष्ट्रवादी काँंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व भाजपचे खासदार उदयनराजे एका व्यासपीठावर आले. उदयनराजे सुरुवातीला मनोज जरांगे व त्यांच्या सहकारी आंदोलकांची भेट घेण्यासाठी सराटीला दाखल झाले.त्यांचा आंदोलकांशी संवाद सुरू असतानाच तिथे शरद पवार यांचा ताफा धडकला. अंतरवाली सराटीत शुक्रवारी पोलिसांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार केला होता.त्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार व खासदार उदयनराजे यांनी शनिवारी अंतरवाली सराटीला भेट दिली. शरद पवारांनी रुग्णालयात जावून जखमींची भेट घेतली. त्यानंतर ते प्रत्यक्ष उपोषणस्थळी जावून आंदोलकांना भेटले. ते तिथे पोहोचण्यापूर्वीच उदयनराजे मनोज जरांगे व त्यांच्या सहकारी आंदोलकांशी संवाद साधत…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्र घेणे इष्ट आहे आणि निवडणूक खर्च कमी होण्यासारखे त्याचे अनेक फायदे आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी करणे हे व्यावहारिकदृष्टय़ा कठीण आहे, असे मत माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी एस कृष्णमूर्ती यांनी व्यक्त केले. मात्र, एकत्र निवडणुका घेऊन पैसे आणि वेळ वाचवण्यास त्यांनी अनुकूलता दर्शवली. एका वृत्तसंस्थेशी बोलताना कृष्णमूर्ती म्हणाले की, एकत्र निवडणूक घेतल्यास, प्रचाराचा वेळ वाचणे, निवडणूक खर्च कमी होणे यांसारखे फायदे आहेत. त्याच वेळी ही कल्पना फार आकर्षक असली तरी व्यावहारिकदृष्ट्या त्याची अंमलबजावणी करणे आव्हानात्मक आहे, असा इशारा त्यांनी दिला. यामध्ये काही प्रशासकीय अडचणी आहेत, एकदम मोठा खर्च करावा…
जळगाव ः प्रतिनिधी महिला क्रिकेट संघाचे निवड चाचणी सामने हे पहिल्यांदाच जळगावात होत आहे. यामध्ये सहभागी प्रत्येक स्पर्धेकांनी सर्वोत्तम खेळ केला तर यश नक्कीच मिळेल. पुरूषांच्या क्रिकेट प्रमाणेच आता महिलांच्या क्रिकेटला चांगली संधी आहे यासाठी चांगला सराव करण्याचे आवाहन करत, आवश्यक सुविधा देण्यासाठी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन इरिगेशन प्रयत्नशील राहिल अशी ग्वाही उद्घाटनप्रसंगी अशोक जैन यांनी दिली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ महिला व 19 वर्षा आतील प्राथमिक क्रिकेट संघाची निवड जाहिर झाली असून त्यांचे निवड चाचणीचे सामन्यांचे उद्घाटन जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूलच्या क्रिकेट मैदानावर झाले,त्या प्रसंगी ते बोलत होते. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन इरिगेशन सिस्टीम्सच्या…
न्यूयॉर्क : वृत्तसंस्था गतविजेत्या स्पेनच्या कार्लोस अल्कराझने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील आपली अपेक्षित घोडदौड कायम राखताना तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. अल्कराझने दुसऱ्या फेरीत लॉईड हॅरिसचे आव्हान 6-3, 6-1, 7-6 (7-4) असे सहज मोडून काढले. अल्कराझच्या गटातून बहुतेक मानांकित खेळाडू आपले आव्हान राखून आहेत त्याचवेळी दुसऱ्या गटातून नोव्हाक जोकोविचचा मार्ग अधिक सुकर होत आहे.जोकोविचचा समावेश असलेल्या गटातून चौथा मानांकित होल्गर रुन, पाचवा मानांकित कॅस्पर रुड, सातवा मानांकित स्टेफानोस त्सित्सिपास यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. अल्कराझच्या गटातून तिसरा मानांकित डॅनिल मेदवेदेव, सहावा मानांकित यान्निक सिन्नेर, आठवा मानांकित आंद्रे रुब्लेव आणि 12वा मानांकित ॲलेक्झांडर झ्वेरेव हे आघाडीचे खेळाडू स्पर्धेत कायम आहेत. माजी विजेत्या…
जळगाव : प्रतिनिधी नुकतेच भारताने चांद्रयान ३ हे अवकाशयान चंद्राच्या दक्षिण भागात सुखरूप पणे उतरवून एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.याचा यशोत्सव सुधर्मा संस्थेच्या वतीने येथील विविध झोपडपट्टीतील ५० विद्यार्थ्यांसमवेत “भाऊचे उद्यान” येथे साजरा केला. कार्यक्रम प्रसंगी मराठी विज्ञान परिषदेचे सचिव दिलीप भारंबे उपस्थित होते. त्यांचे स्वागत सुधर्मा चे अध्यक्ष हेमंत बेलसरे यांनी भगवतगीता देउन केले. याप्रसंगी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले. दिलीप भारंबे यांनी, न्युटनचा सिद्धांत, दाबाची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी ३०० पिनांवर एका पायावर उभे राहणे, पाणबुडीत वापरले जाणारे पॅरीस्कोप, भुपृष्ठिय तणावाचे मापन, सेंन्ट्रिफ्युगल फोर्स एनर्जीचा उपयोग, केंद्रगामी ऊर्ध्वगामी बल, उर्जा अक्षयता नियम, तुतारीचा उपयोग करून ध्वनी तिव्रता…
जळगाव : प्रतिनिधी स्पर्धेच्या युगात प्रत्येकात विविध गुंणकौशल्य असणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची बौद्धिक पातळी वेगवेगळी असल्याने विद्यार्थ्यांना जर शैक्षणिक प्रगती साधायची असेल तर त्यांच्या जवळ प्रखर स्मरणशक्ती व एकाग्रता मोठ्या प्रमाणात असणे गरजेचे आहे. त्या अनुसरून विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती व एकाग्रता वाढावी, त्यांचे महत्व कळावे या उद्देशाने एसडी-सीड तर्फे “स्मरणशक्ती व एकाग्रता विकास” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन नंदिनीबाई वामनराव मुलींचे ज्युनियर कॉलेज, जळगाव येथे करण्यात आले. कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. विवेक काटदरे हे होते. शक्ती पेक्षा बुद्धी श्रेष्ठ ही म्हण आज पण शंभर टक्के खरी आहे. कोणत्याही क्षेत्रात उत्तम यश मिळविण्यासाठी कुशाग्र बुद्धिमतेला पर्याय नाही. त्यांनी सागितले की, प्रत्येक…
जळगाव : प्रतिनिधी लोकसभा, विधानसभा या निवडणुका यापूर्वी या देशात ३१ वर्ष एकत्र पार पडत होत्या. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ आता पंतप्रधान यांची इच्छा दिसते. जेवढ्या दिवस निवडणुका लांबतील, तेवढं नव्याने गठीत झालेली इंडिया मजबूत होईल आणि याचा फटका भाजपाला बसेल, म्हणून हा मध्यममार्ग काढला असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे तर काही होऊ शकते असा टोलाही खडसे यांनी लगावला आहे. देशात एक देश एक निवडणूक होणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. यासाठी केंद्र सरकारकडून एक समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या अहवालानंतर यावर शिक्कामोर्तब होणार आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत…
जळगाव : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शहरासह जिल्ह्याभरातून विद्यार्थ्यी विद्यार्थिनींची शिक्षणासाठी येतात; परंतु त्यांना वेळेत पोहचण्यासाठी एसटी सुविधा नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. हजारो विद्यार्थ्यी विद्यार्थिनींना शहरातून येण्यासाठी प्रचंड फरफट अवहेलना विद्यापीठात सुरू आहे. जळगाव शहरातून येणार्या विद्यार्थ्यी विद्यार्थ्यीनींना तसेच त्यांच्या पालकांना साधी बसची सोय सुद्धा हे विद्यापीठ करू शकले नाही. एसटी बस हायवेला थांबतात तेथून किमान तीन किलोमीटर पायी चालत या विद्यापीठात यावे लागते. म्हणजे शिक्षणापेक्षा अधिक मेहनत जाण्या-येण्यात होत असल्यामुळे या विद्यार्थ्यांचा बराच वेळ आणि श्रम यामध्ये खर्च होतात. परंतु या विद्यापीठाच्या राक्षसी प्रशासनाला याची कुठलीही तमा नाही. या विद्यापीठात येणार्यांवर रिक्षाचालकांची प्रचंड दादागिरी येथे…