मुंबई ः प्रतिनिधी मराठा आरक्षणाची मागणी करत जालन्यातल्या अंतरवाली सराटी या गावात उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या लाठीहल्ल्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनावर पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असणार, अशा दावा विरोधी पक्षातील नेते करत आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले. अशातच आता सत्ताधारी शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्याच्या वक्तव्यामुळे नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेनेच्या शिंदे…
Author: Kishor Koli
जळगाव ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जळगावातील सागर पार्क येथे ५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्हाभरातून हजारोंचा जनसमुदाय उपस्थित राहील असा अंदाज घेऊन भव्य मंडप आणि बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सभास्थळाची सोमवारी सायंकाळी पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी पहाणी केली तसेच या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर शरद पवारांच्या राज्यभर सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येवला आणि बीडची सभा गाजल्यानंतर जळगावात ही भव्य सभा…
मुंबई : प्रतिनिधी जालन्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात जे काही उपोषण सुरू आहे. तेथे नुकतीच अतिशय दुर्दैवी घटना घडली. पोलिसांनी त्या ठिकाणी लाठीचार्ज आणि अश्रूधूरचा प्रयोग केला. अशा प्रकारच्या बळाचा वापर करण्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. मी यापूर्वी देखील पाच वर्ष गृहमंत्री होतो. जवळपास आरक्षणासंदर्भात दोन हजार आंदोलने झाली. आम्ही त्यावेळी देखील कधी बळाचा वापर केलेला नाही. आता देखील बळाचा वापर करण्याचे कुठले कारण नव्हते. सर्वप्रथम ज्या निष्पाप नागरिकांना इजा झाली आहे. जे जखमी झाले आहेत, त्यांच्या प्रती शासनाच्या वतीने मी क्षमा मागतो. अशी भूमिका उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मांडली. मंत्रिमंडळ उपसमितीने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती देण्यासाठी…
चाळीसगाव : प्रतिनिधी आरोग्य विभागाच्या आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी जागा भाडेतत्त्वावर सुरू करण्यासाठी तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी तथा पाचोरा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम किसन लांडे (वय५३) यास ५० हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी धुळे लाच लुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे चाळीसगाव शहरातील रहिवासी आहे. त्यांचे घर व जागा भाडेतत्त्वावर आरोग्य विभागाच्या आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी देण्याकरीता जळगाव येथील जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाला अर्ज केला होता. त्यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. देवराम लांडे हे कारभार पाहत होते. नियमित भाडे सुरू करण्याच्या मोबदल्यासाठी डॉ. लांडे यांनी ५० हजाराची मागणी केली. तक्रारदार यांनी धुळे…
जळगाव : प्रतिनिधी चिन्ह असलं काय आणि नसलं काय आमच्याकडे पवार साहेब आहेत. तुमच्याकडे जे चिन्ह आहे ते तुम्ही ठेवा मात्र अख्खा महाराष्ट्र हा शरद पवार साहेबांसोबत राहून लढणार आहे. स्वार्थी राजकारण आम्हाला जमत नाही असे टीकास्त्र आमदार रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर सोडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाच्या कोर्टात असलेल्या प्रकरणावर प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्याला आमदार रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. जळगावातील खेडी येथील आयोजित मेळाव्यानंतर आमदार रोहित पवार पत्रकारांशी बोलत होते. 1999 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला. त्यावेळी लोकांनी घड्याळाकडे बघितले नव्हते तर शरद पवार साहेबांकडे बघितले होतं. आम्ही म्हणत…
जालना : वृत्तसंस्था मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता पुन्हा एकदा आंदोलन उभे राहिले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन सुरू असून गेल्या सात दिवसांपासून त्यांनी उपोषणही पुकारले आहे. उपोषणाचा आजचा सातवा दिवस असताना त्यांनी सराकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान,या मराठा आंदोलनासाठी अनेक राजकीय नेते पुढे आले आहेत. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन अनेक राजकीय नेते मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत आहेत. दरम्यान, आज (४ सप्टेंबर) छत्रपती संभाजी नगर बंदची हाक देण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकार काय भूमिका घेत आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
लंडन : वृत्तसंस्था भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरिश साळवे यांनी तिसऱ्यांदा लग्न केले आहे. ब्रिटिश नागरिक असलेल्या ट्रिनासह त्यांनी विवाह केला आहे. हरिश साळवे आणि ट्रिना यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. हरिश साळवेंच्या लग्न सोहळ्याला नीता अंबानी, ललित मोदी, उज्जवला राऊत यांच्यासह इतर काही प्रतिष्ठितांची उपस्थिती होती. हरिश साळवे यांच्या पहिल्या पत्नीचे नाव मीनाक्षी होते. ३८ वर्षांच्या संसारानंतर हरिश साळवे यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. त्यानंतर २०२० मध्ये ब्रिटिश महिला कॅरोलिनसह हरीश साळवे विवाहबद्ध झाले होते. आता त्यांनी तिसरे लग्न केले आहे. ब्रिटनमध्ये हरिश साळवेंचा विवाह सोहळा पार पडला. ६८ वर्षीय हरिश साळवे हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टीस करतात.…
मुंबई : प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीच्यानंतर राज ठाकरेंनी आपले मनोगत मांडले. मराठा आरक्षणाचा हा जो विषय आहे त्यातून तोडगा काढण्यासाठी नक्की प्रयत्न करु तसेच याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा करु असे आश्वासन राज ठाकरेंनी दिले आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या नावाने आश्वासन देणाऱ्या आणि ते पूर्ण न करणाऱ्या सगळ्यांवर टीका केली तसेच निवडणुकीच्या वेळी पुन्हा तुमच्याकडे हा विषय घेऊन येतील तेव्हा यांच्या भुलथापांना बळी पडू नका असेही आवाहन राज ठाकरेंनी केले. सगळ्या आंदोलकांशी मी आत्ता बोलत होतो. ज्या ज्या वेळी तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्या तुमच्यापर्यंत…
साईमत जळगाव प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीमार समर्थनीय नसून, यात चौकशीत निष्पन्न झालेल्या दोषींना शिक्षा होईलच. मात्र, विरोधक हे सत्तेत असतानाही ते मराठा आरक्षण देऊ शकले नाहीत. त्यांना आता समाजाविषयी कळवळा वाटत असून, त्यांचे प्रेम पुतणा-मावशीचे आहे. यात राजकारण करू नका, असे आवाहन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केले. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अद्ययावत शस्त्रक्रियागृहाच्या उद्घाटनानंतर ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडले. जालना जिल्ह्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील कंडारी येथे घडलेल्या हत्याकांडातील जखमी तिसऱ्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावंडांची शुक्रवारी रात्री निर्घृण हत्या केली होती. या घटनेतील एका जखमीचा उपचारादरम्यान रविवारी, ३ सप्टेंबर रोजी पहाटेेच्या सुमारास मृत्यू झाल्याने हत्याकांडातील मृतांची संख्या तीन झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. कंडारीतील हत्येप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. सविस्तर असे की, भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील शांताराम भोलानाथ साळुंखे (वय ३३) आणि राकेश भोलानाथ साळुंखे (वय २८) या वीटभट्टी कामगार भावंडांची जुन्या वादातून दहा संशयितांनी चाकू, तलवार व लोखंडी रॉड डोक्यात मारून निर्घृण हत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कंडारी गावातील महादेव टेकडी परिसरातील…