Author: Kishor Koli

नवीदिल्ली : वृत्तसंस्था संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. पहिल्यांदा विरोधी पक्षांना अधिवेशनाचा विषय,अजेंडा काहीही सांगण्यात आलेले नाही. देशाच्या हिताचे निर्णय घ्यायचे असतील तर ‘इंडिया’मधले पक्ष तुम्हाला सहकार्य करू इच्छितात. मात्र या विशेष अधिवेशनाचे कारण काय आहे त्याची कल्पना विरोधी पक्षांना दिली गेली पाहिजे तर आम्हाला त्याविषयी ठरवता येईल. संसदेचे विशेष अधिवेशन १८ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेत हे अधिवेशन चालणार आहे. १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीत हे अधिवेशन असणार आहे. राज्यसभेनेही खासदारांना सूचित केले आहे की १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन होणार आहे तेव्हा सर्व खासदारांनी…

Read More

कोलंबो : वृत्तसंस्था श्रीलंकेने काल (मंगळवारी) अफगाणिस्तानवर विजय साकारला. या विजयासह श्रीलंकेच्या संघाने आशिया कपच्या सुपर ४ फेरीत प्रवेश केला आहे. पण या विजयानंतर आता श्रीलंकेसाठी वाईट बातमी आली आहे. कारण श्रीलंकेचा मॅचविनर खेळाडू आता मॅच फिक्सिंगमध्ये दोषी सापडला आहे. त्यामुळे आता या खेळाडूला मॅच फिक्सिंगच्या आरोपांखआली अटकही करण्यात आली आहे.श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सचित्रा सेनानायकेला बुधवारी मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. आज सकाळी शरणागती पत्करल्यानंतर त्याला क्रीडा भ्रष्टाचार अन्वेषण युनिटने अटक केली. तीन आठवड्यांपूर्वी त्याला परदेशात जाण्यास न्यायालयाने बंदी घातली होती. सेनानायके याच्यावर लंका प्रीमियर लीगच्या (एलपीएल) २०२० साली झालेल्या हंगामात मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी लखनऊ येथे नुकतेच झालेेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील १९ व्या जागतिक शांंतता आणि एकता उत्सव ‘कॉनफ्लूएंस २०२३’ मध्ये जळगावच्या किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलने डंका वाजवला आहे.उत्सवातील विविध स्पर्धेत सहभागी झालेल्या २० विद्यार्थ्यांंच्या संघाने तब्बल ७ स्पर्धेत ८ बक्षिसे पटकावली आहेत. विजयी संघ सर्वोत्कृष्ट विजेतेपदाची ट्रॉफी घेऊन जळगावात पोहचताच त्यांचे शाळा व्यवस्थापन व पालकांतर्फे जंगी स्वागत करण्यात आले. जगातील सगळ्यात मोठी शाळा म्हणून नावाजलेली लखनऊ येथील सिटी मांॅटेेसरी स्कूलतर्फे ३० ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान डब्ल्यूयूसीसी ऑडिटोरियम लखनऊ येथे १९ व्या जागतिक शांतता आणि एकता उत्सव ‘कॉनफ्लूएंस २०२३’ मध्ये देशविदेशातील अनेक आमंत्रित शाळा स्पर्धेत सहभागी होत असतात. जळगावातील किड्स गुरुकुल…

Read More

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला गटात सलग दुसऱ्या दिवशी नामांकित खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला. गतविजेत्या इगा श्वीऑनटेकपाठोपाठ अमेरिकेची तिसरी मानांकित जेसिका पेगुला व विम्बल्डन उपविजेत्या पाचव्या मानांकित टय़ुनिशियाच्या ओन्स जाबेऊरचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्याच वेळी पुरुषांत अग्रमानांकित कार्लोस अल्कराझ, तिसरा मानांकित डॅनिल मेदवेदेव यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या मॅडीसन कीजने आपल्याच देशाच्या पेगुलाला ६-१, ६-३ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. कीजचा सामना चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वोड्रोउसोव्हाशी होणार आहे. मार्केटाने अमेरिकेच्या पेटन स्टर्न्सला ६-७ (३-७), ६-३, ६-२ असे नमवले. दुसऱ्या मानांकित अरिना सबालेन्काने दारिया कसात्किनावर ६-१, ६-३ असा सरळ सेटमध्ये विजय साकारला.…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी जगप्रसिद्ध सातारा हिल हाफ मॅरेथॉन नुकतीच साताऱ्यातील येवतेश्वर डोंगरमाथ्यावर संपन्न झाली. त्यात भुसावळ स्पोर्ट्‌स अँड रनर्स असोसिएशनच्या उमेश घुले, तरुण बिरिया, संजय भदाने, कौस्तुभ मंत्री, प्रियंका मंत्री, प्रदीप सोलंकी, अजय आंबेकर, गणसिंग पाटील, प्रवीण पाटील या धावपटूंनी २१ किमी धावून यशस्वी सहभाग नोंदविला. समुद्रसपाटीपासून ११०० मीटर उंचीवर डोंगराच्या रस्त्याने धावत जाऊन ही स्पर्धा पूर्ण करणे प्रत्येक धावपटूसाठी आव्हान आहे. यावर्षी ७५०० हून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. त्यापैकी केवळ ५९८५ धावपटू सदरची अवघड स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करू शकले. पोलीस परेड ग्राउंडपासून सकाळी ६.३० वाजता या स्पर्धेस सुरुवात झाली. प्रसंगी खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक,…

Read More

यावल : प्रतिनिधी गणेशोत्सव निमित्ताने सोमवार दि.४ रोजी यावल पोलीस स्टेशन आवारात शांतता समितीची बैठक यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,डीवायएसपी कुणाल सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.या अति महत्त्वाच्या बैठकीत यावल नगरपरिषद,सार्वजनिक बांधकाम विभाग यावल, विक्रम कंपनी यावल यांचे अधिकारी किंवा त्यांचा प्रतिनिधी कोणीही उपस्थित नसल्याने गणेशोत्सव साजरा करताना येणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा करताना अनेक अडचणी आल्या. शांतता समिती बैठकीत यावल शहरातील अतिक्रमणासमोर अतिक्रमण होत असलेल्या अतिक्रमणाबाबत चर्चा झाली. शांतता समितीच्या बैठकीत प्रथम गणेशोत्सव साजरा करताना येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात उपस्थितांकडून चर्चा करण्यात आली. शांतता समिती बैठकीत यावल शहरात व ग्रामीण भागात यावल पोलीस कार्यक्षेत्रात गणेशोत्सव साजरा करताना यावल पोलिस स्टेशन तर्फे…

Read More

वरणगाव : प्रतिनिधी शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या एका मोठ्या व्यापारी संकुलातुन दिवसा ढवळ्या गुटखा सर्रासपणे लहान – मोठ्या दुकानदारांना होलसेल भावात विक्री केला जात आहे . मात्र, या प्रकाराकडे पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने या ” गुटखा किंग ” विक्रेत्याची चांगलीच मुजोरी वाढली असुन या गुटखा किंगला पाठबळ कुणाचे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे . मानवी शरीराला घातक असलेल्या व कॅन्सर सारख्या आजाराला आमत्रंण देणाऱ्या रसायन मिश्रीत गुटख्याची विक्री तसेच निर्मितीला महाराष्ट्र राज्यात बंदी घालण्यात आली आहे . तसेच अवैधरित्या विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे शासनाने पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाला सक्त…

Read More

मुंबई ः प्रतिनिधी मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाता यावे म्हणून सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेची घोषणा करण्यात आली. यामुळे 75 विद्यार्थ्यांना दरवर्षी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत परदेशी शिष्यवृत्तीसाठी सरकारने दोन हजार कोटी रुपये दिले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावरून ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी चार प्रश्न विचारले आहेत. संजय राऊतांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “काल राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले, सारथीच्या परदेशी शिष्यवृत्तीसाठी आम्ही दोन हजार कोटी रुपये दिलेत. मुख्यमंत्री महोदय ही बघा सारथीच्या परदेशी शिष्यवृत्तीची अवस्था. आणखी किती फसवणूक मराठा समाजाची करणार?” सरकारला विचारले चार प्रश्न 1) ‘सारथी’द्वारे पदवीसाठी…

Read More

श्रीगोंदा, अहमदनगर : वृत्तसंस्था नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा या तालुक्यावर गेल्या अनेक वर्षांपासून एकच नेता सत्ता गाजवतोय… ते नाव म्हणजे भाजपचे आमदार बबनराव पाचपुते…. जनता पक्षाचे आमदार म्हणून 1980 मध्ये पहिल्यांदा त्यांचा विधानसभेत प्रवेश झाला. पुढे बबनराव पक्ष बदलत राहिले, सात वेळा सात चिन्हांवर निवडून येण्याचा त्यांच्या नावावर विक्रम आहे. 2014 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता याच बबनरावांना आव्हान देण्यासाठी एका तरुणाचे नाव समोर येत आहे. यात विशेष गोष्ट अशी की, त्यांचाच पुतण्या त्यांच्याविरोधात मैदानात उभा ठाकणार आहे. साजन पाचपुते…. भाजपाचे आमदार बबनराव पाचपुते यांचा पुतण्या…. साजन पाचपुते हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात गेल्याने श्रीगोंद्यात आता पाचपुते विरुद्ध पाचपुते असा…

Read More

पुणे ः प्रतिनिधी पुण्याच्या सिंहगड रोड भागातील रायकर मळा परिसरात महावितरणमधील एका वरिष्ठ तंत्रज्ञाचा (टेक्निशियन) तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनोहर गार्डनजवळील खंडोबा मंदीर रोड परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गोपाळ कैलास मंडळे (वय 32, रा. ओवी अंगण कॉलनी, जाधवनगर, रायकर मळा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने सिद्धांत दिलीप मांडवकर (वय18,रा. रायकरमळा,धायरी) या संशयिताला ताब्यात घेतले आहे. याबाबत सोमवारी रात्री उशीरापर्यंत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा…

Read More