हांगझोऊ : वृत्तसंस्था श्रीकांतने पुरुष एकेरीच्या सामन्यात व्हिएतनामच्या फाट ले डुकला २९ मिनिटे चाललेल्या सामन्यात २१-१०, २१-१० असे पराभूत करत दुसऱ्या फेरीत आगेकूच केली. २०२१च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या श्रीकांतचा सामना पुढच्या फेरीत कोरियाच्या ली युन जियुशी होईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता सात्त्विकसाईराज व चिराग जोडीने पुरुष दुहेरीत हाँगकाँगच्या चो हिन लोंग व लुइ चुन वेइ जोडीला २१-११, २१-१६ असे सरळ गेममध्ये नमवले.जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या भारतीय जोडीचा सामना आता इंडोनेशियाच्या रोली कार्नाडो व डॅनियल मार्टिनशी होईल. मिश्र दुहेरीत साई प्रतीक व तनीषा क्रॅस्टोने मकाऊच्या लियोंग लोग चोंग व वेंग चि एंगला २१-१८,२१-१४ अशा फरकाने पराभूत केले.…
Author: Kishor Koli
नवीदिल्ली : वृत्तसंस्था जगभरातील प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून नोबेल पारितोषिक समजले जाते.नोबेल पुरस्कारांची घोषणा आजपासून सुरु झाली आहे. कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी एमआरएनए या लसीची निर्मिती करणाऱ्या वैज्ञानिकांना यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.कैटेलिन कैरिको आणि डू वीजमैन यांना शरीर विज्ञान किंवा औषधशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. जेव्हा कोरोनाने जगभरात हात पाय पसरले होते, त्यावर कोणतेही औषधोपचार नव्हता वा इलाज नव्हता. जगभरातला प्रत्येक शास्त्रज्ञ औषधे शोधण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा कोरोनावरील लस शोधण्याचे दिव्य काम कैटिलिन कैरिको आणि डू वीजमैन यांनी केले. या दोन्ही शास्त्रज्ञांनी जेव्हा जग कोरोनाच्या काळात लढत होते त्यावेळी २०२० मध्ये या लशीच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरु केले होते.…
पाटणा : वृत्तसंस्था सध्या देशभर लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीच्या काही महिने आधीच बिहार सरकारने सोमवारी (२ ऑक्टोबर) जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, बिहारची एकूण लोकसंख्या १३ कोटीहून अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे.राज्यातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ६३ टक्के लोक हे इतर मागासवर्गीय (ओबीसी) समुदायाचे असल्याचे जनगणनेतून समोर आले आहे. या जनगणनेत असे दिसून आले आहे की, बिहारमधील १३ कोटी लोकसंख्येपैकी अनुसूचित जातींचा वाटा १९ टयांहून अधिक आहे तर अनुसूचित जमाती १.६८ टक्के इतके आहेत. याशिवाय राज्याच्या लोकसंख्येच्या १५.५२ टक्के लोक उच्च जाती किंवा ‘सवर्ण’ समुदायाचे आहेत. सर्वेक्षणाच्या तपशीलवार विभाजनावरून, राज्यात मागासवर्गीय लोकसंख्या २७ टक्के…
अमृतसर : वृत्तसंस्था आज देशभर गांधी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज अमृतसरच्या गोल्डन टेम्पलला भेट दिली. येथे त्यांनी गुरबानी किर्तन ऐकले तसेच सामुदायिक सेवाही प्रदान केली. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने चर्चेत येत आहेत.कधी ट्रकमधून प्रवास तर कधी गॅरेजमध्ये भेट दिल्याचे त्यांचे फोटो बरेच व्हायरल झाले. भारत जोडो यात्रेमुळेही ते अनेकापर्यंत पोहोचले. दरम्यान, त्यांचा आजचा एक व्हिडीओही चर्चेचा विषय ठरला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशातील सर्वात मोठ्या पक्षाचे माजी अध्यक्ष राहिलेले राहुल गांधी यांनी गोल्डन टेम्पलमध्ये जाऊन भांडी घासली आहेत. डोक्यावर निळा स्कार्फ घालून राहुल गांधींनी सुवर्ण…
हांगझोऊ : वृत्तसंस्था २०२३च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विद्या रामराजने इतिहास रचला आहे. तिने महान ॲथलीट पीटी उषाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. विद्याने ४०० मीटरची शर्यत ५५.४३ सेकंदात पूर्ण केली. यासह तिने महिलांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत पीटी उषाच्या ३९ वर्षीय राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी केली. १९८४ मध्ये पीटी उषाने ही शर्यत ५५.४२ सेकंदात पूर्ण केली होती. आता विद्यानेही हे केले आहे. यापूर्वी विद्याचा सर्वोत्तम विक्रम ५५.४३ सेकंद होता. ती बहरीनच्या अमीनत ओये जमालसह हीट १ मधून थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. सहभागी होताना विक्रम केला विद्याची बहीण नित्याही आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होत आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत एकत्र भाग घेणाऱ्या विद्या…
नागपूर : वृत्तसंस्था देशभरात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असली तरीही महाराष्ट्रात मात्र येत्या ४८ तासात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे, मुंबईसह उपनगरात आजही जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे.अशातच कोकण ते गोवा किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी आणखीच पोषक वातावरण निर्माण झाले आहे. हवामान खात्याने कोकणात अतिवृष्टी तर कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्ली येथील राजघाट येथे जाऊन गांधींना अभिवादन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, दिल्लीचे उपराज्यपाल वी. के. सक्सेना, उपराज्यपाल जगदीप धनखड यांच्यासहीत अनेक नेते राजघटावर बापूंना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पोहोचले. “गांधी जयंतीनिमित्त मी महात्मा गांधींना नमन करतो. त्यांच्या शिकवणीमुळे आमचा मार्ग उजळत आहे. महात्मा गांधींचा प्रभाव जागतिक आहे, संपूर्ण मानवजातीला एकता आणि करुणेची भावना पुढे नेण्यासाठी प्रेरित करते. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू या. गांधींचे विचार प्रत्येक तरुणाला परिवर्तनासाठी पात्र बनवून त्यांचे स्वप्न साकार…
मलकापूर/ बुलढाणा : प्रतिनिधी नांदुरा-मलकापूर मार्गावर भीषण अपघात झाला आहे. चालकाचेंनियंत्रण सुटल्याने एक भरधाव आयशर ट्रक रस्त्यालगतच्या झोपडीत घुसला. ट्रकने झोपडीत झोपलेल्या १० मजुरांना चिरडले असून या अपघातात चार मजूर जागीच ठार झाले आहेत तर ६ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या सहा जखमींपैकी दोघांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेले मजूर हे चिखलदऱ्यातून नांदुऱ्यात रस्त्याच्या कामासाठी आले होते. प्रकाश बाबू जांभेकर (२६), पंकज तुळशीराम जांभेकर (२६), अभिषेक रमेश जांभेकर (१८) अशी अपघातात निधन झालेल्या तीन मजुरांची नावे आहेत. चौथ्या मजुराचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्याचे नाव कळू शकलेलेे नाही. अपघातातील…
हांगझोऊ : वृत्तसंस्था चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील बीडच्या सुपुत्राने सुवर्णमय कामगिरी केली आहे. अविनाश साबळे यांने आशियाई स्पर्धेत इतिहास रचला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. अविनाश साबळेच्या या यशाने भारताला आणखी एका सुवर्णपदकावर नाव कोरता आले आहे. अविनाश साबळे याने काही महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये रौप्य पदक मिळवले होते. यावेळी आशियाई स्पर्धेत तो सुवर्णपदक मिळवेल अशी आशा सर्व भारतीयांना होती. चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्णपदकावर नाव कोरले आहे.
नवीदिल्ली : वृत्तसंस्था महागाईच्या दणक्याने ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झाली आहे. कारण महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. ऑईल मार्केटिग कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केली असून त्याअंतर्गत 19 किलो वजनाचा एलपीजी गॅस सिलिंडर 209 रुपयांनी महागला आहे. ऑक्टोबर महिन्यात नवरात्रोत्सव आणि दसऱ्यासारखे सण आहेत. अशातच तेलाच्या किमती वाढवल्याने याचा सामान्य नागरिकांवर मोठा परिणाम होणार आहे. दरम्यान, 209 रुपयांच्या वाढीनंतर नवी दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 1,731.50 रुपये इतकी होणार आहे. गेल्या महिन्यात 1 सप्टेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 157 रुपयांची कपात करण्यात आली होती. आता एका महिन्यातच सिलिंडरच्या किमतीत 209 रुपयांची…