हांगझाऊ : वृत्तसंस्था चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेेत भारताने आणखी एक सुवर्णपदक पटकावले आहे.स्क्वॉशमध्ये मिश्र दुहेरीत भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. दीपिक पल्लीकल आणि हरिंदर पाल सिंग या जोडीने भारतासाठी हे पदक जिंकले आहे.या जोडीने अंतिम फेरीत मलेशियाचा पराभव करून विजेतेपद पटकावले.भारताने हा सामना २-० ने जिंकला. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे हे २० वे सुवर्णपदक आहे. भारताने यापूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेत इतकी सुवर्णपदके जिंकली नव्हती.या खेळांमधील भारताचे हे ८३ वे पदक आहे. भारताची आशियाई स्पर्धेतील ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. कठीण स्पर्धेत शानदार विजय भारताची स्कोअर लाइन २-० अशी असेल पण हा सामना भारतीय संघासाठी सोपा नव्हता. भारताने मलेशियाच्या आयफा…
Author: Kishor Koli
नवीदिल्ली : मोदी सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत कोट्यवधी लाभार्थ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. केंद्रातील मोदी सरकारने गॅस सिलिंडरच्या सबसिडीमध्ये २०० रुपयांऐवजी ३०० रुपये एवढी वाढ केली आहे म्हणजेच उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना ६०० रुपयांत घरगुती गॅस सिलिंडर मिळणार आहे.३७ दिवसांत मोदी सरकारने दुसऱ्यांदा दर कमी केले आहेत.ज्याचा फायदा १० कोटी लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. तत्पूर्वी २९ ऑगस्टला सरकारने २०० रुपये गॅस सिलिंडरचे दर कमी केले होते. ज्याचा फायदा देशातील सर्वच ग्राहकांना झाला होता.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था वैद्यक आणि भौतिकशास्त्रापाठोपाठ रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. क्वांटम डॉट्सचा शोध लावणाऱ्या तीन शास्त्रज्ञांना यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे. यंदाच्या रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या मौंगी जी.बावेंडी, कोलंबिया विद्यापीठाचे लुईस ई. ब्रूस आणि नॅनोक्रिस्टल टेक्नोलॉजी या संस्थेत काम करणारे ॲलेक्सी आय. एकिमोव्ह या तीन शास्त्रज्ञांना संयुक्तपणे हा पुरस्कार दिला जाणार आहे.क्वांटम डॉट्सचा शोध आणि संश्लेषणासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने बुधवारी या पुरस्काराची घोषणा केली.
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडून भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्तेत सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला कात्रजचा घाट दाखवला आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्तेत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नाराज असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. त्यामुळे नाराज अजित पवार पुन्हा एकदा कोणता मोठा निर्णय घेणार का? इथपर्यंत ही चर्चा जाऊन पोहोचली होती. मात्र, आता या नाराजीचा सर्व उलगडा बुधवारी ( ४ ऑक्टोबर) झाला आहे. राज्यातील सुधारित पालकमंत्री जाहीर करण्यात आले असून अजित पवार गटातील तब्बल सात मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यात पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे आले आहे तर जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे अनिल…
नांदेड : वृत्तसंस्था येथील शासकीय रुग्णालयात ४८ तासांत १६ नवजात बालकांसह ३१ रुग्ण दगावले आहेत. घटनेनंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालकाची एक समिती चौकशी नांदेडला दाखल झाली आहे. डॉ.भारत चव्हाण, डॉ.मीनाक्षी भट्टाचार्य आणि बालरोग तज्ञ डॉ.जोशी यांनी प्रत्येक वॉर्डात जाऊन पाहणी केली. विष्णुपुरी येथील डॉ.शंकरराव चव्हाण मेडिकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूचे तांडव सुरूच आहे. मागील २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात १२ नवजात बालकांचा समावेश होता. या घटनेनंतर सोमवारी रात्री पुन्हा अत्यवस्थ असलेल्या चार नवजात बालकांसह सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील ४८ तासात मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ३१ पर्यंत गेली आहे.
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत झाली. या बैठकीत दिवाळीनिमित्त शंंभर रुपयात आनंदाचा शिधा राज्यातील नागरिकांना देण्याचा निर्णय झाला. यावेळच्या आनंदाचा शिधा देताना त्यामध्ये मैदा, पोह्याचा देखील समावेश केला जाणार आहे. दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे ४ जिन्नस होते मात्र आता यामध्ये दोन जिन्नसांची भर पडली आहे. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था यावर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.अमेरिकेचे शास्त्रज्ञ पियरे अगोस्तिनी, जर्मनीचे फेरेन्स क्रॉज आणि स्वीडनच्या ॲनी एल. हुईलर यांना यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे. या तीन शास्त्रज्ञांनी अशी उपकरणे विकसित केली आहेत,ज्याद्वारे ॲटोसेकंदात इलेक्ट्रॉनचे जग पाहता येईल. ॲटोसेकंद म्हणजे १/१,०००,०००,०००,०००,००० वा भाग. याद्वारे त्यांनी ब्रम्हांडाचे वय शोधून काढले.ब्रह्मांडाचे वय जाणून घेण्यापासून ते आरोग्य तपासण्यांपर्यंत अनेक गोष्टींसाठी अगोस्तिनी, क्रॉज आणि हुईलर यांचे संशोधन कामी आले आहे. ॲनी एल. हुईलर यांनी १९८७ मध्ये एक निरीक्षण नोंदवलं की, जेव्हा नोबल गॅसमधून इन्फ्रारेड लेजर लाईट टाकली जाते, तेव्हा प्रकाशाचे अनेक ओव्हरटोन दिसतात. प्रत्येक ओव्हरटोनची वेगळी सायकल आहे. जेव्हा…
हांगझोऊ : वृत्तसंस्था आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत आणि नेपाळ यांच्यातील क्रिकेट सामना मंगळवारी झाला.ही लढत भारताने २३ धावांनी जिंकली.भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ४ बाद २०२ धावा केल्या होत्या.भारताकडून यशस्वी जयस्वालने ४९ चेंडूत १०० धावा केल्या.उत्तरादाखल नेपाळला २० षटाकत ९ बाद १७९ धावा करता आल्या. भारताने ही लढत जिंकली असली तरी नेपाळने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्याचे कौतुक होत आहे. भारताने फक्त २३ धावांनी विजय मिळवला.या सामन्यात यशस्वीने भलेही शतक केले असले तरी एक खेळाडू होता ज्यामुळे भारताने ही मॅच जिंकली आणि त्याचे नाव आहे रिंकू सिंह. रिंकूने अखेरच्या षटकात विस्फोटक खेळी केली ज्यामुळे भारताने २००च्या पुढे मजल मारली.…
हांगझाऊ : वृत्तसंस्था आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाची विजयी मालिका कायम आहे. ग्रुप स्टेजमध्ये अपराजित राहून भारताने सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. महिला संघाने त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात हाँगकाँगचा १३-० अशा मोठ्या फरकाने पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाकडून सुवर्णपदक जिंकण्याची अपेक्षा आहे. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात, भारतीय स्ट्रायकर वंदना कटारिया, उपकर्णधार दीप ग्रेस एक्का आणि दीपिकाने हॅट्ट्रिक साधली, ज्यामुळे भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला हॉकी स्पर्धेत हाँगकाँगवर १३-० असा विजय मिळवला. शेवटच्या गट सामन्यातील विजयाने भारतीय संघाचे मनोबल अधिक उंचावले आहे. वंदना कटारिया मैदानावर आज जबरदस्त फॉर्ममध्ये होती, तिने दुसऱ्या, १६व्या आणि ४८व्या मिनिटाला…
हांगझोऊ : वृत्तसंस्था भारताची स्टार बॉक्सिंगपटू लवलिना बोर्गोहेनने आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ७५ किलो वजनी गटात अंतिम फेरीत प्रवेश केला. टोकियो ऑलिंपिकमध्ये कांस्य जिंकणाऱ्या लवलिनाने यासह पॅरिस ऑलिंपिकचे तिकीट मिळवले. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत १३ सुवर्ण, २४ रौप्य आणि २५ कांस्य अशी ६२ पदके जिंकली आहेत. चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत लवलिनाने सेमीफायनलमध्ये थायलंडच्या मानेकोन बॅसनचा ५-० असा पराभव केला. निकहत जरीन, प्रीती आणि परवीन हुडा यांच्यानंतर पॅरिस ऑलिंपिकमध्ये स्थान निश्चित करणारी लवलिना ही चौथी भारतीय बॉक्सर ठरली आहे. तिरंदाजीतही पदक निश्चित ओजस प्रवीण देवतळे आणि अभिषेक यांनी पुरुषांच्या तिरंदाजीतील कंपाउंडमध्ये अंतिम फेरीत पोहोचले आहे.त्यामुळे या…