जळगाव : प्रतिनिधी जातीचे दाखले नोंदींवरून सरसकट मिळावेत, रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना कोणतेही कागदपत्र न मागता जातवैधता प्रमाणपत्र मिळावे यांसह अन्य मागण्यांची शासन-प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आदिवासी कोळी समाजबांधवांनी पुन्हा अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून, शनिवारी संतप्त समाजबांधवांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर झोपा काढो आंदोलन केले. प्रलंबित मागण्यांसाठी गतवर्षी १० ऑक्टोबरपासून २६ दिवस आदिवासी कोळी समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन केले होते. त्यावेळी शासन-प्रशासनाने दोन महिन्यांत सर्व मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मागण्यांची पूर्तता न झाल्यामुळे चार जानेवारीपासून आदिवासी कोळी आंदोलन समन्वय समितीतर्फे अन्नत्याग आंदोलन सुरु करण्यात आले आहे. आंदोलन शहरातील शिवतीर्थ मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानजीक चालू…
Author: Kishor Koli
नवी दिल्ली : वृत्तसंस्था विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची शनिवारी बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तत्पूर्वी, संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीचे संयोजक पदाचा प्रस्ताव नाकारला आहे. आघाडीचे अध्यक्ष आणि निमंत्रक पदाच्या निवडीसाठी इंडिया आघाडीची बैठक आज आभासी ( व्हर्च्युअल) स्वरूपात झाली. या बैठकीला मल्लिकार्जुन खर्गे, ,नितीश कुमार, एमके स्टॅलिन, शरद पवार, डी राजा,ओमर अब्दुल्ला, राहुल गांधी, सीताराम येचुरी, लालू यादव-तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल, डी राजा, शरद पवार उपस्थित होते. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आणि शिवसेना ठाकरे नेते उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित नव्हते. बैठकीमध्ये बिहारचे…
मुंबई : प्रतिनिधी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी दोन दिवसांपूर्वी पार पडली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अखेर त्यांचा फैसला सुनावला. दोन्ही गटांना त्यांनी पात्र ठरवले पण एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल देत उद्धव ठाकरे गटाला धक्का दिला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या घटनेत झालेले बदल, उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुखपदी झालेली निवड यावर प्रश्न उपस्थित केले. याबद्दल निवडणूक आयोगाला माहिती देण्यात आली नसल्याचा दावा त्यांनी केला. हा दावा ठाकरे गटाने खोडून काढला आहे. २०१३ मध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना पक्षप्रमुखपदी निवड करण्यात आली.त्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली. शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुखपद निर्माण करण्यात आले.त्या पदावर ठाकरेंची निवड झाली. याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने आपला संघ जाहीर केला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. पण पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ यावेळी जाहीर केला आहे.भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी माि लकेला २५ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या संघाचे कर्णधआरपद रोहित शर्माकडे कायम ठेवण्यात आले आहे.भारताचा उपकर्णधार हा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह असणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या संघात तीन यष्टीरक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक लोकेश राहुलचा आहे. राहुलबरोबर के एस भरत आणि ध्रुव जुरेल या दोन यष्टीरक्षकांचा समावेश या संघात करण्यात आला आहे. या संघात…
मुंबई : प्रतिनिधी मुंबईला रायगडशी जोडणाऱ्या शिवडी ,न्हावा, शेवा अटल सागरी सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. देशातील सर्वांत मोठा सागरी सेतू म्हणून प्रचिती असलेल्या या सेतूबद्दल नरेंद्र मोदी यांनी गौरवोद्गार काढले. तसेच, अटल सेतूबाबत बोलताना त्यांनी काँग्रेसच्या काळात बांधलेल्या वांद्रे-वरळी सीलिंकशी याची तुलना केली आणि काँग्रेसवरही टीकास्र डागले. आज जगातील सर्वांत मोठा विशाल अटल सेतू देशाला मिळाला. हे आमच्या संकल्पातील प्रमाण आहे. भारताच्या विकासासाठी आम्ही सागराशीही मुकाबला करू शकतो. लाटांविरोधात लढू शकतो. आजचा कार्यक्रम संकल्पातून सिद्धीचे परिमाण आहे. २४ डिसेंबर २०१६ चा दिवस विसरू शकत नाही. या दिवशी अटल सेतूच्या भूमिपूजनासाठी आलो होतो. तेव्हा मी छत्रपती…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा चारही शंकराचार्यांनी विरोध केला असून अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यास कोणतेही हिंदूशास्त्र परवानगी देत नाही,अशी स्पष्टोक्ती चारही शंकराचार्यांनी केली असून आमचा हा निर्णय मोदीविरोधी नाही तर शास्त्राच्या विरोधी भूमिका आम्ही घेऊ शकत नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.चारही शंकराचार्यांनी राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे पाठ फिरवल्याच्या बातम्या माध्यमात आल्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी या प्रकरणी सारवासारव करतांना सांगितले की, द्वारिकापीठ आणि शृंगेरी शारदा पीठाच्या शंकराचार्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे तर पुरी गोवर्धनपीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनीही या सोहळ्याला पाठिंबा दिला आहे मात्र ते आता सोहळ्यास उपस्थित राहणार नसून योग्य…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था क्रिकेटमधील हायव्होल्टेज सामना म्हणजे भारत विरूध्द पाकिस्तान. भारत आणि पाकिस्तानचे संघ जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा सामन्याचा थरार वेगळाच असतो मात्र, आता बहुतांशी या दोन संघांमधील सामने कोणत्या ना कोणत्या मोठ्या टूर्नामेंटमध्ये पाहायला मिळतात. गेल्या १३ वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. या दोन्ही संघांमध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका २०१३ मध्ये झाली होती पण आता लवकरच दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका पाहायला मिळणार, अशी बातमी आली आहे. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेचे संकेत दिले आहेत मात्र, याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतेही अपडेट आलेले नाही. पीसीबीने मालिकेचे दिले संकेत पाकिस्तान…
मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२३ च्या राज्याच्या यादीत महाराष्ट्राने पहिला क्रमांक मिळवला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्राला ‘बेस्ट परफॉर्मन्स स्टेट’ च्या प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भातील पोस्ट मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राला मिळालेल्या या यशाबद्दल राज्यातील जनता, महानगरपालिका, सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतींचे अभिनंदन केले आहे. ‘महाराष्ट्रातील स्वच्छता प्रेमी नागरिकांच्या योगदान आणि सफाई, स्वच्छता कामगारांच्या मेहनतीमुळे आपण हे अव्वल स्थान पटकावले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. स्वच्छ अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी राबणारे हातच या यशाचे खरे हिरो असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ…
नाशिक : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी सव्वा बारा वाजेला नाशिक येथे आगमन होईल. येथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. दुपारी साडेतीनच्या सुमाराला, मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन करतील. या मार्गाने प्रवाससुद्धा करणार आहेत. नवी मुंबई येथे दुपारी ४.१५ च्या सुमारास एका सार्वजनिक कार्यक्रमात ते सहभागी होतील. या कार्यक्रमात ते विविध विकासकामांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. सुलभ गतिशीलतेला चालना देण्यासाठी मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) बांधण्यात आला असून त्याचे नाव आता ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू करण्यात आले आहे. या पुलाची पायाभरणीदेखील पंतप्रधानांच्याच…
अमळनेर: प्रतिनिधी येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्यनगरीच्या जागेत विविध पुरोगामी पुस्तकांच्या पताका लावलेला नांगर फिरवून प्रसिद्ध विचारवंत डॉ. संग्राम पाटील यांनी वैचारिक पेरणी करीत भूमिपूजन केले. आर. के. पटेल उद्योगसमूहाचे उद्योगपती प्रवीण पाटील अध्यक्षस्थानी होते. मंचावर ग. स. बँकेचे संचालक राम पवार, खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, प्रसिद्ध साहित्यिक डॉ. मिलिंद बागूल, प्रा. शिवाजीराव पाटील, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका तिलोत्तमा पाटील आदी उपस्थित होते. डॉ. पाटील यांनी, विचार करून प्रश्न विचारणे आणि सत्य सांगण्याची संत तुकारामांची विद्रोही परंपरा १८ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या…