जेरुसलेम : वृत्तसंस्था पॅलेस्टाईन दहशतवाद्यांनी इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. त्यानंतर इस्रायलकडून युद्धाची घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास पॅलेस्टाईन दहशतवाद्यांनी इस्रायलच्या हद्दीत येणाऱ्या परिसरांवर डझनभर क्षेपणास्त्रे डागली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा केली. इस्रायल सरकारने आपल्या नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. गाझा पट्टीतून इस्रायलच्या रहिवासी भागांमध्ये क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले आहेत. यानंतर इस्रायली लष्कराने भोंगे वाजवून नागरिकांना सतर्क केले.या भोंग्याचे आवाज देशाची आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी तेल अविवपर्यंत ऐकू आले.शनिवारी पहाटे झालेली बॉम्बफेक अर्धा तास चालली. इस्रायलचे बचाव दल मॅगन डेविड एडोमने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण इस्रायलमध्ये एका इमारतीवर क्षेपणास्त्र पडून ७० वर्षीय…
Author: Kishor Koli
नाशिक : प्रतिनिधी शनिवारी जिल्हा दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दिंडोरी तालुक्यातील वणी येथे कांदे , टॉमॅटो फेकण्यात आल्याने पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली.राष्ट्रवादी(शरद पवार)गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. संबंधितांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अजित पवार हे पक्षीय दृष्टीने प्रथमच नाशिक दौऱ्यावर आले आहेत.पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी दादांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शनिवारी सकाळी विमानाने ते ओझर विमानतळावर उतरल्यावर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. सत्तेत सहभागी होताना साथ देणाऱ्या आमदारांच्या मतदारसंघात त्यांचे विविध कार्यक्रम होणार आहेत.त्यासाठी ते मार्गस्थ होत असताना वणी परिसरातील बिरसा मुंडा चौकात शरद…
मुंबई : प्रतिनिधी शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. शिवसेना शिंदे गट,भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील अनेक नेते मंत्रीपदाची माळ गळ्यात कधी पडणार याची आस बाळगून बसले आहेत.मंत्रीमंडळ विस्तार झाला तरी कोणत्या नेत्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. अशातच आता महाविकास आघाडीच्या एका नेत्याने मोठा दावा केला आहे. मंत्रीमंडळातल्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या ९ मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची तयारी सुरू झाली असल्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मुश्रीफांचा राजीनामा घ्या राज्यातील ९ मंत्री भ्रष्टाचारी आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर हे नऊ मंत्री मंत्रिमंडळात दिसणार नाहीत असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे निरीक्षण…
श्रीहरीकोटा : वृत्तसंस्था चांद्रयान-३ आणि आदित्य एल १ मोहिमेच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोकडून देशवासियांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जगातील इतर देशांनी अंतराळात जे काम केले ते तुलनेत कमी खर्चात इस्रोने करुन दाखवले आहे.यामुळे आपल्याला अंतराळातील विश्व उलगडण्यास मदत झाली आहे. दरम्यान इस्रो आता नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. यामुळे इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी स्पेस स्टेशनसाठी इस्रोची योजना सांगितली आहे.भारत पुढील २० ते २५ वर्षांमध्ये स्वतःचे अंतराळ स्थानक तयार करण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. इस्रो गगनयान कार्यक्रम अंतराळात मानवी उड्डाण क्षमतेकडे वाटचाल करत आहे. असे झाल्यास…
हांगझोऊ : वृत्तसंस्था वर्ल्ड कप २०२३ मधील तिसरा सामना बांग्लादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात बांग्लादेशने अफगाणिस्तानचा लाजीरवाणा पराभव केला आहे. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी बांगलादेशसमोर गुडघे टेकवले. अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजी करताना १५६ धावा करता आल्या. ३७ ओव्हरमध्येच अफगाणिस्तानची टीम तंबुत परतली. त्याला प्रत्युत्तर देताना बांगलादेशने ६ गडी राखून विजय मिळवला आहे. त्याचबरोबर बांगलादेशने वर्ल्ड कपची (२०२३) सुरूवात विजयासह केली आहे.
हांगझोऊ : वृत्तसंस्था आशियाई क्रीडा स्पर्धेेत पुरुषांच्या कबड्डीमध्ये सुवर्णपदकाची लढत भारत आणि इराण यांंच्यात झाली. या सामन्यात भारताने इराणचा पराभव करून गोल्ड जिंकले मात्र त्याआधी या लढती मोठा वाद झाला.लढत संपण्यासाठी फक्त ६५ सेंकद शिल्लक असताना दोन्ही संघाचा स्कोअर २८-२८ असा बरोबरीत होता.त्यानंतर झालेल्या वादानंतर अखेर शेवटी भारताला ३ गुण आणि इराणला एक गुण देण्यात आला.भारताला ३ गुण मिळाल्यानंतर अंतिम स्कोअर ३१-२९ असा झाला. सामना सुरू झाल्यानंतर भारताच्या डिफेंडरने इराणच्या रेडरला बाद केले. त्यानंतरची रेड ही मॅचमधील अखेरची रेड होती ज्यावर भारताच्या रेडरने गुण मिळवले आणि स्कोअर ३३-२९ असा झाला आणि भारताने सुवर्णपदकावर नाव कोरले.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर माझी निवड योग्य नाही म्हणता, पण त्या पत्रावर तुमच्याच सह्या आहेत, असे ठणकावून सांगत राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार आणि त्यांच्या गटाला दिला आहे. निवडणूक आयोगाचा निकाल आपल्याच बाजूने लागेल मात्र निकाल काहीही लागला तरी चिंता करण्याचे कारण नाही. मी पाच निवडणुका वेगवेगळ्या चिन्हावर लढलो आणि निवडून आलो. चिन्हं बदललं तरी लोक आपला निर्णय बदलत नाही.आपण संघर्षाची भूमिका घेतलेली आहे आणि देशातलंही वातावरण बदलत आहे,असे म्हणत शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये जान भरली. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या…
साईमत मुंबई प्रतिनिधी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांंची राज्याच्या पोलीस महासंंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.गेल्याच महिन्यात त्यांच्यावर मुंबई व पुण्यात दाखल असणारे सर्व गुन्हे उच्च न्यायालयाने रद्द ठरवले.त्यापाठोपाठ सायबर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा तपासही बंद करण्यात आला.या पार्श्वभूमीवर आता राज्यातल्या सर्वात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी असणाऱ्या रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात होते.त्यानुसार आता त्यांची नियुक्ती पोलीस महासंचालक म्हणून करण्यात आली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक्सवर (ट्विटर) याची माहिती देणारी पोस्ट केली आहे.राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात “महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महांचालकपदी श्रीमती रश्मी शुक्ला यांची…
धाराशिव : वृत्तसंस्था मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांंगे पाटील यांनी धाराशीवमध्ये “मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत,” असा दावा केला आहे तसेच सरकारला ५ हजार कागदपत्रे सापडली आहेत. आता ट्रकभर पुरावे द्यायचे का, असा सवालही केला. ते गुरुवारी (५ ऑक्टोबर) धाराशीवमध्ये बोलत होते.मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “आयोगाचे सदस्य सनाट गेले आणि म्हटले कुणबी नोंदीची ५ हजार कागदपत्र सापडले.आता कागदपत्र कसे सापडले.आता आमचं कसं ठरलं होतं ते सांगतो. कुठलाही कायदा पारित करताना त्याला आधार द्यावा लागतो. त्याशिवाय कायदा पारित होत नाही. जर आधार दिला तर त्या कायद्याला आव्हान देण्याची हिंमत कुणातही नसते. आता मराठा आणि…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचा दिग्गज सलामीवीर व डावखुरा तडाखेबाज फलंदाज शिखर धवन गेल्या काही काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. शिखर धवन जवळपास १० महिन्यांपूर्वी डिसेंबर २०२२ मध्ये त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. कोर्टात प्रलंबित असणारे त्याचे घटस्फोटाचे प्रकरण याचे एक कारण असल्याचे बोलले जात आहे.शिखर धवनला आता दिल्ली कोर्टाने मोठा दिलासा दिला असून त्याला पत्नी आएशा मुखर्जीपासून घटस्फोट मंजूर केला आहे. शिखर धवनला पत्नीकडून मानसिक त्रास दिला जात होता,हा धवनचा दावा न्यायालयाने मान्य केला आहे. बऱ्याच काळापासून शिखर धवनच्या घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयाकडे प्रलंबित होते.दिल्लीच्या पतियाला कुटुंब न्यायालयात शिखर धवनने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. पत्नीकडून मानसिक त्रास होत असल्याची तक्रार…