नवीदिल्ली : वृत्तसंस्था पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची घोषणा सोमवारी (दि. ९ ऑक्टोबर) करण्यात आली. भाजपासाठी या पाचही राज्यांतील निवडणुका महत्त्वाच्या ठरतात. या पाच राज्यांच्या निकालावरून आगामी लोकसभा निवडणुकांची वातावरण निर्मिती भाजपाला करता येऊ शकते तसेच भाजपा संघटनेसाठीही हे निकाल महत्त्वाचे ठरणार आहेत.२०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांंमध्ये पाचही राज्यांत भाजपाचा पराभव झाला होता.राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने विजय मिळवला होता. तेलंगणात भारत राष्ट्र समितीचे सरकार पुन्हा आले होते आणि ईशान्य भारतातील मिझोराम राज्यात मिझो नॅशनल फ्रंट या पक्षाचा विजय झाला होता. मध्य प्रदेशात कांँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे २०२० साली भाजपाने सत्तास्थापन केली होती तर मिझोराममध्ये एमएनएफ पक्षाने एनडीएला पाठिंबा दिलेला आहे.…
Author: Kishor Koli
मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील आरोग्य विभागाच्या कायापालटासाठी ‘व्हिजन २०३५’ जाहीर केले आहे. त्या माध्यमातून आरोग्यावरील खर्च दुप्पट करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य क्षेत्रातली गुंतवणूकही वाढवण्यात येणार आहे. राज्यातील रुग्णालयामध्ये औषधखरेदी करण्यात येणार आहे आणि रिक्त पद भरती तातडीने पूर्ण केली जाईल. राज्यातील ३४ जिल्ह्यांत सुसज्ज, सुपर स्पेशालिटी जिल्हा रुग्णालये उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून येत्या दोन आठवड्यात त्यासंबंधित आराखडा तयार करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी औषध खरेदी, उपकरणे तत्काळ खरेदी करावेत जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजनमधून औषध खरेदीचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे त्यांनी वेळ न गमावता आपापल्या जिल्ह्यांतील औषध खरेदी, वैद्यकीय उपकरण खरेदी दरपत्रकानुसार तत्काळ करून घ्यावी. जीवरक्षक, अत्यावश्यक…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर मध्य प्रदेशात १७ नोव्हेंबर आणि राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगानुसार, एकाच टप्प्यात मिझोरममध्ये ७ नोव्हेंबरला आणि तेलंगणात ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पाचही राज्यांचे निकाल ३ डिसेंबरला लागणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, या राज्यांमध्ये एकूण १६.१४ कोटी मतदार आहेत. यामध्ये ८.२ कोटी पुरुष आणि ७.८ कोटी महिला मतदार असतील.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे.या सुनावणीपूर्वी शरद पवार गटाला दिलासा देणारी बाब समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने केरळ हायकोर्टाने ३ ऑक्टोबर रोजी खासदार मोहम्मद फैजल यांंना दोषी ठरवले होते. त्यामुळे त्यांंची खासदारकी निलंबित करण्यात आली होती. खून करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी त्यांंना दोषी ठरवण्यात आले होते मात्र, सुप्रीम कोर्टाने आज त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती ऋषीकेष रॉय आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंंडपीठात ही सुनावणी पार पडली. मोहम्मद फैजल यांच्यावतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. सुप्रीम कोर्टाने मोहम्मद फैजल यांना पुन्हा एकदा खासदारकी दिली आहे. शरद…
पुणे : प्रतिनिधी बोहरा समाजातील सुधारणावादी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.झैनब पूनावाला (वय ९१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांंच्या मागे मुलगी वास्तुविशारद शबनम पूनावाला आणि नात सना वैद्य असा परिवार आहे.सामाजिक कृतज्ञता निधीच्या कामात सक्रिय कार्यकर्ते,बोहरा समाजातील सुधारणावादी चळवळीचे आघाडीचे नेतृत्व ताहेरभाई पूनावाला यांच्या डॉ. झैनब या पत्नी होत. डॉ. झैनब यांनी ताहेरभाई यांच्यासमवेत बोहरा समाजातील सुधारणावादी चळवळीत उल्लेखनीय काम केले. यामुळे बोहरा समाजाने त्यांच्यावर बहिष्कारही घातला तरी दोघेही काम करत राहिले. या बहिष्कारामुळे मोठे जग पाहता आले’, असे ताहेरभाई नेहमी सांगायचे. सामाजिक कृतज्ञता निधी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टी यांसह विविध परिवर्तनवादी संस्थांच्या कार्यातही त्या…
पुणे : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? याबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दल कुठलीही शंका असण्याचे कारण नाही. कायद्यानुसार निर्णय घेतला जाईल,याची खात्री आहे. संस्थेला काम करण्याची मुभा दिली पाहिजे, असे मत राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आमदार अपात्रतेप्रकरणी १३ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याबद्दल विचारल्यावर राहुल नार्वेकर म्हणाले, “याचिका दाखल केल्याने सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले की, संविधान शिस्त पाळली पाहिजे. संविधानाप्रमाणे विधिमंडळ, न्यायमंडळ आणि कार्यकारी मंंडळ समान आहे. तिन्ही आपल्या कार्यक्षेत्रात…
चेन्नई : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची ३ बाद ० अशी दयनीय अवस्था होती. पण विराट कोहली आणि लोकेश राहुलमुळेच भारताला विजय साकारता आला. कोहली आणि राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली आणि भारताला वर्ल्ड कपमधील पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब करता आले. कोहली ८५ धावांवर बाद झाला. पण राहुलने अखेरपर्यंत किल्ला लढवला आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने हा सामना ६ विकेट्स राखून जिंकला. भारताला इशान किशानच्या रुपात पहिल्या षटकात धक्का बसला होता. भारताला दुसरा धक्का बसला तो रोहित शर्माच्या रुपात. शर्माला जोश हेझलवूने पायचीत पकडले श्रेयस अय्यरलाही भोपळा फोडता आला नाही आणि भारताला तिसरा धक्का बसला. या विकेट…
मुंबई : प्रतिनिधी सध्या राज्यात तिसऱ्या मंंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालीला सुरूवात झाली आहे.या मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदे गटातील अनेक आमदारांंची नावे चर्चेत आहेत पण दोन्ही मंत्रिमंडळ विस्तारात महाडचे आमदार भरत गोगावले यांंची संधी हुकली आहे. दुसऱ्या मंत्रिमंंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून आलेल्या ९ आमदारांना मंत्रीपदाची लॉटरी लागली. त्यामुळे भरत गोगावलेंवर अन्याय झाल्याची चर्चा रंगलेली असताना यावर आ.भरत गोगावले यांनी स्पष्टीकरण करतांना आपल्यासह शिंदे गटातील व भाजपा आमदारांच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. “राष्ट्रवादीच्या आमदारांना घेऊ नये हे आमचे आणि भाजपाच्या आमदारांचे मत झाले पण, पुढच्या राजकारणासाठी टाकलेल्या डावातून हे सर्व घडले आहे, असे भरत गोगावले यांनी सांगितले.ते एका मराठी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत…
पुणे : प्रतिनिधी पुण्याहून भोरमार्गे कोकणात जाणाऱ्या मिनी बसचा वरंधा घाटात भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने नीरा देवघर धरणाच्या बॅक वॉटर परिसरात बस खोल दरीत कोसळली. त्यात चालकाचा मृत्यू झाला तर सर्व १० प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे.बस कोसळली तिथून अवघ्या ५ फुटांवर नीरा देवघर धरणाचे खोल पाणी होते मात्र बस झाडाझुडपात अडकल्यानेे मोठा अनर्थ टळला आहे.स्थानिक तरुणांनी जीवाची बाजी लावून प्रवाशांचा जीव वाचवल्याचे वृत्त समोर आले आहे. घाटामध्ये असलेल्या रस्त्यांना सुरक्षा कठडे नाहीत. रस्त्यावर नवीन येणाऱ्या चालकांना याचा अंदाज येत नाही. या कारणामुळे गेल्या काही दिवसात या रस्त्यावर अनेक अपघात झालेले दिसून येत आहे. हा अपघात इतका…
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. छगन भुजबळांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी कधी होणार? अशी विचारणा करणारी याचिका दमानिया यांनी दाखल केली आहे. दमानिया यांनी न्यायालयात धाव घेतल्याने छगन भुजबळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे. न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अंजली दमानिया म्हणाल्या, “नाशिकचे आमदार सुहास कांदे यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेत एक लक्ष्यवेधी लावली होती. छगन भुजबळ यांच्याविरोधातील प्रलंबित कारवाई कधी होणार?…