जळगाव : प्रतिनिधी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथीपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होऊन नवमीला समाप्ती होते. यावर्षी नवरात्री, रविवार, १५ ऑक्टोबर म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. २३ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या ९ दिवसात दुर्गा माताच्या ९ रूपांची पूजा केली जाते. दसऱ्याच्या दूसऱ्या दिवशी देवीच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. तसेच या दिवशी रावण दहन देखील केले जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि घरात जवाच्या बिया पेरल्या जातात. असे मानले जाते की नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा केल्याने ती प्रसन्न होते आणि भक्तांना आनंद आणि सौभाग्याचे वरदान देते. यंदा शारदीय नवरात्रीला दुर्गा देवी हत्तीवर स्वार होऊन येत आहे. देवीची हत्तीची सवारी शुभ…
Author: Kishor Koli
अहमदाबाद : वृत्तसंस्था भारतीय गोलंदाजाच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांचा धुव्वा उडाला. त्यांनतर कर्णधार रोहित शर्माची धडाकेबाज ८६ धावांची खेळी आणि श्रेयस अय्यरच्या संयमी अर्धशतकाच्या जोरावर काल भारताने क्रिकेट वन-डे विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यात पाकिस्तान विरुद्ध ७ गडी राखत दणदणीत विजय साजरा केला. दिमाखदार कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट संघाने घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला वन-डे विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध आपली विजयाची परंपरा कायम राखली आहे. वन-डे विश्वचषक स्पर्धेत भारताचा हा सलग आठवा विजय ठरला आहे. या स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धचे ‘अजिंक्य’पद टीम इंडियाने अबाधित ठेवले आहे. ३४ षटकांच्या आत भारताने लक्ष्य साध्य केल्यामुळे रनरेनटमध्ये भारताची सरशी ठरली आहे. यामुळे टीम इंडियाने गुणतालिकेत पहिल्या क्रमवारीवर झेप घेतली…
बुलढाणा : प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री व आमचे नेते अजितदादा पवार हे मुख्यमंत्री होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचे भाकितवजा विधान माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केले. हे विधान करून त्यांनी मागील काही दिवसांपासून या चर्चेमुळे राज्यात निर्माण झालेल्या वादात उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार तथा बुलढाण्याचे माजी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्या सिंदखेडराजा मतदारसंघातील देऊळगाव राजा येथे कृषी मेळावा पार पडला. विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या पुढाकाराने यावेळी कृषी प्रदर्शनी देखील आयोजित करण्यात आली. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना आमदार शिंगणे यांनी वरील विधान करून धमाल उडवून दिली. यासंदर्भात विचारणा केली असता, अजितदादा एक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंंत्री बनणार…
नवीदिल्ली : वृत्तसंस्था आमदार अपात्रतेवरून सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावले होते.न्यायालयाने १४ जुलै २०२३ मध्ये या प्रकरणी निकाल दिला. सप्टेंंबर महिन्यातही आदेश दिले पण अद्यापही कारवाई होत नसेल, तर नाईलाजाने २ महिन्यांत निर्णय देण्याचे आदेश द्यावे लागतील, अशा शब्दांत न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना फटकारले आहे. यावर आता राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल नार्वेकर म्हणाले,संविधानाने स्थापन केलेल्या कुठल्याही संस्थेच्या आदेशाचा अपमान करणार नाही.त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा कुठल्याही प्रकारे अनादर केला जाणार नाही पण, विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करताना विधिमंडळ आणि विधानसभेचे सार्वभौमत्व राखणे, हे माझे कर्तव्य आहे. “नैसर्गिक न्याय, तत्व, विधिमंडळातील…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा वार्षिक योजनेंंतर्गत अर्थसंकल्पीय प्राप्त ३६३.१८ कोटी रूपये निधीमधून ११३.४९ कोटी रूपये निधी वितरीत झालेला आहे. प्राप्त निधीशी वितरीत निधीची टक्केवारी ३१.२५ असून निधी वितरणामध्ये जळगाव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांक आहे. यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या सूचना, लोकप्रतिनिधींचे सहकार्य, जिल्हा नियोजन समिती कार्यालय, जिल्हा नियोजन समितीच्या यंत्रणेच्या उत्कृष्ट कामामुळे निधी वितरणात जिल्हा राज्यात प्रथम आला आहे. प्रशासकीय मान्यता मिळालेल्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करावेत. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काल येथे दिल्या. जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ खर्चाचा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय घेण्यात विधानसभा अध्यक्ष दिरंगाई करत असल्याच्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी किमान दोन महिन्यात निर्णय घेणं आवश्यक असल्याचं मत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मांडले. तसेच, विधानसभा अध्यक्षांना कोणीतरी सांगावं की, हे प्रकरण त्यांनी गांभीर्यानं घेण्याची गरज आहे, अशा अत्यंत कडक शब्दांत सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुनावले. विधानसभा अध्यक्षांनी सादर केलेले सुनावणीचे वेळापत्रक फेटाळून लावत, सोमवार पर्यंत नवे वेळापत्रक दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. विधानसभा अध्यक्षांची सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणारे न्यायाधीश सॉलिसिटर जनरल तुषार मेहता…
मुंबई : प्रतिनिधी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांंच्याकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत आज (१३ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढले आहेत.विधानसभा अध्यक्षांनी दोन महिन्यांत निर्णय घेणे आवश्यक आहे तसेच विधानसभा अध्यक्षांना कुणीतरी सांगावं की, हे प्रकरण गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. पोरखेळ करताय का? अशा शब्दांत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राहुल नार्वेकरांना सुनावले आहे. यावर आता ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना उज्ज्वल निकम म्हणाले, “विधानसभा अध्यक्षांनी दाखल केलेल्या वेळापत्रकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने केलेली टिप्पणी अत्यंत महत्वपूर्ण आहे. दोन महिन्यांच्या आत निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितले…
पुणे : वृत्तसंस्था पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रथमच पुणे जिल्हा आढावा बैठकीला सुरवात केली आहे. पुणे शहर तसेच जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या कारभाराबाबत आज आढावा बैठक घेतली.त्यानुसार पुण्यात गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणामुळे राज्यात खळबळ माजली आहे. म्हणून ससून रुग्णालयाचे डीन डॉ.संजीव ठाकूर यांना बैठकीला बोलवण्यात आले आहे. ड्रग्ज तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून पलायन झाल्यानंतर ससून प्रशासन तसेच पोलीस प्रशासनेच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित केली जात आहे.त्यासोबत १६ नंबर वॉर्डमध्ये उपचारांच्या नावाखाली आश्रय घेणाऱ्या नामांकीत गुन्हगारांची यादी प्रसारित झाल्यानंतर राज्यात मोठी खळबळ माजली आहे.या प्रकरणावर जाच बसवण्यासाठी अजित पवारांनी सर्वप्रथम आज ससूनचे डीन संजीव ठाकूर यांना बैठकीसाठी बोलवले आहे.ससूनमध्ये…
मुंबई : प्रतिनिधी शिवसेना आमदार अपात्रतेच्या मुद्यावर विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळात गुरूवारी सुनावणी घेतली. जवळपास अडीच तास सुनावणी सुरू होती. शिंदे गटाच्या वकिलांनी प्रत्येक आमदाराची सुनावणी एकत्रितपणे घ्यावी अशी मागणी केली. तर, ठाकरे गटाच्या वकिलांनी या मागणीला जोरदार विरोध केला. आमदार अपात्रतेसंदर्भात स्वतंत्र सुनावणी घ्यायची की एकत्रित, याबाबतचा निकाल २० ऑक्टोबर रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नॉर्वेकर देण्याची शक्यता आहे. याचिका एकत्रित करण्याच्या मुद्द्यावर ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. ठाकरे गटातील प्रत्येक वकिलाकडून मुद्देसूद मांडणी करण्यात आली. याउलट शिंदे गटाकडून युक्तिवाद खोडून काढण्याचाच प्रयत्न करण्यात आला. शिंदे गटाच्या वडिलांकडून याचिकांमधील मुद्द्यांची मांडणी करण्यात आली. तब्बल अडीच तास सुनावणी सुरू होती. शिंदे…
नवीदिल्ली : वृत्तसंस्था महत्त्वाची अनेक विधेयके अर्थ विधेयके म्हणून घोषित केल्याचा दावा करून कांँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.२०१६ पासून त्यांनी तीन याचिका कोर्टात दाखल केल्या आहेत.या याचिकांवर सुनावणी करण्याकरता न्यायमूर्ती चंद्रचूड यांंनी त्यांच्यासह सात न्यायाधीशांच्या घटनापीठाची स्थापना केली आहे.आता लवकरच या तिन्ही याचिकांवर सुनावणी होईल, अशी आशा जयराम रमेश यांनी व्यक्त केली आहे.यासंदर्भात सामाजिक माध्यमावरून त्यांनी ही माहिती दिली आहे. “मोदी सरकारने महत्त्वाची विधेयके असंवैधानिक पद्धतीने अर्थ विधेयक म्हणून संंमत केली आहेत. त्याविरोधात केलेल्या याचिकांवर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली सात न्यायाधीशांच्या घटनापीठाची स्थापना केली आहे.मी हा मुद्दा संसदेत आणि संसदेबाहेर सर्वोच्च न्यायालयात ३…