Author: Kishor Koli

जळगाव : प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या नगर विकास शाखेतर्फे एक कोटीच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यासाठी बुलढाण्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी प्रयत्न केले. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा यांनी सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने कोणतीही अनियमितता आढळून आल्यास त्याच कार्यकारी अभियंता हे स्वतः जबाबदार राहतील तसेच निधी खर्च करण्याची मर्यादा तपासून आवश्यक असल्यास निधी खर्च करण्यास मदत वाढ घेण्याची जबाबदारी देखील कार्यकारी अभियंता यांचीच असणार आहे. मोताळा शहरांमध्ये तयार होणाऱ्या या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाच्या सौंदर्यकरणामुळे शहराचा चेहरा देखील बदलण्यास मदत होईल.…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेलं अपात्रता प्रकरणाचं वेळापत्रक आम्हाला मान्य नाही. त्यांनी सुधारित वेळापत्रक द्यावे. दसऱ्याच्या सुट्टीत बसून वेळापत्रक तयार करावं, ही त्यांना शेवटची संधी असेल. जर त्यांनी सुधारित वेळापत्रक तयार केले नाही, तर सर्वोच्च न्यायालयाला यात हस्तक्षेप करावा लागेल, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. अध्यक्षांनी ११ मे पासून अपात्रता याचिकेसंदर्भात काहीच केले नाही. त्यांनी मीडियाशी फार न बोलता वेळापत्रक सादर करावा, असा सल्लाही कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिलेला आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी ३० ऑक्टोबरला होणार आहे. अपात्रतेप्रकरणी राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून एकत्रित याचिका दाखल झाल्या आहेत. त्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात…

Read More

पुणे : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या राजकारणात दसऱ्याच्या दिवशी विचारांचं सोनं लुटण्याची परंपरा आहे. राज्यात दसऱ्याच्या दिवशी अनेक राजकीय सभा होतात. त्यामुळे राज्यातील राजकारण ऐन हिवाळ्याच्या तोंडावर दरवर्षी कमालीचे तापते. दसऱ्याच्या दिवशी सकाळी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन होऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सरसंघचालक हे संबोधित करतात. त्यानंतर बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होतो. तर रात्री मुंबईत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. या सभांनी राज्यातील राजकारण ढवळून निघते. आता यंदा दसऱ्याच्या सभेत आणखी भर पडणार आहे. यावर्षी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात सभा पार पडणार आहे. पुण्यातील टिळक…

Read More

पुणे : प्रतिनिधी पोलिसांच्या येरवडा येथील तीन एकर जमिनीचा २०१० मध्ये विभागीय आयुक्तांनी लिलाव केला होता. तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी ही जमीन हस्तांतरित करण्याचा आदेश दिला होता मात्र आपण त्याला नकार दिला असा गौप्यस्फोट माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी नाव न घेता केला. त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या आत्मचरित्रात याबाबत दावा करण्यात आला आहे. या आरोपांवर अजित पवारांनी उत्तर दिलं आहे. काल पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे. माझं काम भलं आणि मी भला, असं करत मी पुढे जात असतो. गेले तीन चार दिवस सातत्याने माध्यमांत बातम्या आल्या. मी त्या बातम्यांना जास्त महत्त्व दिलं नाही. त्या बातम्यांशी…

Read More

साने गुरूजी साहित्य नगरी, अमळनेर : प्रतिनिधी साने गुरुजी व बहिणाबाई चौधरी यांच्या मातीत होत असलेले 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येणाऱ्या काळात महाराष्ट्राला दिशादर्शक ठरेल, असा विश्वास संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा.डॉ. रविंद्र शोभणे यांनी व्यक्त केला. बहिणाबाई चौधरींनी मराठी साहित्याला सोन्याचा हंडा दिला आहे. आजही बहिणाबाईंच्या कवितेच्या पलिकडे ग्रामीण कविता गेल्या नाही, हे अभिमानानं नमूद करावसं वाटतं, असंही ते म्हणाले. डॉ. रविंद्र शोभणे यांनी संमेलनाच्या तयारीचा पूर्व आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रताप महाविद्यालयास भेट देत महाविद्यालय परिसराची पाहणी केली. यावेळी मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी व कार्यकारी मंडळ सदस्यांनी संमेलन अध्यक्षांना सविस्तर माहिती दिली. मराठी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मागील महिन्यात 0 ते 6 वर्षे वयोगटातील 1832 मुले तीव्र कुपोषित होती. अंगणवाडी सेविका, आंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर्स, सार्वजनिक आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे एका महिन्यातच गंभीर कुपोषित बालकांची संख्या 1422 पर्यंत कमी झाली आहे. जळगाव जिल्ह्याची वाटचाल कुपोषणमुक्ती कडे सुरू झाली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या उपाययोजनांविषयी माहिती देतांना आयुष प्रसाद म्हणाले की, कुपोषणमुक्तीसाठी जिल्ह्याने मेडीकल, सर्जीकल ॲण्ड डायर्टी तीन प्रकारच्या संकल्पना वापरल्या. यामध्ये मुलांना एनर्जी नेस्ट न्यूर्टीशन फूड,2200 अंगणवाड्यांमध्ये ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात आली. पोषण पुनर्वसन केंद्रात बालकांच्या…

Read More

नवीदिल्ली : वृत्तसंस्था २००५ ते २००६ या कालावधीत झालेल्या लहान मुलांच्या हत्यांनी नोएडा हादरले होते. निठारी हत्याकांड हे प्रकरण प्रचंड गाजले होते. या प्रकरणात मुख्य संशयित सुरिंदर कोली आणि त्याचा सहकारी मोनिंदर सिंह पंढेर या दोघांनाही कोर्टाने दिलासा दिला आहे. १२ प्रकरणार सुरिंदरला तर दोन प्रकरणात मोनिंदरला दिलासा दिला आहे. या दोघांची फाशीची शिक्षाही रद्द करण्यात आली आहे. ट्रायल कोर्टाने या दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली होती मात्र आता अलाहाबाद कोर्टाने ही शिक्षा रद्द केली आहे. जस्टिस अश्विनी कुमार मिश्रा आणि जस्टिस सय्यद आफताब हुसैन रिझवी यांच्या पीठाने या प्रकरणी या गेल्या महिन्यात निकाल राखून ठेवला होता. सुरिंदर कोलीला १२ प्रकरणात…

Read More

बदलापूर : वृत्तसंस्था साप हे सहसा जंगलात किंवा अडगळीच्या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळतात पण रहदारीच्या ठिकाणी किंवा मानवी वस्तीत साप आढळल्यास एकच खळबळ उडते. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात रिक्षाच्या मागे एक साप लटकताना दिसत आहे. हा व्हिडिओ मुंबईलगतच्या बदलापूर स्थानकातील आहे.साप रिक्षाच्या छतावर चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याचवेळी तिथे असलेल्या काही रिक्षा चालकांच्या हे लक्षात येते. रिक्षाच्या मागे साप असलेला हा व्हिडिओ मुंबईतील बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेरचा असल्याचे समोर येत आहे. या व्यक्तीने जेो ट्विट केला आहे त्यात लिहले आहे की, बदलापूर रेल्वे स्थानकाच्या तिकिट खिडकीजवळ हे दृश्य दिसले आहे.साप सरपटत रिक्षाच्या छतावर जाण्याचा प्रयत्न…

Read More

वरणगाव ता.भुसावळ : प्रतिनिधी वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथे एका इसमाची क्षुल्लक कारणावरून हत्या झाल्याची घटना रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली . या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी(दि.१५) सकाळी वरणगाव फॅक्टरी बसस्थानक परीसराच्या दर्यापूर शिवारातील एका हॉटेलवर प्रमोद ज्ञानेश्वर महाजन( वय ५५) रा. टहाकळी ता.भुसावळ ह.मु.शिवाजीनगर वरणगांव हे सकाळी दहा वाजेच्या सुमारास नाश्ता करण्यासाठी गेले होते.त्या ठिकाणी वरणगांव फॅक्टरीचे कर्मचारी दिपक कृष्णकुमार सिंग यांचेशी त्यांचा किरकोळ वाद झाल्यानंतर दिपकसिंग यांनी घरी जाऊन आणलेल्या लाकडी दांडक्याने खुर्चीवर बसलेल्या प्रमोद महाजन यांच्या डोक्यावर जबर वार केला.या हल्ल्यात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी माझ्यावर शासकीय निधीतून उपचार करावे एवढा मी आर्थिक दुर्बल नाही, माझं डोकं ठिकाणावर नसतं तर गिरीश महाजन यांना उत्तर देण्याची वेळ आली नसती असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आमदार गिरीश महाजन यांनी लगावला आहे. गिरीश महाजन एका साध्या शिक्षकाचा मुलगा, आज हजारो कोटींची प्रॉपर्टी घेऊन बसला असा गंभीर आरोपही खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. या दोघा दिग्गज नेत्यांमध्ये आरोप – प्रत्यारोप फैरी झडत आहेत. राज्यात शेकडो लोक मरताहेत, त्याची जबाबदारी स्वीकारा आणि राजीनामा द्या, नुसते एकनाथ खडसेवर टोलवा टोलवी करून चालणार नाही. नांदेडची जी मोठी दुर्घटना घडली ते खाते मंत्री गिरीश महाजन यांच्याकडेच आहे. त्यामुळे…

Read More