Author: Kishor Koli

अमृतसर : वृत्तसंस्था भारतामध्ये वर्ल्ड कप २०२३ चं आयोजन करण्यात आलेले ेअसून सध्या देशातील मोहोल क्रिकेटमय आहे. असे असतानाच महान फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांचे निधन झाले आहे.१९७० च्या दशकामध्ये आपल्या फिरकी गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या ग्रेट चौघांमध्ये बिशन सिंग बेदी यांचा समावेश होता. बिशन सिंग बेदींबरोबरच प्रसन्ना, चंद्रशेखर आणि व्यंकटराघवन यांचा या सर्वोत्तम ४ फिरकीपटूंमध्ये समावेश होता.बिशन सिंग बेदींचा जन्म २५ सप्टेंबर १९४६ अमृतसरमध्ये झाला. भारतीय कसोटी क्रिकेट संघात बिशन सिंग बेदी १९६६ ते १९७९ दरम्यान खेळले.बिनश सिंग बेदींनी २२ कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून भारताचे नेतृत्व केले.आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारर्किर्दीमध्ये त्यांनी १५६० विकेट्स घेतल्या.

Read More

बुलढाणा : प्रतिनिधी लडाखच्या सियाचीन येथे तैनात असलेले भारतीय लष्कराचे अग्निवीर जवान अक्षय लक्ष्मण गवते यांचे कर्तव्यावर असताना निधन झाले आहे.अक्षय गवते हे अग्निवीर योजनेतून भारतीय लष्करात दाखल झाले होते.त्यामुळे त्यांना पेन्शन आणि इतर सरकारी योजनांचा लाभ मिळणार नसल्याचा दावा करत विरोधी पक्ष केंद्र सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान, अक्षय गवते यांच्या कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या निधीबाबत भारतीय सैन्याने माहिती दिली आहे. भारतीय लष्कराने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर दिलेल्या माहितीनुसार, अक्षय गवते यांच्या कुटुबीयांना १ कोटी १३ लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. यामध्ये नॉन कंट्रिब्युटरी इन्शुरन्स, सेवा निधी, आर्म्ड फोर्सेस बॅटल कॅज्युअल्टी फंडातून दिली जाणारी भरपाई, आर्मी वाईव्ह्ज वेल्फेअर फंडाकडून…

Read More

मुंबई : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण देण्यास नकार दिल्यानंतर राज्य सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे.या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे.यावरून मराठा क्रांती मोर्चाने मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मराठा मोर्चाने आज पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे सुनील नागणे आणि प्रतापसिंह पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केला आहे. सुनील नागणे म्हणाले की, सध्या केवळ कुणबी मराठा प्रमाणपत्र देऊन तात्पुरती मलमपट्टी केली जाईल. आम्हाला हिंदू मराठा म्हणून आरक्षण मिळावे हीच आमची मागणी आहे.सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका करण्यात आली आहे. पुनर्विचार याचिकेबाबत राज्य सरकार…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था मध्य बंंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. या चक्रीवादळाला ‘तेज’ असे नाव देण्यात आले आहे. पुढील २४ तासांत हे चक्रीवादळ आक्राळ-विक्राळ रुप धारण करण्याची शक्यता असून काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. ‘तेज’ चक्रीवादळ रविवारी दुपारनंतर अतिशय तीव्र झाले आहे.हे चक्रीवादळ अधिक सक्रिय झाल्यानंतर दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रावर १२५-१३५ किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्याचा वेग राहण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांचा वेग १५० किमीपर्यंत वाढू शकतो.त्यामुळे केरळ, तामिळनाडूमध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर जम्मू आणि काश्मीर, लडाख, पंजाब, पश्चिम राजस्थान आणि पुद्दुचेरीमध्येही पावसाचा अंदाज आहे.…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून भारताची राजधानी दिल्लीसह आसपासच्या परिसरात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहे. रविवारी सकाळीही दिल्लीसह आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हा भूकंप ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता तर या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळची राजधानी काठमांडूपासून पश्चिमेला ५५ किलोमीटर अंतरावर असलेल्या धाडिंग येथे होता, अशी माहिती नेपाळ राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली. युरोपीय भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून १३ किलोमीटर खोलीवर होता. या भूकंपामुळे जीवितहानी किंवा नुकसान झाल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.

Read More

जालना : वृत्तसंस्था मराठा आरक्षण आंंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली 24 ऑक्टोबरची डेडलाईन संपायला अवघे दोन दिवस उरले आहेत. त्याआधीच मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या लढ्याची नवी दिशा निश्चित केली असून 24 तारखेला न्याय न मिळाल्यास 25 ऑक्टोंबरपासून लाक्षणिक उपोषण आणि 28 आक्टोंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. या उपोषणादरम्यान पाणी, औषधे काहीही घेणार नाही.हे कठोर उपोषण असणार, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले तसेच प्रत्येक नाक्यावर साखळी उपोषण करणार असून,राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात येत आहे. हे युद्ध सरकारला पेलणार नाही,असे आव्हान जरांगे पाटील यांनी दिले आहे. शांततेत सुरू होणारे आंदोलन सरकारला झेपणार नाही, या…

Read More

नवीदिल्ली : वृत्तसंस्था यंदा २४ ऑक्टोबरला दसरा साजरा होणार आहे. या दिवशी रावणाच्या पुतळ्याला वाईटाचे प्रतीक मानून दहन केले जाते. पण अशी काही ठिकाणे आहेत जिथे रावण दहन केले जात नाही. या ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जात नाही तर रावणाच्या मृत्यूचा शोक केला जातो. या ठिकाणी रावणाचा दुखवटा पाळला जातो. दसऱ्याला विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याच्या विजयाचा दिवस असेही म्हणतात. या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम राम यांनी लंकेचा राजा रावणाचा वध करून विजय मिळवला होता, असे मानले जाते.त्यामुळे दुष्टाईच्या पराभवाचे प्रतीक म्हणून दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. परंतु भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जात…

Read More

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची काल अनौपचारिक भेट झाली. या भेटीची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीतील तिसरा घटक पक्ष काँग्रेसने यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ही भेट शुभ संकेत असल्याचे म्हटले. शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. किंबहुना या भेटीदरम्यान कॉफी पिली आणि त्यात शरद पवारांनी साखर घातल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी कबुली दिली. यावर नाना पटोले यांनी शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट म्हणजे शुभ संकेत असल्याचे भंडाऱ्यात म्हटले. ज्यावेळी महाविकास आघाडीची बैठक होईल, त्यात यावर चर्चा होईल. प्रकाश आंबेडकरांनी जर ही चर्चा गोड झाल्याचे वक्तव्य…

Read More

लखनऊ :  वृत्तसंस्था एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या १९ व्या सामन्यात श्रीलंकेने नेदरलँड्सचा ५ गडी राखून पराभव केला.लखनऊच्या एकना स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सने २६२ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने पाच गडी गमावून २६३ धावा केल्या आणि स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. श्रीलंकेच्या विजयाचा हिरो सदिरा समरविक्रमा ठरला.तो १०७ चेंडूत ९१ धावा करून नाबाद परतला. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार मारले. नेदरलँड्ससाठी आर्यन दत्त हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.आर्यन दत्तने १० षटकांत ४४ धावांत ३ गडी बाद केले. याशिवाय पॉल वॉन मीकेरेन आणि कॉलिन अकरमन यांना १-१ विकेट मिळाली. तत्पूर्वी, नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. नाणेफेक…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था काही पदांसाठी कंत्राटी भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले, त्याचे शुल्क प्रति परीक्षा एक हजार रुपये घेण्यात आले. काही उमेदवारांनी पाच पदांसाठी पाच अर्ज केले, त्यांच्याकडून पाच हजार घेण्यात आले होते, आता ती रक्कम उमेदवाराला तातडीने परत करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विद्यमान सरकारने चपराशी पासून ते अभियंतापर्यंतचे पद कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी जी.आर.मध्ये दुरुस्ती केली. ६ सप्टेंबर २०२३ रोजी महसूल विभागात तीन हजार, कृषी विभागात दोन हजार, पोलीस विभागात तीन हजार आणि आरोग्य विभागात तीन हजार पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा जी.आर. काढला. जेव्हा ही जाहिरात प्रकाशित झाली. विरोधी पक्षाने यास विरोध केला आणि राज्यभरातील…

Read More