जालना : वृत्तसंस्था मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या आठवडाभरापासून उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी काल अखेर आपलं उपोषण थांबवलं आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षणासाठी सरकारला २ जानेवारीपर्यंतची मुदत देत मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. राज्य सरकारच्यावतीने निवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड आणि न्यायमूर्ती सुनिल सुक्रे यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली.. यावेळी आमदार बच्चू कडू देखील उपस्थित आहेत. मनोज जरांगे यांच्याशी मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्र यासंदर्भात न्यायमूर्ती यांनी चर्चा केली. ही चर्चा सुरु असतानाच राज्य सरकारच्यावतीने मंत्री उदय सामंत, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री संदिपान भुमरे, मंत्री अतुल सावे यांच्यासह आमदार उपस्थित होते. न्यायमूर्ती आणि राज्य सरकारच्या…
Author: Kishor Koli
जळगाव : प्रतिनिधी नाशिक येथे क्रीड़ा व युवक सेवा संचानालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीड़ा अधिकारी कार्यालय नाशिक व जिल्हा शुटिंग स्पोर्ट्स असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विभागीय रायफल शुटिंग स्पर्धा झाली. या स्पर्धेत सिमरा खानने ४०० पैकी ३५९ गुण प्राप्त करुन द्वितीय क्रमांक पटकावले व राज्य स्पर्धेसाठी पात्र झाली.सिमरा खान ही जामनेरचे तालुका क्रीडा संयोजक प्रा. डॉ.आसिफ खानयांची सुकन्या आहे. सिमरा खानला दिलीप गवळी, नेहा सप्ते, प्रियंका पटायत व प्रकाश गवळी यांचे मार्गदर्शन लाभले.जामनेर तालुक्याचे आमदार व ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी सिमराखानच्या यशाबद्दल अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
जळगाव : प्रतिनिधी बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया,नॅशनल सेंटर ऑफ एक्ससिल्लेन्स , रोहतक हरियाणा येथे ७-१० नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या भारतीय बॉक्सिंग संघाच्या निवड चाचणीसाठी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने ७०-७५ किलो वजनगटात माहेश्वरी चोपडेची निवड करण्यात आली आहे.आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा खेळण्याची संधी माहेश्वरीला मिळू शकते. माहेश्वरीला जिल्हास्तरीय खेलो इंडिया बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक निलेश बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल खेळाडू व प्रशिक्षकाचे जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने, एकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक व जळगाव शहर बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, उपाध्यक्ष डॉ.अमोल पाटील, सहसचिव नयन राणे,खजिनदार रोहिदास पाटील, रवी नरवाडे,…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीतील कथित अबकारी धोरण घोटाळ्यात झालेल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने ( ईडी ) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांंना गुरूवारी ( २ नोव्हेंबर ) चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते.आता अरविंद केजरीवाल यांनी ईडीला प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाच्या सांगण्यावरून नोटीस पाठवण्यात आली होती, असा आरोप केजरीवालांनी केला आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले, “ईडीने पाठवलेली नोटीस बेकायदेशीर आणि राजकीय हेतूनं प्रेरित आहे. भाजपाच्या सांगण्यावरून ही नोटीस पाठवली. चार राज्यांच्या निवडणुकीत प्रचार करू नये म्हणून नोटीस पाठवण्यात आली होती. ईडीने तातडीने ही नोटीस मागे घ्यावी.” दरम्यान, अरविंद केजरीवाल ईडी चौकशीसाठी हजर राहणार नाहीत. मध्य प्रदेशात प्रचारासाठी केजरीवाल जाणार आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ॲपल कंपनीकडून आयफोनवर सरकार-पुरस्कृत सायबर हल्ल्याचा इशारा मिळाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी आपल्यासह हा इशारा मिळालेल्या इतर खासदारांना आपले कर्तव्य बजावण्यासाठी संरक्षण प्रदान करावे, अशी विनंती लोकसभा अध्यक्षांकडे केली. सरकारकडून केली जाणारी ही बेकायदा टेहेळणी हा राज्यघटनेने हमी दिलेल्या ‘मूलभूत हक्कांवरील सर्वात वाईट हल्ला’ असल्याचे मोइत्रा यांनी या पत्रामध्ये नमूद केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, विरोधी पक्षाच्या नेत्यांना ॲपल कंपनीकडून ‘सरकार-पुरस्कृत हल्लेखोर तुम्हाला लक्ष्य करत असल्याचा’ संदेश मिळाला आहे. हे हल्लेखोर दूरस्थ पद्धतीने उपकरणांमध्ये हस्तक्षेप करण्यासह त्यातील डेटा, संभाषणे आणि अगदी कॅमेरा…
जळगाव : प्रतिनिधी जातीचे दाखले सरसकट मिळावेत, रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना कोणतेही कागदपत्र न मागता जातवैधता प्रमाणपत्र मिळावे यांसह इतर मागण्यांसाठी आदिवासी कोळी समाजाचे अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन येथे सुरू असून बुधवारी समाजबांधवांनी सुरत- नागपूर महामार्ग रोखला. त्यामुळे दोन्ही बाजूंनी तीन किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बुधवारी पहाटेपासून उपोषणकर्त्या महिलांसह पुरुषांची प्रकृती बिघडली असून, त्यांनी उपचार करण्यास नकार दिला आहे. आदिवासी कोळी समाजाचे पदाधिकारी जगन्नाथ बाविस्कर, नितीन कांडेलकर, संजय कांडेलकर, नितीन सपकाळे, पद्माकर कोळी, पुंडलिक सोनवणे, सुनीता कोळी, पुष्पा कोळी यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 10 ऑक्टोबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. जातीचे दाखले व जातवैधता प्रमाणपत्र प्रशासनाकडून आडकाठी आणली जात असल्यामुळे बुधवारी 23 व्या…
मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन तीव्र झालं आहे. आरक्षणासाठी काही ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलने केली जात आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यासह काही ठिकाणी मराठा आंदोलक उपोषणाला बसले आहेत. दुसऱ्या बाजूला काही ठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत. काही ठिकाणी आंदोलकांनी नेत्यांना घेराव घातल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर मराठा आंदोलनाची व्यापकता आता आणखी वाढली आहे. अनेक आमदार, खासदार आणि मंत्रीदेखील आंदोलनं करू लागले आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक मराठा आमदारांना मतदारसंघांमधील नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी आमदारांनी मंत्रालयाबाहेर आंदोलन सुरू केलं आहे. अनेक मराठा आमदार मंगळवारपासून (३१ ऑक्टोबर) मंत्रालयाबाहेर आंदोलन…
मुंबई : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या आदेशांची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. ३१ डिसेंबरपर्यंत शिवसेवेच्या आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सुनावणीमध्ये चालढकल केली जात असल्याच्या विरोधकांच्या टीकेला बळ मिळाले असून त्यावरून राहुल नार्वेकरांविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासंदर्भात माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकरांनी विरोधकांना लक्ष्य केले आहे. उद्धव ठाकरेंनी मंगळवारी मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल नार्वेकरांवर टीकास्र सोडले होते. “राहुल नार्वेकर म्हणतात त्यांना आदेशाची प्रत प्राप्त झालेली नाही. मी शिवसेनेच्या आमदारांना सांगेन की त्यांनी ही प्रत राहुल नार्वेकरांना नेऊन द्यावी”, असे उद्धव…
सोलापूर : वृत्तसंस्था मराठा समाजाचा जीवन चितेप्रमाणे राख झाला आहे. ही राख करणाऱ्या राज्य सरकारच्या निषेधार्थ आणि मनोज जरांगे यांचे समर्थनार्थ आणि सरसकट मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी तरुणाने जिवंतपणी समाधी घेतली आहे.समाधी आंदोलन बेमुदत असल्याच छावा संघटनेच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रीय छावाचे प्रदेशाध्यक्ष निखिल गोळे आणि प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष रतिकांत पाटील हे सरणावर झोपून तळे हिप्परगा येथील मराठा हिंदू स्मशानभूमीमध्ये बेमुदत जिवंत चिता समाधी आंदोलनाला सुरुवात केली आहे.मराठा समाजाच्या तरुणाने आरक्षणासाठी स्वतःची जिवंतपणी अंत्ययात्रा काढून राज्य सरकारचा निषेध केला आहे. सत्तर वर्षांपासून मराठा समाजाला कोणतेही शासकीय लाभ, सवलती किंवा फायदे मिळाले…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राजकीय पक्षांना निधी उपलब्ध करून देणाऱ्या निवडणूक रोख्यांच्या ‘अपारदर्शी’ योजनेमुळे भ्रष्टाचाराला वाव मिळतो. सत्ताधारी व विरोधकांना समान संधी मिळत नसल्याचे ही योजना लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात केला. हे प्रकरण गुंतागुंतीचे असल्याची टिप्पणी न्यायालयाने सुनावणीदरम्यान केली. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रीफॉम्र्स (एडीआर) या स्वयंसेवी संघटनेसह इतरांनी केलेल्या निवडणूक रोख्यांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर मंगळवारपासून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरू झाली. न्या. संजीव खन्ना, न्या. भूषण गवई, न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांचा घटनापीठात समावेश आहे. एडीआरची बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण म्हणाले, की निवडणूक रोख्यांमुळे राजकीय…