नवी दिल्ली : वृत्तसंस्था खरी राष्ट्रवादी कुणाची यावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. आजही शरद पवार गटाने अजित पवार गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. एकीकडे बोगस कागदपत्रावरून अजितदादा गटाला घेरले तर दुसरीकडे अजित पवारांचा पक्षविस्तारात कुठलाही हातभार नाही. पक्षाचे निर्विवादपणे अध्यक्ष शरद पवार आहेत. त्यांना बदलण्याचा प्रश्नच नाही, असा युक्तिवाद शरद पवार गटाच्या वकिलांनी आयोगासमोर मांडला. कालच्या सुनावणीत शरद पवार गटानं अजित पवार गटाकडून आयोगात दाखल केलेल्या बोगस प्रतिज्ञापत्राचा मुद्दा उचलला. या मुद्द्यावर आयोगाने आधी सुनावणी घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. बोगस प्रतिज्ञापत्र दाखल करणे हा फौजदारी गुन्हा आहे. आयोगाने याची दखल घेत यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी…
Author: Kishor Koli
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील २७ स्वस्त धान्य दुकानांना ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे. त्यात सर्वाधिक दुकाने जामनेरची आहेत. दरम्यान, आणखी ११ दुकानांचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आली आहेत. त्यामुळे मानांकनाचा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने ३७४ दुकानांची आयएसओ मानांकनासाठी निवड केली होती. त्यानुसार दि.११ ऑक्टोबर रोजी १८५ स्वस्त धान्य दुकानांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. दि.९ नोव्हेंबर रोजी आयएसओ प्रमाणिकरणासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव आले होते. त्यातील २७ दुकानांना दि.२३ नोव्हेंबर रोजी ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे. दरम्यान, दि.२२ नोव्हेंबर रोजी जळगाव (१), धरणगाव (५), चोपडा (५) या तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांचा…
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील खाद्यसंस्कृती वेगवेगळी आहे. अनेक देशांमध्ये शाकाहारी खाण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र हल्ली दिसू लागले आहे. अनेक देशांमध्ये मासे आणि समुद्राच्या माध्यमातून मिळणाऱ्या अन्नावर अवलंबून असलेल्याचे प्रमाण अधिक असल्याचे पाहायला मिळते मात्र तुम्हाला जगातील सर्वात महागडा पदार्थ लाखो रुपयांना मिळतो असे सांगितले तर नक्कीच विश्वास बसणार नाही ना? पण हे खरं आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण जगातील सर्वात महागड्या पदार्थांची किंमत ही सोन्याहून ५० पट अधिक आहे. अल्मास कॅवियार असे या पदार्थाचे नाव आहे. या खाद्यपदार्थाचा वापर अनेक डिशमध्ये केला जातो. कॅवियार म्हणजे काय? कॅवियार काय असते हे आधी जाणून घेऊयात. सामान्यपणे लोक कॅवियारला माशांची…
मुंबई : प्रतिनिधी राज्यात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा समुदायाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. या मागणीला अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे,त्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका भुजबळांनी घेतली आहे. शिवाय ओबीसी जनगणनेसाठी मी पंतप्रधान मोदींना भेटणार असल्याचेही भुजबळांनी म्हटलं आहे. यावर आता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसींची जनगणना करण्यासाठी छगन भुजबळ पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याबाबत विचारले असता गोपीचंद पडळकर म्हणाले, “चांगला विषय आहे. ओबीसींची जनगणना झाली पाहिजे, हे सगळ्यांचेच मत आहे. अलीकडेच जेव्हा ओबीसींची…
बुलढाणा : प्रतिनिधी मी सध्या बुलढाणा जिल्ह्याचा पालकमंंत्री या नात्याने विकास योजनांचा आढावा घेत आहे.यामुळे राज्यात काही सुरू आहे,याची मला फारशी कल्पना नाही.यामुळे मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील शाब्दिक संघर्षावर मी काहीच बोलणार नाही. तुम्ही मला वादग्रस्त विषयांमध्ये ओढूच नका,अशी प्रतिक्रिया राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी येथे दिली. बुलढाण्याचे पालकमंत्री वळसे पाटील दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आहेत.या व्यस्ततेत माध्यमाशी बोलताना त्यांनी मराठाविरुद्ध ओबीसी संघर्ष,मंत्री छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील शाब्दिक संघर्ष, या वादग्रस्त विषयांवर बोलण्यास स्पष्ट नकार दिला. मी दोन दिवसांपासून आढावा बैठकांत व्यस्त आहे. त्यामुळे या घडामोडींबद्दल अनभिज्ञ आहे आणि तसेही तुम्ही मला या…
पंढरपूर : वृत्तसंस्था कार्तिकी एकादशीअसून यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापूजा करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकिय महापूजा संपन्न झाली. तसेच यंदाचे मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला गावातील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना पुजेचा मान मिळाला आहे. घुगे दांपत्य गेल्या १५ वर्षांपासून न चुकता वारी करतायत. यंदा त्यांना महापूजेचा मान मिळाला. अनेक वर्षांच्या प्रथेप्रमाणे कार्तिकी एकादशी निमित्त पहाटे राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते महापूजा करण्यात आली. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस एकदिवसीय आधीच पंढरपूरात दाखल झाले होते. यावेळी श्री. विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक…
जळगाव : प्र्रतिनिधी ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या दीडशे वर्षांची परंपरा आणि आध्यात्मिक महत्त्व लाभलेल्या भगवान श्रीरामाचा रथोत्सव गुरुवारी, मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गावागावातून आलेल्या श्रीरामभक्तांचा जनसागर उसळला होता. कार्तिकी एकादशीला निघणारा जळगावचा श्रीराम रथ हा भारतातील एकमेव असल्याचे म्हटले जाते. अयोध्येतील श्रीराम मंदिरात पुढील वर्षी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची पार्श्वभूमी यंदाच्या रथोत्सवाला लाभली होती.
जळगाव : प्रतिनिधी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास व पर्यटन मंत्री ना. गिरीश महाजन यांना जिल्हाबंदीचे आवाहन केले होते. ते आवाहन ना.महाजन यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी स्वीकारुन आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर ना. गिरीश महाजन यांचा दुग्धाभिषेक केला. यावेळी भूषण भोळे, मुविकोरज कोल्हे, राहुल पाटील, रुपेश ठाकूर, यशवंत पाटील, मुकेश पाटील, तुषार चौधरी, मंगेश पाटील, चैतन्य कोल्हे, अमेय राणे, प्रशांत चौधरी, कल्पेश कासार, योगेश चौधरी, योगेश पाटील, शाम पाटील, आनंद, डॉ. क्षितिज भालेराव यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिक : प्रतिनिधी मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यात आता मनोज जरांगे यांनी मोठा दावा केला आहे. छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असून, त्यांना भाजपमध्ये पलटी मारायची असल्याचे जरांगेंनी म्हटले आहे. छगन भुजबळ हे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा खळबळजनक दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यांना पलटी मारायची सवय आहे. त्यामुळे त्यांना भाजपची ऑफर असेल असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भुजबळ तेढ निर्माण करणारे वक्तव्य करतायेत.आमचे बॅनर फाडले जात आहेत. त्यामुळे अजित पवारांनी भुजबळांना रोखावें अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशाराही मनोज जरांगे यांनी…
पुणे : प्रतिनिधी राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी माहिती दिली आहे. मुंबईसह कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंतच्या सर्व ७ आणि खान्देश, नाशिकपासून ते सोलापूर पर्यंतच्या मध्य महाराष्ट्रातील सर्व १० , धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अश्या एकूण २३ जिल्ह्यात कार्तिक एकादशी दरम्यान २३ ते २४ नोव्हेंबर केवळ ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच शनिवार ते सोमवार, २५, २६, २७ नोव्हेंबर दरम्यानच्या तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातला त्यात रविवार २६…