हिंगोली : वृत्तसंस्था महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून राजकीय पेच निर्माण झाला आहे.अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्यास विरोध केला आहे पण मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवरून मागे हटण्यास तयार नाहीत. यानंतर आता छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी गठीत केलेली न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती तत्काळ रद्द करा आणि मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यावर ताबडतोब स्थगिती द्या, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. ते हिंगोली येथे ओबीसी एल्गार मोर्चात बोलत होते. छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी ते म्हणाले की, “गरीब मराठा समाजाला आरक्षण द्या. फक्त…
Author: Kishor Koli
पुणे : प्रतिनिधी जागतिक संघटनेकडून बंदी घालण्यात आलेल्या भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहणाऱ्या हंगामी समितीने आश्चर्यकारक निर्णय घेण्याची प्रथा कायम ठेवली आहे. २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा मिळवणाऱ्या कुस्तीगिरांनाही या स्पर्धेसाठी भारताच्या संघात थेट स्थान मिळणार नाही. त्यांनाही पात्रता सिद्ध करण्यासाठी निवड चाचणीत खेळणे अनिवार्य करण्याचा निर्णय हंगामी समितीकडून घेण्यात आला आहे. हंगामी समिती सुरुवातीला आव्हानवीरांची निवड करणार आहे. समितीने निश्चित केलेल्या आव्हानवीरांशी देशाला ऑलिम्पिक कोटा मिळवून दिलेले मल्ल १ जून २०२४ रोजी खेळतील आणि या लढतीतील विजेता मल्ल ऑलिम्पिकसाठी जाईल. आतापर्यंत देशाला ऑलिम्पिक कोटा मिळवून देणारा मल्लच ऑलिम्पिकमध्ये खेळला आहे. हंगामी समिती आता वेगळय़ा हुकूमशाहीने वागत असल्याची चर्चा कुस्ती…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक श्रीमंत कुटुंब परदेशात लग्न करत असल्याच्या ट्रेंडमुळे आपण फार व्यथित असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी देशवासियांना भारतातच लग्न करा, जेणेकरुन आपला पैसा परदेशात जाणार नाही असे आवाहनही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून देशवासियांशी संवाद साधताना लग्नाची खरेदी करताना ‘मेड इन इंडिया’ वस्तूंनाच प्राधान्य द्या असे आवाहन केले आहे. “आता लग्नाचा हंगाम सुरु झाला आहे. लग्नाच्या हंगामात तब्बल ५ लाख कोटींची उलाढाल होईल असा अंदाज अनेक तज्ज्ञ दर्शवत आहेत. लग्नासाठी खरेदी करताना तुम्ही सर्वांनी फक्त भारतात तयार केलेल्या वस्तूंनाच प्राधान्य द्यायला हवं,“ असे आवाहन नरेंद्र मोदींनी केले आहे. “आता…
जळगाव : प्रतिनिधी आ. एकनाथराव खडसे यांचा आजार केवळ ढोंग असून त्यांना १३७ कोटींची नोटीस आल्यामुळे ते दवाखान्यात बसले आहेत, असे विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. त्यावर आ. एकनाथराव खडसे यांनी काल रविवारी २६ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलचे वैद्यकीय कागदपत्रे सादर करुन आजाराबाबत माहिती दिली तसेच, आजार खरा असतानाही तो खोटा असल्याबाबत सांगून समाजात बदनामी केल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन यांना आ. खडसे यांनी १ रुपयांच्या अब्रुनुकसानीची नोटीस दिली आहे. तसेच, मी आव्हान दिल्याप्रमाणे तुम्हाला जोडे मारायला कधी येऊ? असा प्रश्नही मंत्री महाजन यांना केला आहे. तसेच, मंत्री महाजनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि…
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह इतर अनेक महत्त्वाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील ५४०० ग्रेड पेची मर्यादा रद्द करण्याप्रमाणेच केंद्राप्रमाणे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे महासंघाकडून सांगण्यात आले. सध्या राज्य शासन सेवेतील वर्ग अ, ब आणि क संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८वर्षे आहे; तर संवर्ग ड मधील कार्यरत कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे आहे. सध्या केंद्रीय कर्मचारी, राज्य शासनातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी, चतुर्थ सेवेतील कर्मचारी, तसेच…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था सरकारमध्ये गृहसचिव असलेले निवृत्त आयएएस अधिकारी एस. लक्ष्मी नारायणन यांनी आपल्या आयुष्याची कमाई राम मंदिरासाठी दान केली आहे. नारायणन यांनी रामचरितमानसाठी ५कोटी रूपये दिले आहेत. ५ कोटी रुपये खर्चून तयार केलेले १५१ किलो रामचरितमानस मूर्तीसमोर बसवले जाणार आहे. या महाकाव्याचे प्रत्येक पान तांब्याचे असून २४ कॅरेट सोन्यात बुडवले जाणार आहे. त्यानंतर सोन्याने जडवलेली अक्षरे त्यावर लिहिली जातील. यासाठी तब्बल १४० किलो तांबे आणि पाच ते सात किलो सोने लागणार आहे. सजावटीसाठी इतर धातू देखील वापरले जाणार आहेत. या पुस्तकासाठी नारायणन यांनी आपली सर्व मालमत्ता विकून सर्व खात्यांमधील पैसे दान करण्याचा निर्णय घेतला. नुकतेच पत्नीसह अयोध्येला गेलेल्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था संविधान दिनाचे औचित्य साधून उद्या (२६ नोव्हेबर) सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होईल. या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयात बाबासाहेबांचा पुतळा बसविण्याची प्रदीर्घ कालावधीपासून रखडलेली मागणी मार्गी लागणार आहे. वकिलाच्या वेशभूषेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात राज्यघटना असा हा पुतळा आंतरराष्ट्रीय किर्तीचे मूर्तीकार नरेश कुमावत यांनी तयार केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य इमारतीमध्ये हा पुतळा बसविण्यात येणार असून यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. आंबेडकरांचा पुतळा सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात असावा यासाठी सातत्याने मागणी सुरू होती. सुप्रीम कोर्ट आर्ग्युइंग कौन्सेल असोसिएशनने यासाठी सरन्यायाधीशांना पत्र पाठविले होते. राष्ट्रपतींच्या हस्ते होणाऱ्या या…
जळगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भजनी मंडळांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात भाषण करताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या अनोख्या शैलीत जोरदार फटकेबाजी केली. आपल्या नशिबात असेल तर आगामी निवडणुकांमध्ये सर्वांना चारी मुंड्या चित करून पुन्हा भगवा घेऊन येऊ , मात्र नशिबात नसेल तर येणार नाही, असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. त्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. मंत्री पाटील म्हणाले की, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण कार्य करत असतो. तथापि, आपण हे कार्य मतांसाठी करत असल्याची टीका विरोधकांकडून होते. तथापि, आपण मतांसाठी कुठलेही काम करत नाही. धर्मा करत असतो. समाजाचं…
सोलापूर : वृत्तसंस्था आरक्षणाचा विषय, जातनिहाय जनगणना या विषयांवर पक्षापेक्षा माझे वेगळे मत आहे. शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि जातीय व्यवस्थेवर काम करायचे हे मला मान्य नाही. ज्यांना आरक्षणाचा लाभ झाला आहे त्यांनी आरक्षण सोडून दिले पाहिजे, श्रीमंतांनी आरक्षणाचा लाभ घेऊ नये असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केलं. ओबीसींचे काढून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये असे मतही त्यांनी व्यक्त केले. सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, सन १९८० पर्यंत जात हा मुद्दा राज्यात महत्त्वाचा नव्हता, १९८५ नंतर मात्र परिस्थिती बदलली. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि जातीय व्यवस्थेवर चालायचे हे मला अजिबात मान्य नाही.…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आरक्षणासाठी राज्यभर दौरे करत आहेत. दुसरीकडे ओबीसी नेतेही सभाचं आयोजन करत आहेत. तर, धनगर समाजही आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. अशातच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे-पाटलांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. “जातीयवादी पिलावळ आरक्षण मागत आहे पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांंचे नावही घेण्यास तयार नाही,” असे म्हणत गोपीचंद पडळकरांनी जरांगे-पाटलांना लक्ष्य केले आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले, “धनगर आरक्षणासाठी न्यायालय, रस्त्यावर लढाई सुरू असतानाच सरकारकडेही पाठपुरावा सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आम्हाला आरक्षण दिले होते. “काही पुरोगामी नेत्यांनी जातीयवादी पिलावळ तयार केल्या…