गुवाहाटी : वृत्तसंस्था सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पाकिस्तानचा मोठा विक्रम मोडू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. यासह ‘मेन इन ब्लू’ने सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकणाऱ्या पाकिस्तानची बरोबरी केली आहे. आता भारतीय संघ सामना जिंकताच हा एक नवीन विक्रम आपल्या नावावर करेल तसेच, या सामन्यात विजय मिळवताच ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका देखील जिंकेल. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये पाकिस्तानने सर्वाधिक १३५ विजयांची नोंद केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात जेव्हा भारतीय संघ गुवाहाटीच्या बारसापारा मैदानावर उतरेल तेव्हा पाकिस्तानच्या या विक्रमावरही नजरा असतील. तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफील्ड क्रिकेट स्टेडियमवर रविवारी भारताने दुसरा टी-२० सामना…
Author: Kishor Koli
मुंबई : प्रतिनिधी राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री तेलंगणात जाऊन प्रचार करत आहेत.त्यामुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंनी सरकारवर टीकास्र डागले आहे. राज्यात सरकार आहे की नाही, असा प्रश्न पडला असल्याचे ते म्हणाले.आज त्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत सरकारच्या कारभारावर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात असंवैधानिक सरकार आहे पण हे सरकार तरी आहे की नाही,असा प्रश्न पडला आहे. प्रदुषण पाहिल्यानंतर आपल्या असंवैधानिक सरकारने जाहीर केले होते की मुंबईतील रस्ते धुवू आणि कृत्रिम पाऊस पाडू. यांच्याकडे सगळं कृत्रिमच आहे. पण तो कृत्रिम पाऊस पाडता आला नाही. सुदैवाने मुंबईत पाऊस पडला आणि…
मुंबई : प्रतिनिधी राज्यभरात अवकाळी पावसाने अनेक भागांत अवकृपा केली आणि संकटामुळे शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध पुन्हा फुटला आहे. रविवारी रात्री,तसेच सोमवारी दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील पिके जमीनदोस्त झाली. तसेच हिवाळ्यात हिरव्या भाजीपाल्यासल टमाटा, हिरव्या मिरचीला मागणी असते, त्या पिकांमध्ये पाणी शिरून कुठे गारपीट होऊन पिकांचे नुकसान झाले आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, अहमदनगर, वाशिम, नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात कांदा, द्राक्ष पिकांचे तर पुणे कांदासह बटाटा पिकांचं मोठे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्येही गारपिटीनं झोडपलं, द्राक्ष पिकांना मोठा फटका बसला आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस अवकाळी…
जळगाव : प्रतिनिधी उडान ५.० प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेंतर्गत ‘फ्लाय ९१’ एअरलाइन्सने जळगाव विमानतळाला पुणे, हैदराबाद आणि गोवा या शहरांबरोबर जोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. फेब्रुवारी २०२४ पासून जळगावातून २१ उड्डाणे प्रस्तावित आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात काल आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली ‘फ्लाय ९१’ एअरलाईन्स कंपनीच्या व्यवस्थापन अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. यावेळी फ्लाय ९१ एअरलाईन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनीजळगाव विमानतळ सेवेशी जोडण्याचा प्रस्ताव ठेवला. बैठकीपूर्वी फ्लाय ९१ कंपनीच्या व्यवस्थापनाने जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास, पर्यटन मंत्री गिरीश महाजन व खासदार उन्मेष पाटील यांच्याशी विमानसेवेबाबत चर्चा केली होती. जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले, जिल्ह्यातील १२ ठिकाणांचा विकास आराखडा वन आणि सार्वजनिक बांधकाम…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कन्नड घाटात रविवारी मध्यरात्री नंतर कार दरीत कोसळून चौघांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत. धुके आणि अंधाराचा अंदाज न आल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून कार दरीत कोसळली. जखमींना तातडीने चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांत पती-पत्नी, आठ वर्षांच्या मुलीसह एका महिलेचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील भाविक मोटारीने दर्शनासाठी गेले होते. तेथून ते परत येत असताना कन्नड घाटात मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या मोटारीला अपघात झाला. अपघातील मृतः या अपघातात प्रकाश गुलाबराव शिर्के (वय६५),शिलाबाई प्रकाश शिर्के (वय६०),वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी (वय ३५), पूर्वा गणेश देशमुख (वय८) या चार जणांचा मृत्यू…
नाशिक : प्रतिनिधी छगन भुजबळ यांच्यासह आम्ही अनेक वर्षे काम केले आहे. मी जे सांगणार आहे त्याबद्दल गैरसमज करुन घेऊ नका. मात्र मला छगन भुजबळ यांना इतकी विनंती करायची आहे की, ज्या मागण्या तुम्ही व्यासपीठावर करत आहात त्या मागण्या जर बंद दरवाजाच्या आड केल्या तर बरं होईल कारण तो त्यांचा अधिकार आहे.छगन भुजबळ हे कॅबिनेट मंत्री आहेत त्यामुळे तो अधिकार आहे. महाराष्ट्राच्या दुर्दैवी आणि गलिच्छ राजकारणात जो गोंधळ सुरु आहे त्यात छगन भुजबळ यांना मंत्रीपद आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळात ते जर बोलले तर बरं होईल. खोके सरकारमुळे महाराष्ट्र अस्थिर झाला आहे, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे. या महायुतीच्या सरकारकडे…
नाशिक : प्रतिनिधी राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. जुन्या नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी आरक्षणात समावेश केला जाणार असल्याने राज्यातल्या अनेक ओबीसी नेत्यांनी त्यास विरोध दर्शवला आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे या आरक्षणाला विरोध करत आहेत तसेच भुजबळ यांनी जालना आणि हिंगोली येथे ओबीसी एल्गार सभा आयोजित करून या सभांमधून मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर कडाकडून टीकादेखील केली. गेल्या काही दिवसांपासून भुजबळ आणि जरांगे यांच्यात मोठा वाद चालू आहे. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे राज्यात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होत असल्याची टीकादेखील होऊ लागली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार…
अहमदाबाद : वृत्तसंस्था या वर्षीच्या आयपीएल लिलावापूर्वी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्समध्ये खरेदी केल्यानंतर शुभमन गिलची गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल गुजरातचा नवा कर्णधार असेल.गेल्या मोसमात रशीद खानकडे उपकर्णधारपद होते. गिलने आतापर्यंत ४५ फॉरमॅटमध्ये २११८ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने ७ शतके आणि १० अर्धशतके ठोकली आहेत. वर्षभरात त्याची सरासरी ५०.४२ इतकी आहे. यावर गिल म्हणाला, “गुजरात टायटन्सचे कर्णधारपद स्वीकारताना मला आनंद आणि अभिमान वाटत आहे. अशा उत्कृष्ट संघाचे नेतृत्व करण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल फ्रँचायझीचे आभार मानतो. आमच्याकडे दोन अपवादात्मक हंगाम आले आहेत. मी आमच्या रोमांचक क्रिकेट ब्रँडसह संघाचे नेतृत्व करण्यास…
मुंबई : प्रतिनिधी जवळपास दोन तास झालेल्या ड्राम्यानंतर हार्दिक पांड्याची अधिकृतपणे मुंबई इंडियन्समध्ये घरवापसी झाली आहे. रविवारी संध्याकाळी ५ वाजता आयपीएलची रिटेंशन विंडो बंद करण्यात आली. त्यावेळी गुजरात टायटन्सने त्यांचा कर्णधार हार्दिकच्या नावाचा समावेश रिटेंशन लिस्टमध्ये केला होता. गुजरात हार्दिकला मुंबई इंडियन्ससोबत ट्रेड करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. त्यामुळे हार्दिकचे नाव रिटेंशन लिस्टमध्ये पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मुंबई इंडियन्सने ‘ऑल कॅश ट्रेड’चा आधार घेतला. त्यामुळे हार्दिकची मुंबई इंडियन्समधील घरवापसी निश्चित झाली. गुजरात टायटन्ससोबत औपचारिक स्वरुपात व्यवहार पूर्ण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला पण औपचारिक कागदोपत्री व्यवहार अद्याप तरी पूर्ण झालेली नव्हती…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरासह जिल्ह्यातील चाळीसगाव,भडगाव,पाचोरा तालुक्यात काल सायंकाळी आवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात काहीसा बदल झाल्याचे दिसून आले. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. राज्यात आज अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. याअगोदरच हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार जळगाव शहर व परिसरात काल सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तसेच चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यातील काही भागात गारपीट देखील झाल्याचे वृत्त आहे . अवकाळी पावसामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाने २५ ते २८ नोव्हेंबर दरम्यान या तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज यापूर्वीच व्यक्त केला होता.उत्तर…