पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील बोळे येथून अंत्यविधीसाठी जाणारे एक पिकअप वाहन विचखेडा फाट्याजवळ आले असता वाहनाचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या ट्रक व जीपवर आदळल्याने भीषण अपघात शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास झाला. या अपघातात तीन महिला ठार झाल्या असून २१ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.दरम्यान पारोळा पोलीस स्टेशनला याबाबत रितसर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. रेखाबाई गणेश कोळी (वय ५५), योगिता रवींद्र पाटील (वय ४०, दोन्ही रा. बोळे ता. पारोळा) यांचा जागीच तर चंदनबाई गिरासे (वय ६५) यांचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला आहे.विचखेडा गावापुढे बायपास रस्त्यावर हा अपघात झाला. पारोळा तालुक्यातील बोळे येथून शिंदखेडा तालुक्यातील चिलाणे येथे एका अंत्यसंस्कारसाठी…
Author: Kishor Koli
नवीदिल्ली : वृत्तसंस्था बीसीसीआयने गुरुवारी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली. तिन्ही फॉरमॅटसाठी तीन कर्णधार बनवण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे संघाची घोषणा करताना बीसीसीआयने लिहिले की, “रोहित शर्मा आणि विराट कोहलीने या दौऱ्यावर एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतून विश्रांती मागितली होती, जी त्यांना देण्यात आली आहे.” म्हणजेच या टिप्पणीतून एक गोष्ट निश्चित आहे की, दोघांनाही टी-२० मध्ये पुनरागमन करण्याची संधी आहे. विराट आणि रोहित टी-२० विश्वचषकासाठी पुनरागमन करतील, असे मानले जात आहे. आयपीएलनंतर या प्रकरणावर निर्णय होऊ शकतो. रोहितसमोर दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कर्णधारपदाचा प्रस्तावही देण्यात आला होती, मात्र त्याने सध्यातरी या प्रस्तावास नकार दिला आहे. १० डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण…
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी कांँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटातील नेत्यांकडून शरद पवारांवर करण्यात आलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की १९९३ साली पक्ष स्थापन झाला, याची स्थापना कोणी केली, महाराष्ट्रातील लहान पोरं देखील याचे उत्तर सांगतील शरद पवार यांनी केला. घड्याळ देशभरात कुणी नेलं, ओडिसा, अरुणाचल प्रदेश, आसाममध्ये आमदार होते ते कुणामुळं होते, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. शरदचंद्र सिन्हा यांच्यासारखा काँग्रेसमधील वरिष्ठ नेता शरद पवारांसोबत उभा राहिला होता. केरळमध्ये पक्षाचे लोकप्रतिनिधी होते, या पक्षाला राष्ट्रीय नेतृत्त्व कुणामुळं मिळालं होतं, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला केला. तुम्हाला ५ जुलैच्या सभेत शरद पवारांचा फोटो…
कर्जत : वृत्तसंस्था राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. मराठा समाजाने कुणबी जात प्रमाणपत्र आणि आरक्षणाची मागणी लावून धरल्याने ओबीसी समाजाने त्याला कठोर विरोध केला आहे. यामुळे मराठा समाजातील नेते आणि ओबीसी समाजातील नेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात तर शाब्दिक युद्धच सुरू झाले आहे. त्यामुळे समाजातील वातावरण गढूळ होत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोघांचाही उल्लेख न करता सज्जड दम भरला आहे. कर्जत येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असतो, तो असलाच पाहिजे. परंतु, पहिल्यांदा आपला देश, आपला भारत, आपला…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभेची मिनी फायनल समजल्या जाणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या ५ राज्यांमध्ये मतदान पूर्ण झाले आहे. ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. पण त्याआधी एक्झिट पोल समोर आले आहेत. मध्य प्रदेशात काँग्रेसला विजयाची शक्यता इंडिया टुडे, माय ॲक्सिस इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, मध्य प्रदेशमध्ये भाजपला १०६-११६, काँग्रेसला १११-१२१ आणि इतरांना ६ जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात २३० जागा आहेत. येथे बहुमतासाठी ११६ जागांची गरज आहे. २०१८ च्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ११४ जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला १०९ जागा मिळाल्या होत्या. बसपाने दोन तर सपाने एक जागा जिंकली. युती करून काँग्रेसने बहुमताचा ११६…
जळगाव : प्रतिनिधी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये सरकारमधील मंत्री सहभागी असू शकतात. गुन्हेगारांना रुग्णालयात नेऊन ठेवण्यात, रुग्णालयातून बाहेर काढण्यात सरकार मध्ये असणाऱ्यांचेच हात आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. याप्रकरणी स्वतंत्रपणे चौकशी झाली पाहिजे अशी मागणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगावात पत्रकारांशी बोलताना केली. नाशिक येथे कोट्यवधी रुपयांचे ड्रग सापडले. या प्रकरणात ललित पाटील अटकेत आहे. या प्रकरणात जळगाव-चाळीसगाव कनेक्शन उघड झाले. तसेच याप्रकरणात सरकारमधील मंत्र्यांचा समावेश असल्याची शक्यता पाटील यांनी बोलून दाखवली. मात्र सरकार सर्व गुलदस्त्यात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. जळगाव कनेक्शन यावरन पांघरून घालण्याचा प्रयत्न करावा लागतो मात्र ते पांघरून किती वेळा घालणार हे सर्वांना माहिती आहे. काय झाले…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बल्गेरियातील बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणी दरवर्षी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. भविष्यकार बाबा वेंगा यांनी २०२३ साठी देखील अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यांनी २०२२ साठी वर्तवलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. २०२३ संपायला अजून एक महिना शिल्लक आहे. या काळात पृथ्वीवर मोठं संकट कोसळू शकतं असं भाकित बाबा वेंगा यांनी केलं आहे. २०२३ संपण्यापूर्वी पृथ्वीवर एक आण्विक आपत्ती येईल, अशी धक्कादायक भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी केली आहे. बाबा वेंगा यांनी अमेरिकेच्या ९/११ हल्ल्याचं कथित भाकीत खरं ठरलं होतं असं सांगितलं जातं. आता २०२३ संपण्यापूर्वी मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या स्फोट होईल, ज्यामुळे विषारी ढग आशियावर स्थिर होतील,…
मलकापूर : प्रतिनिधी शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभे असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण २०२४ ला मदत केल्यास भारत देश हा जगातील महासत्ता देश होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मलकापूर येथे आयोजित जनसंवाद यात्रेप्रसंगी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत ८० कोटी लोकांना मोफत रेशन वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तीन कोटी गरीब कुटुंबांना कायमस्वरूपी घरे मिळाली आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी आणि पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भाजपाच्यावतीने पंतप्रधान मोदी यांनी आर्थिक दृष्ट्या दुर्बल वर्गासाठी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये १० टक्के आरक्षण सुनिश्चित केले गेले तर शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल…
पुणे : प्रतिनिधी मराठा समाजातील अनेकजण गरीब आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण हे मिळाले पाहिजेच. परंतु, ओबीसी समाजाच्या वाट्याचे आरक्षण काढून ते मराठ्यांना देऊ नये, या मताचा मी आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. कुठल्याही राजकीय नेत्याने मराठा आणि ओबीसी अशी झुंज लावू नये. माझ्या काळात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात आले होते पण ते ओबीसींचे काढून दिले नव्हते, असे नारायण राणे यांनी म्हटले. ते गुरुवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी नारायण राणे यांना राज्यात सुरु असलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी वादाबाबत विचारणा करण्यात आली. यावर नारायण राणे यांनी म्हटले की, कुठल्याही राजकीय…
अलिबाग : वृत्तसंस्था परिस्थिती बघून राजकीय युती करावी लागते, यातून कुठलाच पक्ष सुटलेला नाही. हातावर हात ठेऊन विरोध करणे हा आपला अजेंडा नाही. त्यामुळे सत्तेत बसून लोकांची कामे कशी मार्गी लागतील हे महत्वाचे आहे. आम्ही युती केली असली तरी पक्षाचा विचार सोडलेला नाही. विरोधी पक्षाचे लोक रोज वल्गना करतात पण प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला मी बांंधिल नाही.आमची बांधिलकी लोकांशी आहे,ती आम्ही ठेऊ अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत येथे मांडली. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार सभेत बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, रुपाली चाकणकर, अनिकेत तटकरे, सुधाकर घारे, दत्ताजीराव मसूरकर उपस्थित होते. सध्या…