जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वडनगरी फाट्यानजीक बडे जटाधारी महादेव मंदिर परिसरात सुमारे ३०० एकर जागेत पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा सोहळ्यास मंगळवारपासून प्रारंभ झाला. सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलासह मध्यवर्ती भागांत प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पहायला मिळाले. या सोहळ्याच्या नियोजनासाठी एक हजारावर पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे सहाशेवर जवान तैनात असूनही वाहतुकीचा बोजवारा उडाला. सुमारे दोन तासांपेक्षा अधिक वेळ वाहतूककोंडी होती. सोहळ्यास प्रचंड गर्दी लक्षात घेता, पोलीस प्रशासनाकडूनही वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची अधिसूचना पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढली. त्याअनुषंगाने शहरातील मारुती चौकापासून खेडी, आव्हाणे फाटा, वडनगरी फाट्याकडे जाणारी-येणारी वाहतूक ११ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहे.…
Author: Kishor Koli
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मिझोराम विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. झोरम पीपल्स मूव्हमेंटने (झेडपीएम) मोठा विजय संपादन करत ४० पैकी २७ जागांवर विजय मिळवला आहे. राज्यातील सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रन्टला (एमएनएफ) केवळ १० जागांवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे, भाजपालाही २ जागांवर यश मिळाले आहे. तर काँग्रेसला केवळ एकच जागा मिळवता आली. राज्यस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडनंतर काँग्रेसला मिझोराममध्येही पराभवाचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे मिझोराममध्ये झोरम पीपल्स मूव्हमेंट, मिझो नॅशनल फ्रन्ट आणि काँग्रेस पक्षात त्रिशंकू लढत होण्याची अपेक्षा होती. पण या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सपशेल अपयश आले आहे. २०१८ मधील खराब कामगिरीनंतर काँग्रेस पुनरागमन करण्याची आशा होती. मिझोराममध्ये…
जळगाव : प्रतिनिधी गिरीश महाजन यांनी आंतरवली सराटीत आंदोलनस्थळी येवून कायदा बनविण्यासाठी मुदत मागितली होती, आता त्यांनी वेगळी विधाने करुन मराठा समाजाची दिशाभूल करुन उपमुख्यमंत्री फडणवीसांना अडचणीत आणू नये, अशा शब्दात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री गिरीश महाजनांवर निशाणा साधला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणे शक्य नाही, असे विधान महाजन यांनी केले होते. मनोज जरांगे पाटील सध्या धुळे, जळगाव दौऱ्यावर आहेत. जळगावात रविवारी रात्री उशीरापर्यंत जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली. त्यानंतर सोमवारी सकाळी त्यांनी जळगावात पत्रकारांशी संवाद साधताना मराठा आरक्षणावरुन सरकारसह मराठा समाजाच्या आमदारांना देखील निर्वाणीचा इशारा दिला. महाजनांच्या आश्वासनांची अनेक पुरावे…
जळगाव : प्रतिनिधी मराठा समाजाने आरक्षणाची लढाई ८० टक्के जिंकली आहे. आता मराठे कुणावरही विश्वास ठेवणार नाही. राजकारण्यांवर तर नाहीच नाही, त्यांनीच आमची वाट लावल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज सोमवारी मुक्ताईनगर येथिल जाहीर सभेत केला. जळगावात काल रविवारी रात्री सभा घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी जामनेरात रोड शो, त्यानंतर बोदवड व भुसावळात मराठा समाज बांधवांच्य गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर दुपारी मुक्ताईनगर शहरात जरांगे पाटील यांची मोठी जाहिर सभा झाली. जेसीबीतून पुष्पवृष्टी करीत त्यांचे मुक्ताईनगरातील सकल मराठा समाजाकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांनी सभेला संबोधित केले. यावेळी जरांगे पाटील म्हणाले, आरक्षण नसल्याने मराठ्यांचर पोरं आत्महत्या…
मुंबई : प्रतिनिधी लोकसभेची सेमीफायनल महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या तीन राज्यात प्रामुख्याने लढली गेली. त्यामुळे या राज्यातील निकालांचा महाराष्ट्रावर अप्रत्यक्ष राजकीय परिणाम नक्कीच होऊ शकतो. महाराष्ट्रातील सीमेवरील मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या जिल्ह्यांचा विचार केला, तर सीमावर्ती जिल्ह्यांमधील ६९ जागांपैकी भाजपपेक्षा काँग्रेसच वरचढ ठरली आहे. ६९ जागांपैकी ३४ जागांवर काँग्रेस तर ३१ जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. तसेच तेलंगाना आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील ४ जागांवर भारत राष्ट्र समितीचे उमेदवार विजयी झाले आहे. लोकसभेची सेमीफायनल ही एकदंरीतरित्या भाजपला प्रचंड यश देणारी ठरली आहे. विशेष म्हणजे निवडणुक असलेल्या पाच पैकी मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा ही तिनही राज्य महाराष्ट्राच्या शेजारची असल्याने या निवडणूक निकालांचे महाराष्ट्राच्या राजकारणावर…
हैदराबाद : वृत्तसंस्था तेलंगणात आज मोठा अपघात घडला आहे. वायुसेनेचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळून दोन वैमानिक गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत विमान कोसळताच विमानाला आग लागली. तेलंगणातील हैदराबाद येथील एअर फोर्स अकादमीमध्ये प्रशिक्षणादरम्यान सकाळी ८.५५ च्या सुमारास हा अपघात झाला. जखमी वैमानिकांमध्ये एक प्रशिक्षक आणि एक कॅडेटचा समावेश आहे. हैदराबाद येथे ७ प्रशिक्षण विमान कोसळले. या विमानात दोघेजण होते. एकजण प्रशिक्षक आणि एक प्रशिक्षणार्थी वैमानिक त्यात होते. विमान कोसळताच विमानाला आग लागली. त्यामुळे हे विमान जळून खाक झाले. दरम्यान, या विमानाला लागलेली आग विझवण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली तसेच, या अपघातात दोघे जखमी झाले असून कोणतीही जीवितहानी झाली…
पुणे : प्रतिनिधी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून कुणबी आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यात वाद सुरु आहे. या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांमध्ये खडाजंगी सुरु आहे. या सगळ्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून राज्य मागासवर्ग आयोगही चर्चेत आला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी जे सर्वेक्षण होणार आहे, त्यावरुन राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांमध्ये मतभिन्नता आहे. या अंतर्गत वादांमुळे राज्य मागासवर्ग आयोगातील तिसऱ्या सदस्याने राजीनामा दिला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. वैचारिक मतभेद झाल्याचे कारण पुढे करत त्यांनी आयोगाचे अध्यक्षांकडे हा राजीनामा पाठवल्याचे समजते. १ डिसेंबर रोजी आयोगाच्या बैठकीमधील माझ्या व आयोगाच्या वैचारिक मतभेदामुळे…
मलकापूर : प्रतिनिधी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दोन वेळा उपोषण केले आहे पण, सरकारनं दिलेल्या आश्वासानंतर जरांगे-पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिली आहे. अशातच आता मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका मांडली आहे तर, या वक्तव्यानंतर जरांगे-पाटील यांनी महाजनांना सूचक इशारा दिला आहे. गिरीश महाजन काय म्हणाले? “सरसकट मराठा आरक्षणाची मागणी होत आहे.मी जरांगे-पाटील यांची चारवेळा भेट घेतली, तेव्हाही सांगितलंय की, मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणे शक्य नाही. कुणबी दाखले सापडलेल्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. पण, मराठा समाजाला सरसकट आरक्षण कुठल्या कायद्याखाली देणार? हा प्रश्न आहे.…
चाळीसगाव /धुळे/ जळगाव : प्रतिनिधी ही संधी आहे, संधीचे सोने करा, त्यात तुमचा किंवा माझा फायदा नसून घराघरातील मराठ्यांचा फायदा आहे. मराठा आरक्षणासाठी एकजुटीने एक व्हा माझा जीव गेला तरी चालेल मराठा आरक्षणासाठी एक इंचही मागे हटणार नाही, असे प्रतिपादन मनोज जरांगे-पाटील यांनी केले. रविवारी चाळीसगाव, धुळे व जळगावात आयोजित जाहीर सभांमध्ये ते बोलत होते. मनोज जरांगे-पाटील पुढे म्हणाले की, मी मराठ्यांच्या लेकरांसाठी जीवाची बाजी लावली आहे. आरक्षण घरी कोणी आणून देणार नाही. त्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. मराठ्यांना आरक्षण मिळू नये, म्हणून अनेकजण षडयंत्र करीत आहेत. आरक्षणामुळे मराठ्यांच्या पोरांचे मुडदे पडत आहेत. टोळ्यांच्या टोळ्या मराठ्यांच्या विरोधात आल्या तरी मराठे…
नवीदिल्ली : वृत्तसंस्था देशात चार राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले असून मध्यप्रदेशात भाजपाने तर तेलंगणामध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली असून स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे.राजस्थानात भाजपाने बहुमत प्राप्त केले असून काँग्रेसच्या अशोक गहलोत सरकारला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.छत्तीसगडमध्ये भाजपा व काँग्रेसमध्ये मतमोजणी सुरु झाल्यापासून जोरदार रस्सीखेच सुरु असून रात्री भाजपाने निसटती आघाडी घेतली आहे. मध्यप्रदेशातील २३० जागांपैकी १५० हून अधिक जागांवर भाजपाने एकतर्फी आघाडी घेऊन दोन तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत मिळवले आहे तर काँग्रेसला केवळ ६९ जागांवर विजय मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.या राज्यात भाजपाने सत्ता राखण्यात यश मिळवले आहे तर राजस्थानातील अटीतटीच्या लढतीत भाजपाने (११३) बहुमताचा आकडा…