हैदराबाद : वृत्तसंस्था तेलंंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव हे त्यांच्या फार्महाऊसवर पाय घसरुन पडल्याने त्यांना सोमाजीगुडा येथील यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.गुरुवारी रात्री उशिरा इरावल्ली येथील त्यांच्या फार्महाऊसमध्ये ते पाय घसरुन पडले. त्यामुळे केसीआर यांच्या कंबरेला मार बसला आहे. केसीआर यांची प्रकृती सध्या स्थिर आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे. आज त्यांच्या काही चाचण्या केल्या जाणार आहेत. त्यांना हिप फ्रॅक्चर झाल्याचें डॉक्टरांनी सांगितले आहे तसंच त्यांच्या डाव्या पायाला गंभीर इजा झाली आहे असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. सध्याच्या घडीला केसीआर यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आणि पक्षाचे काही लोक आहेत. केसीआर यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. डॉ. कलवकुंतला…
Author: Kishor Koli
नवी दिल्ली : वृत्तसंस्था लेजेंड्स लीग क्रिकेटमध्ये गौतम गंभीरसोबत झालेल्या वादानंतर एस श्रीशांत सध्या अडचणीत सापडला आहे. लिजेंड्स लीग क्रिकेटच्या कमिश्नरने वेगवान गोलंदाज श्रीशांतला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. बुधवारी व्हिडिओ जारी करताना श्रीशांतने गंभीरने त्याच्यावर कोणतेही कारण नसताना शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. नंतर इंस्टाग्राम लाइव्हमध्ये श्रीशांतने सांगितले होते की, गंभीरने त्याला अनेक वेळा “फिक्सर” म्हटले होते आणि यामुळे वाद निर्माण झाला होता. रिपोर्टनुसार, नोटीसमध्ये लिहिले आहे की, टी-२० स्पर्धेत खेळताना श्रीशांत त्याच्या कराराचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की, वेगवान गोलंदाज श्रीशांतने त्याच्या सोशल मीडिया पेजवरून सामन्यादरम्यान खेळाडूवर आरोप करणारा व्हिडिओ काढून टाकल्यावरच त्याच्याशी बोलणी सुरू केली…
जळगाव : प्रतिनिधी बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियातर्फे उत्तरप्रदेश येथे २० ते २७ डिसेंबर २०२३ दरम्यान होणाऱ्या ७ व्या वरिष्ठ महिला बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघामध्ये दिशा पाटीलची ६०- ६३ किलो वजन गटात निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेची निवड चाचणी अकोला येथे घेण्यात आली होती. निवड चाचणी मध्ये श्रावणी बारगे (सातारा), मितीका गुनेले (मुंबई), तेजस्विनी पारखे (बुलडाणा) व दिशा पाटील (जळगाव)या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. वरील सर्व खेळाडूंवर मात करून दिशाने निवड चाचणीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. दिशाला जिल्हास्तरीय खेलो इंडिया बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक निलेश बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने,…
नागपूर : वृत्तसंस्था हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्यावरून विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यात आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे कुख्यात डॉन दाउदशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करत थेट उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांना पत्र लिहीत जाब विचारला. पत्रात दानवे यांनी फडणवीस यांना लिहले ही, विधानसभा सदस्य नवाब मलिक यांच्याबाबत आपण व्यक्त केलेल्या तीव्र भावना वाचून आनंद झाला. नवाब मलिक यांचे देशद्रोह्यांशी संबंध असल्याने त्यांना अजित पवार यांच्या सत्ताधारी बाकावर बसण्यास आपण विरोध केला. आपण नैतिकता व राष्ट्रवाद याबाबत किती पक्के आहात हेच यातून…
नागपूर : वृत्तसंस्था नागपूर : महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन नागपूरात गुरूवारपासून सुरु झाले. देशद्रोहाच्या आरोपावरून शिक्षा भोगत असलेले आणि सध्या जामिनावर बाहेर असलेले माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक अधिवेशनात उपस्थित राहिले. या वेळी ते सत्ताधाऱ्यांच्या म्हणजे अजितदादांच्या गटातील आमदारांसोबत बसले. हा प्रकार पाहून विरोधकांनी गोंधळ केला आणि नवाब मलिकांबाबत काही सवाल उपस्थित केले. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार…
नागपूर : वृत्तसंस्था शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असवेदनशील आहे, याचा प्रत्यय आज सभागृहात आला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या प्रश्नांवर चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली. मात्र सरकारने चर्चा तर सोडा साधे निवेदन सुद्धा केले नाही. असा घनाघाती आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. नागपूर येथील अधिवेशनाचा पहिलाच दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून गाजला. पायर्यांवर आंदोलन केल्यानंतर सभागृहात विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी सरकारकडे लावून धरली. मात्र अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज रेटत विरोधकांची चर्चा करण्याची मागणी फेटाळली. त्यामुळे संतापलेल्या आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत गंभीर नसल्याचा आरोप…
जळगाव : प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील खडके येथील बालगृहातील मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात बालकल्याण समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांवर गुन्हे दाखल होऊनही त्यांचे राजीनामे घेतले नाहीत. सरकारकडून या प्रकरणात संबंधितांना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड.रोहिणी खडसे (शरद पवार गट) यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला आहे. जिल्ह्यात तीन मंत्री असूनही त्यांचा उपयोग नाही अशी टिकाही त्यांनी केली. खडके येथील प्रकरण जेव्हा उघडकीस आले तेव्हा त्याच्या चार महिने आधी मुलींनी बालकल्याण समितीकडे तक्रार केली होती. समितीच्या तीन सदस्यांना हा प्रकार माहिती असूनही त्याची दखल घेतली नाही. परिणामी आणखी चार महिने मुलींवर अत्याचार झाले. नांदुरा येथे अडिच…
मुंबई : प्रतिनिधी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा आहे. कारण दिशा सालियन मृत्यू प्रकरणात राज्य सरकार आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी करणार आहे. यासंदर्भातला आदेश आजच येण्याची चिन्हे आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात एसआयटी पथक काम करणार आहे अशी माहिती समोर येते आहे. दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काही आमदार करत होते. त्यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे दिशा सालियन प्रकरणात तुरुंगात जातील असे वक्तव्य केले होते. एका मराठी वृत्तवाहिनीने या विषयीचे वृत्त…
मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर वाढलेल्या पोटावरून टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाडांनीही अजित पवारांविरोधात खोचक टोलेबाजी केली. “अजितदादा, त्यादिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला, तेव्हा मला वाटले की, तुम्ही व्यायाम करुन ‘सिक्स पॅक ॲब्ज’ केले असतील. पण हा परवाचा फोटो तुमची ढेरी दाखवतो,” असा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला. जितेंद्र आव्हाडांच्या टोलेबाजीला अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी उत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाड हे राजकारणातील राखी सावंत आहेत. राखी सावंत नेहमी काहीतरी वादंग निर्माण करून प्रसिद्धझोतात येण्याचा प्रयत्न करते. तसेच जितेंद्र आव्हाड करत…
मुंबई : प्रतिनिधी इंडियन प्रीमियर लीग २०२४ सुरु होण्यास काहीच महिने शिल्लक असून आता सर्वांच्या नजरा १९ डिसेंबरला होणाऱ्या लिलावाकडे लागल्या आहेत. गुजरात संघाचा कर्णधार राहिलेला हार्दिक पांड्या त्याच्या जुन्या संघ मुंबई इंडियन्समध्ये परतल्यानंतर गुजरात टायटन्सला आणखी एक धक्का बसू शकतो. या दरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. गुजरात टायटन्स संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीला एका संघाने थेट ट्रेडबाबत बोलणे केले. गुजरात टायटन्सच्या सीओओने एका मुलाखतीत दावा केला की, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला एका संघाने संपर्क केला होता. गुजरात टायटन्सचे सीओओ कर्नल अरविंदर सिंग यांनी एक खळबळजनक खुलासा केला की, एक फ्रँचायझी शमीवर लक्ष ठेवून होती आणि त्यांनी शमीला संघात…