Author: Kishor Koli

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्पाला ४ हजार ८९० कोटी रूपये खर्चाला चौथ्यांदा सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे., अशी माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे. १७ टीएमसी पाण्याचे सिंचन होऊन अमळनेर व चोपडा तालुक्यातील ४३ हजार ६०० हेक्टर क्षेत्राला लाभ होणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. निम्न तापी प्रकल्पाच्या कामाची सुरुवात सन १९९९ मध्ये झाली. मात्र काम कासव गतीने होत होते. आता, वेगेवेगळ्या अडचणींवर मात करून सन २०२१ मध्ये प्रकल्पाचे कामाला पुन्हा देण्यात आला. दरम्यान, सन २०१० मध्ये या प्रकल्पाचा पाणी वापर १०.४ टीएमसी पर्यंत कमी करून २५ हजार ६५७ हेक्टर एवढे लाभक्षेत्र मर्यादित करण्यात…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था एसटी कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेवरून विधिमंडळ अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली. रिझर्व्ह बँकेचे नियम शिथिल करून वकील गुणरत्न सदावर्ते यांचा नातेवाईक असलेल्या अवघ्या २२ वर्षीय तरुणाला या बँकेच्या एमडी पदावर नियुक्त करण्यात आले आणि ही बँक अडचणीत आली, असा आरोप रोहित पवार यांनी केला. त्यानंतर जयंत पाटील यांनीही एमडी पदावर नेमणूक करण्यात आलेल्या या तरुणाला काढून टाकण्यात येणार का, असा प्रश्न विचारत सरकारला धारेवर धरले. एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेबद्दल बोलताना रोहित पवार म्हणाले की, सहकारी बँकेत ६२ हजार सभासद आहेत. त्याच्या पाचशे शाखा आहेत २३ हजार कोटींपेक्षा अधिक…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था जुन्या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीची मागणी करत राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी इशारा दिल्याप्रमाणे आक्रमक भूमिका घेतली. गुरूवारी राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने करण्यात आली. तसेच कर्मचाऱ्यांकडून राज्यव्यापी संपही पुकारण्यात आला होता. या संपात राज्यातील तब्बल १७ लाख कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल गुरूवारी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारची भूमिका मांडली. या संदर्भातील अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तसेच कर्मचाऱ्यांची आर्थिक, सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे राखली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेतला आहे. राज्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुनी सेवा निवृत्ती वेतन योजना लागू…

Read More

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था माझ्या मुलामुलींना शिकवण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध असताना, माझ्या मुलांना आरक्षण नसल्यामुळे भविष्यासाठी मी काही करू शकत नाही. येणाऱ्या काळात मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मी आत्महत्या करीत आहे, अशा आशयाची चिठ्ठी लिहून एका ३९ वर्षीय तरुणाने शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथे उघडकीस आली. दरम्यान या प्रकरणी अधिक माहिती अशी की,विजय पुंडलिक राकडे रा. खामगाव (गोरक्ष) फुलंब्री असे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये गाजत असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील तरुणाने शिवरायांच्या पुतळ्यासमोर विषारी औषध प्राशन करून स्वतःचे आयुष्य संपवले.आत्महत्या…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या क्रिकेटपासून दूर आहे मात्र लवकरच शमी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये अप्रतिम गोलंदाजी करणाऱ्या शमीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या या उत्कृष्ट परफॉर्मन्सची दखल केवळ चाहते नाही तर आता बीसीसीआय घेतली असून या खेळातील सर्वात मोठ्या पुरस्काराच्या यादीत मोहम्मद शमीचे नाव समाविष्ट झाले आहे. मोहम्मद शमीला क्रीडा क्षेत्रातील दुसरा प्रतिष्ठित पुरस्कार अर्जुन पुरस्कार मिळू शकतो अशी माहिती सध्या समोर येत आहे. वृत्तानुसार, खुद्द बीसीसीआयने क्रीडा मंत्रालयाला याची शिफारस केली आहे. २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत मोहम्मद शमीला फक्त ७ सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याला…

Read More

पुणे : प्रतिनिधी आपल्या मुलांना गोष्ट वाचून दाखवा अशी सूचना देण्यात आल्यानंतर घड्याळ सुरू झाले अन्‌‍‍ जवळपास पाच मिनिटे मैदानावर शांततेत वाचन सुरू झाले. सर्व तपासणी पूर्ण करून तीन हजार ७७ पालकांनी सलग चार मिनिटे गोष्ट सांगण्याचा नवा विश्वविक्रम भारताच्या नावे नोंदवला गेल्याचे जाहीर करण्यात आले. या उपक्रमातून भारताने चीनचा विक्रम मोडीत काढला. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत पुणे महापालिकेने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी सकाळी आयोजित केलेल्या ‘पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्ट सांगणे’ हा उपक्रम झाला. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उद्योजक जय…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून काल बुधवारी लोकसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभेचं कामकाज सुरू असताना दोन अज्ञात व्यक्ती सभागृहात शिरले. प्रेक्षक गॅलरीतून हे दोघे सभागृहात आले. सुरक्षा व्यवस्था भेदून सभागृहात आले आणि खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावू लागले होते. यावेळी पिठासीन अध्यक्षांनी या दोघांना पकडण्यास सांगितले. काही खासदार या दोघांना पकडण्यासाठी धावले. दरम्यान, पिठासीन अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी लोकसभा दोन वाजेपर्यंत स्थगित केली होती. गोंधळ पाहून सर्व खासदार सभागृहाबाहेर पडले. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंतही बाहेर आले. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. सावंत यांनी सभागृहात घडलेल्या घटनेची माहिती देताना सांगितले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी जल्लोषात झाला. कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी हे अध्यक्षस्थनी होते. जिल्हास्तरावरून विद्यापीठ स्तरावरील संशोधन स्पर्धेसाठी ३४७ प्रवेशिकांची निवड करण्यात आली होती. ११ डिसेंबर रोजी पहिल्या फेरीत सादरीकरण केल्यानंतर १५२ प्रवेशिकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. बुधवारी विद्यापीठाच्या विविध सहा प्रशाळांमध्ये या प्रवेशिकांचे सादरीकरण झाले. त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. पारितोषिक वितरण प्रसंगी बोलतांना अशोक गाडे म्हणाले की, निरीक्षण, परीक्षण आणि सर्मपण हे गुण अविष्कार निर्मितीसाठी आवश्यक आहे. श्री. गाडे यांनी यावेळी स्वत:चे अनुभव विषद केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. माहेश्वरी यांनी संशोधक विद्यार्थ्यांसमोर नवीन प्रयोग करणाऱ्या व्यक्ती…

Read More

जळगाव : प्रतिनिधी ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत जळगाव केंद्रातून नाट्यरंग बहुउद्देशीय संस्था, जळगाव या संस्थेच्या हम दो NO या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी काल बुधवारी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या नाटकाची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २४ नोव्हेंबर ते १० डिसेंबर दरम्यान छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे जळगाव केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव या संस्थेच्या ‘मजार’ या नाटकास द्वितीय पारितोषिक उत्कर्ष कलाविष्कार संस्था, भुसावळ या संस्थेच्या ‘उभ्या पिकातलं ढोरं ’या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये…

Read More

देशातील पाच राज्यातील निवडणुकीचे निकाल घोषित होऊन दहा दिवस उलटले आहेत.त्यामुळे विजयाचे ढोल आता थंडावले असून निकालाचे आत्मपरीक्षण सुरु झाले आहे.हे आत्मपरीक्षण केवळ पराभूत पक्ष करेल असे नाहीतर विजयी पक्षही ते करीत असतो.या निकालात भाजपाने तीन राज्यात विजयश्री खेचून आणली.मध्यप्रदेशात प्रचंड बहुमत प्राप्त करुन सत्ता कायम ठेवली तर राजस्थान व छत्तीसगडमधील चुरशीच्या लढाईत बहुमत मिळवण्यापर्यंत मजल गाठली.चौथे तेलंगणा राज्यात सत्तारुढ बीएसआरचा पराभव करीत काँग्रेसने देखील एकतर्फी विजय संपादन करुन एक राज्य आपल्या खात्यात जमा केले परंतु त्याच वेळी राजस्थान व छत्तीसगड ही दोन राज्ये गमावलीदेखील. लोकशाहीत कोणी किती मते मिळवली त्याला फारसे महत्व दिले जात नाही तर कोणी बहुमताचा आकडा…

Read More