Author: Kishor Koli

नागपूर : वृत्तसंस्था एखादा खासदार किंवा आमदार दोन किंवा तीन वेळा निवडून आला आहे, म्हणून त्याला तिकीट मिळणार असे होत नसते. पक्षाकडून तिकीटवाटपाअगोदर मागील पाच वर्षांतील त्याची कामगिरी विचारात घेतली जाते. खासदार-आमदारांच्या कामगिरीवरच तिकीटवाटप होईल,अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिली. नागपूर प्रेस क्लबला आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते शनिवारी बोलत होते. २०१४ नंतर भाजपाने देशातील राजकारणाच्या प्रणालीतच मोठे बदल घडवून आणले आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणूकांत मागील वेळपेक्षादेखील जास्त जागा मिळतील. विशेषत: बिहारमध्ये चमत्कार बघायला मिळेल तर दक्षिण भारतासाठीदेखील विशेष नियोजन करण्यात आले आहे, असे तावडे यांनी स्पष्ट केले. देशात सध्या भाजपचे काम जनता पाहते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More

मुंबई : प्रतिनिधी भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली असून लवकरच एकदिवसीय आणि कसोटी मालिकेला सुरुवात होईल. या दोन्ही मालिकांआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज दीपक चहरचा समावेश एकदिवसीय संघात करण्यात आलेला नाही तर मोहम्मद शमीला कसोटी संघात स्थान देण्यात आलेले नाही. बीसीसीआयने ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली आहे. कुटुंबातील वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे आपण आगामी एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध नसल्याचे चहरने कळवल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. दीपकच्या जागी नवख्या आकाशदीपला संधी देण्यात आली आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा गाजवणाऱ्या मोहम्मद शमीचा कसोटी मालिकेतील समावेश त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून होता. बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याला…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था आज राज्यभरात मराठा आरक्षणासाठी मोठी आंदोलनं सुरु आहेत. परंतु, मराठा आरक्षणाचा इतिहास काढून बघितला तर कळेल की, मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध हा शरद पवार यांनीच केला. त्यांना वारंवार संधी मिळाली. त्यांच्या मनात असतं तर मंडल आयोग लागू झाला असता तेव्हाच शरद पवार यांनी मराठा आरक्षण दिले असते. पण शरद पवार यांना मराठा समाजाला कधीच आरक्षण दिले नाही, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते शनिवारी नागपूर येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. शरद पवार यांना केवळ विविध समाजांना झुंजवत ठेवण्यात जास्त रस आहे. लोक झुंजत राहिले तर आमच्याकडे नेतेपद राहील, ही शरद पवारांच्या राजकारणाची पद्धत…

Read More

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणात आमदार अपात्रतेवर निर्णय घेण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलेली मुदत सर्वोच्च न्यायालयाने आणखी दहा दिवसांनी म्हणजे,१० जानेवारी २०२४ पर्यंत वाढवून दिली आहे. आमदार अपात्रतेचा निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना याआधी दिले होते. पण, हा निर्णय आता आणखी लांबणीवर पडला आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला, न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने आमदार अपात्रता याचिकांवर निर्णय घेण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी करणारा नार्वेकर यांचा अंतरिम अर्ज मंजूर केला. नार्वेकर यांच्याकडे २ लाखांहून अधिक पानांची कागदपत्रे तपासायची आहेत आणि ते ७ डिसेंबरपासून नागपुरात…

Read More

नाशिक : प्रतिनिधी दर बारा वर्षांनी होणारा कुंभमेळा यंदा २०२६- २७ मध्ये भरणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला होत असलेल्या या कुंभ मेळ्यासाठी शासनाच्या वतीने चार समित्या घोषित करण्यात आल्या आहेत. या जिल्हास्तरीय समितीमध्ये पालकमंत्री दादा भुसे ऐवजी राज्याचे ग्रामविकास आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पुर्वानुभव पहाता अध्यक्ष पदाची सुत्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती असून त्यात अठरा सदस्यांचा समावेश असेल. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपाध्यक्ष तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सदस्य असतील. यानंतर उच्च अधिकार समितीही राज्यस्तरावर असणार आहे तर जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय समिती आणि त्या खालोखाल…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी येथील पाट बंधारे विभागातील एका लिपीकास लाचलुचपत विभागाच्या पथकाने १३ हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. नांदगाव तालुक्यातील तक्रारदाराच्या आजोबाची शेत जमीनीत मन्याड धरणातून गाळ टाकण्यासाठी परवानगी मिळण्याकरिता बारा शेतकऱ्यांनी उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव यांच्याकडे अर्ज केला होता. यासाठी चाळीसगाव येथील उपविभाग विभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग या कार्यालयातील लिपिक तुषार अशोक पाटील यांनी तक्रारदाराकडे तेरा हजार तीनशे रुपयांच्या मागणीसाठी तगादा लावला. वास्तविक शेतकऱ्यांना मन्याड धरणातून शासनाकडून मोफत गाळ देण्यात येतो. वारंवार होणाऱ्या पैशाच्या मागणीला वैतागून संबंधिताने धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था सामाजिक न्याय विभागाअंतर्गत राज्यातील शाहू, फुले, आंबेडकर निवासी अनुसूचित जाती निवासी, अनिवासी आश्रमशाळांच्या शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान लवकरच देण्याबाबत शासन सकारात्मक आहे. याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. राज्यातील शाहू, फुले, आंबेडकर निवासी अनुसूचित जाती निवासी, अनिवासी आश्रमशाळांविषयी सदस्य विक्रम काळे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. उत्तरात गुलाबराव पाटील म्हणाले, संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्यामार्फत या योजनेतील १६५ आश्रमशाळांना कायमस्वरूपी अनुदान मंजूर करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी होती. त्याअनुषंगाने या आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी लागू करण्याबाबत…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मुंबई इंडियन्सचा २०२४ साठी कॅप्टन आता कोण असणार हे आता ठरले आहे. मुंबई इंडियन्सने आज एक पत्रक जाहीर केले आणि त्यामध्ये आपल्या संघाचा आगामी कर्णधार कोण असणार, याची माहिती दिली आहे. मुंंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा आपल्या संंघात स्थान दिले होते पण त्यावेळी रोहित शर्मा हा मुंंबईचा कर्णधार कायम असेल, असे सर्वांना वाटत होते पण त्यानंतर मात्र बऱ्याच गोष्टींची चर्चा सुरु होती.ही चर्चा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाबाबत होती पण आज अखेर मुंबई इंडियन्सने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मुंबई इंडियन्सने आज एक पत्रक जाहीर केले. या पत्रकात हार्दिक पंड्या हा मुंबईचा कर्णधार असेल,असे…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था सरकारने अद्याप द्राक्ष उत्पादक बागायतदार शेतकऱ्यांचे पंचानामेदेखील केलेले नाहीत. प्रत्येक एकरामागे चार लाखांचा खर्च द्राक्ष उत्पादकांना करावा लागतो. यंदा, एक रुपयाही भाव मिळत नसल्याची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर द्राक्षाला एकरी एक लाख मदत द्यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार आणि आमदार सुमन पाटील यांनी शुक्रवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली. सडके, गळके द्राक्ष हातात घेऊन आमदार रोहित पवार आणि आमदार सुमन पाटील यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात आहेत. अवकाळीमुळे त्यांचे कंबरडे मोडले आहे मात्र, गेल्या वर्षीदेखील द्राक्षांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळालेली नाही. यावर्षीची परिस्थिती…

Read More

नागपूरः वृत्तसंस्था मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना एक-दीड वर्षांपासून सांगतोय की,त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा.माझ्यासमोर वरळीतून लढावे अन्यथा मी त्यांच्याविरुद्ध ठाण्यातून लढायला तयार आहे, असे थेट आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुक्रवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले. बोरवली-विरार या रेल्वेसाठी काही कांदळवन हलवायचा प्रयत्न होत आहे. तसा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याची मला माहिती मिळाली. विशेष म्हणजे हे कांदळवन गडचिरोलीला हलविणार असल्याची माहिती आहे. हे तर जखम मांडीला आणि मलम शेंडीला, असा टोला त्यांनी लगावला.

Read More