पुणे : प्रतिनिधी एमपीएससीकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा २०२२ ची मेरिट लिस्ट जाहीर झाली असून त्यामध्ये विनायक नंदकुमार पाटील याने राज्यात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. तर धनंजय वसंत बांगर हा दुसरा आला आहे. मुलींमध्ये अनिता विकास ताकभाते हिने बाजी मारली असून दिपा चांगदेव जेधे ही दुसरी आली आहे. विशेष म्हणजे राज्यसेवेच्या ६०० पदांसाठी गुरूवारी दुपारी मुलाखती घेण्यात आल्या आणि संध्याकाळी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली. राज्यसेवेच्या ६०० पदांसाठी २०२२ साली जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेतून अंतिम १८०० उमेदवार हे मुलाखतीसाठी निवडण्यात आले. या उमेदवारांच्या मुलाखतीचा शेवटचा टप्पा हा गुरूवारी पार पडला आणि त्याच…
Author: Kishor Koli
जळगाव : पारोळा तालुक्यातील सावरखेडा येथील शेतकरी चार दिवस बाहेरगावी गेलेले असताना अज्ञात चोरांनी घराचे कुलूप तोडून घरातील एक लाख ५३ हजार पाचशे रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन पसार झाले. पारोळा तालुक्यातील सावरखेडा येथील भालेराव शंकर पाटील हे शेतकरी असून १४ जानेवारी ते १७ जानेवारी या कालावधीत घराला कुलूप लावून ते बाहेर गेले होते. अज्ञात चोरटे या संधीचा फायदा घेऊन घरातील सोन्याचे मंगळ पोत, सोन्याची अंगठी, चांदीचे कडे व ६० हजार रुपये रोख असा एकूण एक लाख ५३ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले. या प्रकरणी पारोळा परिसरात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक…
जळगाव : प्रतिनिधी विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडीसेविका, मदतनिस, मिनी अंगणवाडीसेविकांनी ३ डिसेंबरपासून संप पुकारला आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील ६ हजारहून अधिक सेविकांनी सहभाग घेतला आहे. जि.प.प्रशासनाने सर्व सेविकांना कामावर हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, जि.प.च्या नोटीसला केराची टोपली दाखवत, अंगणवाडीसेविकांनी आपला संप सुरुच ठेवला आहे. दरम्यान, बुधवारी शेकडो अंगणवाडीसेविका, मदतनिसांनी जि.प.समोर येऊन, जि.प.च्या नोटीसांची होळी केली होती. तर जि.प.च्या नोटीसनंतर ४४ अंगणवाडीसेविका, ६०४ मदतनीसच कामावर रुजू झाल्याची माहिती जि.प.कडून देण्यात आली आहे. तसेच आगामी काही दिवसात ही संख्या वाढेल असाही दावा जि.प.प्रशासनाकडून करण्यात येत आहे. ३ डिसेंबरपासून पुकारण्यात आलेल्या या संपामुळे जिल्ह्यातील ३ हजार अंगणवाड्या बंद आहेत. त्यामुळे…
रत्नागिरी : वृत्तसंस्था एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर सत्तेत सामील न होता उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहणारे राजापूर-लांजा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर गुरुवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून (एसीबी) छापा टाकण्यात आला. एसीबीच्या तीन ते चार पथकांनी राजन साळवी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापा टाकला. एसीबीच्या या छापासत्राची माहिती अवघ्या काही क्षणांमध्ये बाहेर फुटली. ही बातमी मातोश्रीपर्यंत पोहोचतात उद्धव ठाकरे यांनी तातडीने राजन साळवी यांना फोन करुन त्यांच्याशी संवाद साधला. राजन साळवी यांनी रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली तसेच आपण अटकेच्या कारवाईलाही तयार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. राजन साळवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, लाचुलचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी…
बंगळुरू : वृत्तसंस्था अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात रोहित शर्मा भन्नाट फॉर्मात होता. हा सामना त्याच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय सामन्यांपैकी एक ठरला. एकवेळ भारताची धावसंख्या २२ धावांवर ४ विकेट होती. यानंतर रोहित शर्माने शतक झळकावत संघाला २०० च्या पुढे नेले पण रोहितला रिंकू सिंगची साथ मिळाली नसती तर हे शतक झळकावता आले नसते. फिनिशरच्या भूमिकेत असलेल्या रिंकूने तो भारतीय क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार का आहे, हे दाखवून दिले. दडपणाखाली त्याने डाव तर सांभाळलाच पण फिनिशरची भूमिकाही बजावत शानदार षटकार मारले. रिंकू सिंग जेव्हा क्रीजवर आला तेव्हा रोहित शर्मा दबावाखाली होता. चेंंडू त्याच्या बॅटवर येत नव्हता. सिंगल घेण्यासाठीही त्याला संंघर्ष करावा लागत होता…
जळगाव : प्रतिनिधी पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील तीन शेतकऱ्यांनी चांगल्या दरासाठी गुजरातमधील जिनिंगमध्ये कापूस विक्रीसाठी नेणार्या मालमोटार चालकाने बनावट क्रमांकाची पाटी लावत त्यांना सुमारे 10 लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी पारोळा येथील पोलीस ठाण्यात मालमोटार चालकासह वाहतूकदार व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील शेतकरी अशोक पाटील हे वास्तव्यास आहे. शेजारीच त्यांचा लहान भाऊ प्रल्हाद पाटील आणि दिनेश पाटील राहतात. अशोक पाटील यांची शेती पुनगाव शिवारात आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात कापसाला भाव कमी असल्यामुळे तिघांनी मिळून निर्णय घेत माल गुजरात राज्यातील कढी येथील बाजारपेठेत लिलावात विक्रीसाठी पाठविण्याचे ठरवले. त्यानुसार गावातील परिचयातील विजय पाटील यांच्यामार्फत जळगाव येथील…
जळगाव : प्रतिनिधी जातीचे दाखले नोंदींवरून सरसकट मिळावेत, जातवैधता प्रमाणपत्र मिळावे, यांसह अन्य मागण्यांची शासन-प्रशासन दखल घेत नसल्याने आदिवासी कोळी समाज बांधवांनी येथे पुन्हा सुरू केलेल्या आंदोलनाच्या 14 व्या दिवशी बुधवारी जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांच्या प्रतिमा तसेच मंत्रिमहोदयांनी आकाशावरून जमिनीवर यावे, जास्त हवेत उडू नये, असा उल्लेख असलेले काळे फुगे आकाशात सोडून निषेध केला. शहरातील शिवतीर्थ मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आदिवासी कोळी आंदोलन समितीतर्फे अन्नत्याग आंदोलन चालू आहे. पुंडलिक सोनवणे, प्रभाकर कोळी हे उपोषणास बसले आहेत. बुधवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास समितीतर्फे प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वात संतप्त समाजबांधवांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आणि मदत व पुनवर्सनमंत्री अनिल पाटील…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच निकाल जाहीर केला. पण हा निकाल विरोधात गेल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेवर आता सोमवारी २२ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. ठाकरेंच्या वकिलांनी सरन्यायाधिशांकडं विनंती केली आहे. लाईव्ह लॉच्या माहितीनुसार, सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना शिवसेनेच्या वरिष्ठ वकिलांनी विनंती केली की, आपली सुनावणी शुक्रवार ऐवजी सोमवारी ठेवण्यात यावी. त्यामुळे आता ही सुनावणी सोमवार, २२ जानेवारी रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राहुल नार्वेकरांकडं सर्व पुरावे सादर करुनही शिवसेनेतून फुटलेल्या शिंदे गटातील १६ आमदारांवर घटनेतील १०व्या अनुसुचीनुसार अपात्र ठरवण्यात आलेलं नाही, अशी…
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महायुती सरकारवर शिवसेनेकडून सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिकेची एफडी तोडल्यावरुन आणि मुंबईतील विविध रस्ते व पायाभूत सुविधांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महायुती सरकावर केला आहे. आता, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर भ्रष्टाचार व घोटाळ्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे आरोग्य सुविधांच्या निविदांमध्ये हा घोटाळा होत असून ८०० कोटी रुपयांच्या खरेदीसाठी ८००० कोटींची निविदा काढली जात असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. राज्यात अँम्ब्युलन्स घोटाळा उघड झाला असून अँम्ब्युलन्स पुरवठ्याचे टेंडर सरकारने रद्द करावे, दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे, या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी वडेट्टीवार…
जळगाव : प्रतिनिधी शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास त्यातून अधिक नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवले आणि त्यासाठी संबंधित कंपनीचे ॲप्लीकेशन डाऊनलोड करायला सांगून दीपाली मकरंद चौधरी (३३, रा. विद्युत कॉलनी, जळगाव) यांची नऊ लाख ८२ हजार ५० रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृहिणी असलेल्या दीपाली चौधरी यांच्याशी २८ नोव्हेंबर २०२३ ते १६ जानेवारी २०२४ दरम्यान अभिलाषा, अल्बर्ट त्रिवेदी, अक्षय ठाकूर असे नाव सांगणाऱ्यांसह एका कंपनीच्या कस्टमर केअरच्यावतीने संपर्क साधण्यात आला. त्या वेळी चौधरी यांना एका कंपनीचे नाव सांगून त्या मार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास त्यातून मोठा नफा मिळण्याची बतावणी केली.…