Author: Kishor Koli

नागपूर : वृत्तसंस्था मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे-पाटील यांच्यात खडाजंगी सुरू आहे. अशातच छगन भुजबळांनी खोटे कुणबी दाखले देण्याचे काम सुरू असल्याचा आरोप केला होता. यावर अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपूर विधिमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. भुजबळ काय म्हणाले? “आम्हाला पूर्वीचे कुणबी दाखले मान्य आहेत पण, माजी न्यायमूर्ती शिंदे सगळीकडे फिरत आहे आणि खोटे कुणबी दाखले देण्याचे काम सुरू आहे,” असे विधान छगन भुजबळांनी केले होते. नागपूरमधील राजे भोसले हे कुणबी यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, “मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्र भेटत आहेत. मी स्वत: मराठा समाजाच्या संदर्भात अनेक…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था नागपूरच्या बाजारगाव गावातील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत रविवारी स्फोट झाला असून त्यात नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये ६ महिला आणि ३ पुरुषांचा समावेश आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीतील कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंगच्या वेळी हा स्फोट झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, संरक्षण क्षेत्रासाठी शस्त्रास्त्रांचे उत्पादन करणाऱ्या सोलर ग्रुपच्या बाजारगाव येथील इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह लिमिटेड या आयुध निर्माणीत रविवारी स्फोट झाला. यात ९ कामगारांचा मृत्यू झाला असून यात ६ महिला आणि ३ पुरुषांचा समावेश आहे. सोलर ग्रुपद्वारे संचालित इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह लिमिटेड ही संरक्षण क्षेत्रासाठी शस्त्रास्त्रांची निर्मिती करणारा देशातील एक मोठी कंपनी…

Read More

जालना : वृत्तसंस्था मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा आंतरवाली सराटी गावात आज(रविवारी) ठरवली जाणार होती मात्र, याबाबतचा निर्णय आता मनोज जरांगे पाटील यांनी पुढे ढकलला आहे. बीड जिल्ह्यात २३ डिसेंबर रोजी होणाऱ्या सभेत पुढील आंदोलनाची दिशा जाहीर केली जाणार असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडणार आहे. त्यामुळे आधी त्यांची भूमिका कळली पाहिजे, यासाठी हा निर्णय घेण्यात असल्याचेदेखील जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करावे ही आपली मागणी असून सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यात एक तासही कमी होणार नाही. ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत, याचा अर्थ…

Read More

जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली.या मालिकेतील पहिला सामना आज (रविवारी) जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून दणदणीत पराभव केला. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली. या विजयात अर्शदीप-आवेश आणि साई-श्रेयसने मोलाचे योगदान दिले. मालिकेतील दुसरा सामना 19 डिसेंबरला गकबेराह येथे होणार आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विजयाने सुरुवात केली आहे. भारताचा या वर्षातील वनडेतील हा 26 वा विजय आहे. 1999 मध्ये ऑस्ट्रेलियाने 26 सामने जिंकले होते. कांगारू संघाने 2023 मध्ये 30 सामने जिंकले आहेत. आफ्रिकन संघाचा पराभव…

Read More

पुणे : प्रतिनिधी सुसंस्कृत म्हणवल्या जाण्याऱ्या पुण्यामध्ये भोंदूगिरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नैराश्य दूर करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी एका तरुणाला महिलेचे पाय धुतलेले पाणी प्यायला दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या सगळ्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.या तरुणाची दीड लाख रुपयांची फसवणूक झाल्याचेही समोर आली आहे.या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी दोन महिलांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षेतील अपयशामुळे नैराश्याने ग्रासलेल्या तरुणाला पाय धुतलेले पाणी प्यायला देत दीड लाखाचा गंडा घालण्यात आला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा प्रकार उघडकीस आणला आहे. तरुणाची फसवणूक…

Read More

गोंदिया : वृत्तसंस्था मंडळ आयोग स्थापन झाले तेव्हा देवेंद्र फडणवीस जन्मालासुद्धा आले नव्हते. त्यांनी तर राज्यातील बऱ्याच समाजांच्या भावनेशी खेळ मांडला आहे. २०१४ विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी धनगर समाजाला, मराठा समाजाला टिकणारे आरक्षण, लिंगायत समाजाला आरक्षण देऊ म्हणून सांगितले होते, अद्यापपर्यंत दिले का ? उलट मराठा कुणबी, असे दोन समाजांत तेढ निर्माण केले आहे. २०१४ मध्ये माझं सरकार आणा, मी तुम्हाला वेगळा विदर्भ करून देणार. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस हे आजही अविवाहित आहेत, अशी खोचक टीका शिवसेनेचे (उबाठा) नेते आमदार भास्कर जाधव यांनी केली. पलटुरामांना धडा शिकवेल भास्कर जाधव गोंदिया येथील शिवसेनेच्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात…

Read More

मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणप्रश्नी शनिवार (दि. १६) राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या शिष्टमंडळाने गॅलेक्सी रुग्णालयात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. दरम्यान सरकारकडून जरांगे-पाटील यांना आरक्षप्रश्नासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षप्रश्नी सरकारला २४ डिसेंबर हा अल्टिमेटम दिलेला होता. त्यानंतर काल (दि. १५) १७ तारखेला सरकारने आपली भुमिका मांडावी असे स्पष्टपणे सांगितले होते. दरम्यान १७ तारखेला पुढील आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचे देखील सांगण्यात आले. शिष्टमंडळासोबत चर्चा करत असताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला दिलेली वेळ आता सरकारने पाळलीच पाहिजे. तसेच गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारने दिलेला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्हा नियोजन समितीवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने ६ सदस्यांची नावे निश्चीत करुन त्यांना शासनाकडून मान्यता मिळवून घेतली. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. १४ पैकी ६ सदस्य राष्ट्रवादीचे झाल्याने विशेष निमंत्रित म्हणून भाजप आणि शिंदे गटाला आता फक्त प्रत्येकी ४ जागा मिळणार आहेत.तसेच अन्य ४ तज्ज्ञ सदस्यांच्या नियुक्तीवरही अजित पवार गट दावा करण्याची शक्यता आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव म्हणून जिल्हाधिकारी असतात. तर १४ विशेष निमंत्रित तर ४ तज्ज्ञ सदस्य या समितीवर असतात. १४ पैकी ६ जागा राष्ट्रवादीने घेतल्या आहेत. या नियुक्त्या पुढील आदेश होईपर्यंत आणि सदर नामनिर्देशन रद्द होईपर्यंत राहणार आहेत.…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात बेरोजगारी हा मोठा प्रश्न आहे. बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याला केंद्रातील मोदी सरकारची धोरणे कारणीभूत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे देशातील तरुणांना रोजगार मिळत नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी संसदेच्या सुरक्षेबाबत व्यक्त केली. या घटने मागे बेरोजगारी आणि महागाई हे प्रमुख कारण आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, संसदेच्या सुरक्षेबाबत गृहमंत्र्यांना सभागृहात वक्तव्य करायचे नाही. या विषयावर ते प्रसारमाध्यमांमध्ये वक्तव्ये करत आहेत, मात्र सभागृह सुरळीत चालावे यासाठी ते सभागृहात बोलत नाहीत, असा निशाणा त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर साधला. समाजवादी पक्षाचे प्रमुख…

Read More

जळगाव : प्रतिनिधी आमचे सर्वसाधारण मोलमजुरी करणारे कुटुंब असून, माझ्या मुलाला अभ्यासाची गोडी आहे. तो रेल्वे, पोलीस आदी सरकारी नोकरीच्या प्रयत्नात होता. कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याची त्याची इच्छा होती. तो देशासोबत कधीच गद्दारी करू शकत नाही. तो या प्रकरणात अडकला आहे. एखाद्या मुलीशी समाजमाध्यमात त्याने संवाद साधला असू शकतो. पण कधीही देशासोबत गद्दारी करू शकत नाही, असे मत पाचोरा येथील गौरव पाटील याचे वडील अर्जुन पाटील यांनी व्यक्त केले. पाकिस्तानी गुप्तहेराला प्रतिबंधित क्षेत्राची माहिती पुरविल्याच्या संशयातून महाराष्ट्र दहशतवादविरोधी विभागाच्या पथकाने ठाणे जिल्ह्यात गौरव पाटील अटक केली आहे. मुंबई येथील नौदलातील गोदीत प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून काम करताना पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील हस्तकांना…

Read More