नागपूर : वृत्तसंस्था विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आंदोलनाचा मुद्दा चांगलाच गाजतोय. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. तसेच, आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेण्याची घोषणाही केली. यावेळी शिंदे म्हणाले की, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी सरकारची भूमिक आहे. ज्या त्रुटी आहेत. त्या दूर करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवणारं आरक्षण देणार आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल एक महिन्यात येईल. त्यानंतर फेब्रुवारीत विशेष अधिवेशन बोलावून आम्ही आरक्षण देणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कुणबी लिहिले आणि प्रमाणपत्र दिले,…
Author: Kishor Koli
दुबई : वृत्तसंस्था आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेेनंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना वेध लागले आहेत ते आयपीएलच्या सतराव्या हंगामाचे. आयपीएल २०२४ साठी दुबईत मिनी ऑक्शन पार पडला.वेस्टइंडिजचा रॉवमेन पॉवेलवर ७.४० कोटींची बोली लागत या लिलावाला सुरुवात झाली. पॉवेलला राजस्थान रॉयलने आपल्या संघात घेतले तर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या ट्रेव्हिस हेडवर सनरायझर्स हैदराबादने ६.८० कोटी रुपयांची बोली लावली. हॅरी ब्रुकला ४ कोटी रुपयात दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात घेतले.एकीकडे चांगले खेळाडू आपल्या संघात घेण्यासाठी चढाओढ सुरु असतानाच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईचा संघ विकत घेतला आहे. शाहरुख,प्रितीनंतर आता अमिताभ बच्चन बॉलिवूड आणि क्रिकेटचे नाते तसे जुनेच आहे.आयपीएलच्या दहा फ्रँचाईजीमध्ये…
नवीदिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीची बैठक पार पडत आहे.या बैठकीला हजर राहण्यासाठी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे सोमवारी दिल्लीत दाखल झाले. आज मंगळवारी ( १९ डिसेंबर ) उद्धव ठाकरेंनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला लागावे,” असे रणशिंग उद्धव ठाकरेंनी फुकले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “ऑगस्टनंतर ‘इंडिया’ आघाडीची बैठक झाली नाही कारण, तीन-चार राज्यांतील निवडणुकांमध्ये कांँग्रेस आणि इंडिया आघाडीतील पक्ष सामील होते. त्यामुळे ऑगस्टनंतर ‘इंडिया’ आघाडीची बैठक होत आहे. पंंतप्रधानांसमोर चेहरा हा एक विषय आहेच इंडिया आघाडीत २७ घोडे, पण रथाला सारथी नाही. २०२४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर…
दुबई : वृत्तसंस्था आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बोली यावेळी २०२४ मध्ये लागल्याचे पाहायला मिळाले. कारण यापूर्वी इंग्लंडचा सॅम करन हा आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू होता. गेल्या आयपीएलच्या लिलावात पंजाब किंग्स या संघाने करनला १८.५० कोटी रुपये देत आपल्या संघात सहभागी केले होते. पण या आयपीएलमध्ये मात्र सर्वाधिक पैसे मोजले ते सनरायर्स हैदराबादच्या संघाने.हैदराबादच्या संघाने यावेळी तब्बल १० पट जास्त किंमत मोजली आणि मॅचविनर खेळाडूला आपल्या संघात स्थान दिले. ऑस्ट्रेलियाने यावर्षी वनडे वर्ल्ड कप जिंकला.यावेळी ऑस्ट्रेलियाच्या विजयात सर्वात मोलाचा वाटा उचलला होता तो कर्णधार पॅट कमिन्सने.त्यामुळे कमिन्सचे नाव जेव्हा लिलावात घेतले तेव्हा त्याच्यावर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी बोली लावायला…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभेतल्या सुरक्षेच्या प्रश्नावरुन खासदारांनी चर्चेची मागणी केली.त्यानंतर काल लोकसभा आणि राज्यसभेतल्या खासदारांचे निलंबन करण्यात आले. त्यापाठोपाठ आजही निलंबन करण्यात आलं आहे. आत्तापर्यंत संसदेतले १४१ खासदार निलंबित झाले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेही आहेत. सुप्रिया सुळे यांनी निलंबनानंतर ही अघोषित आणीबाणी आहे असे म्हणत पोस्ट लिहिली आहे. दुष्काळ आणि सरकारच्या धोरणांमुळे पिचलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, कांदा-कापूस-सोयाबीन-दूधाच्या दरांचा प्रश्न सरकारला विचारायचा नाही तर कुणाला विचारायचा? शेतकऱ्यांचे म्हणणे जर सरकारपर्यंत मांडायचेच नसेल, बेरोजगारांची घुसमट सरकारला ऐकायचीच नसेल, महिला-मध्यमवर्गीयांचे प्रश्न या सरकारला ऐकायचेच नसतील तर ते मांडायचेच नाहीत का ? आणि जर हे प्रश्न मांडले…
जळगाव : प्रतिनिधी मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्याचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे पण आताच्या या चोरांपुढे तो मांडला तर ते त्याचे खोबरे करतील त्यामुळे तो मांडणार नाही, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज (सोमवारी) जळगाव येथील सभेत केला . प्रकाश आंबेडकर यांची गाडगेबाबा चौकात जाहीर सभा झाली. ते म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या मागणीवर माझ्याकडे उपाय आहे पण आताच्या या चोरांपुढे तो मांडला तर ते त्याचे खोबरे करतील. त्यामुळे मी त्यांच्यापुढे हा उपाय मांडणार नाही. नवा सत्ताधारी येऊ द्या. त्यानंतर मी त्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता कसा हाताळायचा हे सांगेन. प्रकाश आंबेडकर यांनी…
जळगाव : प्रतिनिधी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी जळगावात विभागीय आयुक्त कार्यालय स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा केली.नंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनीही या कार्यालयाची मागणी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, अशी भूमिका घेतली. खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी जळगाव येथे विभागीय आयुक्त कार्यालय स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा28 जूनरोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. या घोषणेला 6 महिने उलटले. तरीही निर्णय होत नसल्याने संजय सावकारे यांनी विधीमंडळात या कार्यालयाची पुन्हा मागणी केली. उर्वरित महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगरला न्याय दिला जातो. मात्र खान्देशवर अन्याय होतो म्हणून खान्देशसाठी स्वतंत्र विभागीय आयुक्त कार्यालय…
अहमदनगर : वृत्तसंस्था अहमदनगर- कल्याण महामार्गावर डिंगोरे गावाजवळ तिहेरी अपघात झाला आहे. या अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आह. ओतूरवरुन कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पिकअप रिक्षा आणि ट्रकला धडक दिली. मृतांमध्ये पाच पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. भाजीपाला घेऊन ओतूरहून कल्याणकडे जाणारा पीकअप व्हॅन आणि कल्याणकडून ओतूरकडे येणारी प्रवासी रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. डिंगोरे- पिंपळगाव जोगा गावच्या सीमेवर नगर- कल्याण हायवे रोडजवळ असणाऱ्या पेट्रोलपंपासमोर ही घटना घडली आहे. रिक्षा ओतूरकडे जात असताना समोरुन येणाऱ्या पिकअपने रिक्षाला धडक मारली. या धडकेत रिक्षामधील…
नागपूर : वृत्तसंस्था अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्तावरून राजकारण तापले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथराव खडसे यांनी सलीम कुत्तावरून मंत्री गिरीश महाजन यांना लक्ष्य केले आहे. गिरीश महाजनांचे दाऊद इब्राहिमचे हस्तक सलीम कुत्ताबरोबर संबंध असल्याने एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी खडसेंनी केली. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खडसेंना प्रत्युत्तर देतांना माफी मागावी, अशी मागणी केली आहे. आ. खडसे काय म्हणाले? “१९९३ मध्ये बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोप दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नसमारंभात तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजनांसह राजकीय पक्षाचे आमदार, खासदार, नगरसेवक हजर होते तसेच गिरीश महाजनांचे दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ताबरोबर संबंध असल्याने एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी. सुधाकर बडगुजरांवर तातडीने…
मुंबई : प्रतिनिधी भारताचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर याचे वडिल रमेश तेंडुलकर यांचा आज वाढदिवस आहे. सचिन तेंडुलकरने सोमवारी त्याचे वडील रमेश यांच्या वाढदिवसानिमित्त एक दुर्मिळ फोटो शेअर केला आहे. या फोटोसह सचिनने भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सचिन तेंडुलकर त्याच्या वडिलांच्या खूप जवळ होता, जे कवी आणि कादंबरीकार होते. सचिन कायमच त्याच्या यशाचे श्रेय वडिलांना देत असे. सचिन तेंडुलकरने वाढदिवसाची ही पोस्ट शेअर करत लिहिले, “माझे वडील खूपच काळजी घेणारे होते, परंतु कधीही कठोर नव्हते. त्यांनी मला आयुष्यात जे करायचे आहे ते निवडू दिले आणि माझी स्वप्ने पूर्ण करण्याच्या प्रयत्नात मला पाठिंबा दिला. मला वाटते की, त्यांनी आपल्या…