नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. १३ डिसेंबर रोजी लोकसभेत दोन तरुणांनी घुसखोरी केली. त्यापाठोपाठ विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात निवेदन करण्याची मागणी लावून धरली.या खासदारांनी गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली दोन्ही सभागृहांमध्ये मिळून आत्तापर्यंत विरोधी पक्षांच्या १४३ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी दिल्लीत आज विरोधी पक्षांच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी शरद पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका मांडली. “हा सभागृहाचा अधिकार आहे” “लोकसभेत ज्या तरुणांनी घुसखोरी केली, ते कसे लोकसभेत आले? कुणाच्या पासवर आले? यावर सरकारकडून…
Author: Kishor Koli
नवी दिल्ली : वृत्तसंस्था क्रीडा पुरस्कारांसाठी नावे जाहीर करण्यात आली आहेत. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसह २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारतातील दोन युवा बॅडमिंटन स्टार्सची मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या वर्षीचा खेलरत्न पुरस्कार चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांना देण्यात येणार आहे. या दोघांनी जगभरात बॅडमिंटन दुहेरीत भारताचे नाव लौकिक मिळवले आहे. जानेवारीमध्ये सर्व खेळाडूंचा गौरव करण्यात येणार असून त्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यादरम्यान हे क्रीडा पुरस्कार दिले जातील. खेळाडूंचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार…
जळगाव : प्रतिनिधी अखिल भारतीय संघटनेच्या आवाहनानुसार पुकारलेल्या संपात महाराष्ट्र राज्य विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेने संपात सहभाग नोंदवला आहे. विविध प्रलंबित मागण्या मान्य कराव्या, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (दि.२०) दुपारी १२ वाजता आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटना जळगाव शाखेतर्फे विविध मागण्या करण्यात आल्या. यात नवीन श्रम संहिता रद्द करण्यात याव्यात, विक्री संवर्धन कर्मचारी कायदयाचे पुनर्जीवन करण्यात यावे, वैद्यकीय प्रतिनिधींच्या कामाचे स्वरूप निश्चित करण्यात यावे, औषध व औषध उपकरणांवरील जीएसटी रद्द करून त्यांच्या किमती कमी करण्यात यावा, वैद्यकीय प्रतिनिधींच्या सरकारी रुग्णालयात तसेच इतर प्रायव्हेट रुग्णालयातील प्रवेशासंबंधीतील निर्बंध हटविण्यात यावे, यासह इतर विविध मागण्यांचे निवेदन…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी लोकसभेत भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष यात सुधारणा करणारी तीन विधेयके सादर केली. हे तीनही विधेयक यापूर्वीही सादर करण्यात आले होते, मात्र खासदारांनी त्यात अनेक बदल सुचविल्यामुळे या कायद्यांना संशोधनासाठी संसदीय समितीकडे पाठविण्यात आले होते. आता पुन्हा एकदा लोकसभेत हे कायदे सादर करून त्यावर सभागृहाची मंजुरी घेण्यात आली आहे. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तीनही विधेयक मंजूर झाल्याचे जाहीर केले. ही तीन विधेयके ब्रिटिश काळातील अनुक्रमे भारतीय दंड संहिता (१८६०), फौजदारी प्रक्रिया संहिता (१८८२) व भारतीय पुरावा कायदा (१८७२) या कायद्यांची जागा घेणार आहेत. अमित…
नटसम्राट हे नाटक एकेकाळी रंगमंचावर खूप गाजले.त्यानंतर त्यावर आधारित मराठी चित्रपटही येऊन गेला.त्यामागे अनेक कारणं होती.या नाटकात काळानुरुप दत्ता भट,यशवंत दत्त, डॉ.श्रीराम लागू, चंद्रकांत गोखले यांनी अप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका वठवली होती तर मराठी चित्रपटात नाना पाटेकर यांनी ती भूमिका समर्थपणे निभावली. यातील संवादही गाजले होते.त्यात आप्पासाहेबांच्या तोंडी एक संवाद होता तो म्हणजे ‘कोणी घर देता का घर’ यासंवादाची आठवण सध्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्यानिमित्ताने केली जात आहे.आपल्या दौऱ्यात ते भाजपाचे संघटन मजबूतीवर भर देतील असे वाटत असतानाच त्यांनी विरोधकांवर टिकास्त्र सोडतांना,जिल्हानिहाय मंत्रीपदे वाटपाचा सपाटा लावल्याचे दिसत आहे.त्यामुळे ‘कोणी मंत्रीपद घेता का मंत्रीपद’ असे चित्र निर्माण झाले आहे.या…
दुबई : वृत्तसंस्था आयपीएल २०२४ च्या लिलावात प्रीती झिंटाचा संघ पंजाब किंग्जकडून एक चूक झाली.ज्या खेळाडूला संघात घ्यायचे नव्हते त्यांच्यावर संघआने बोली लावली. शशांक सिंग आयपीएल २०२४ मध्ये त्या संघाचा एक भाग असेल,ज्यांना त्याला लिलावात खरेदी करायचे नव्हते.वास्तविक, आयपीएलच्या पुढील मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबईत पार पडला. यादरम्यान पंजाब किंग्जने चुकून ३२ वर्षीय अष्टपैलू शशांक सिंगला खरेदी केले तर त्यांना १९ वर्षीय शशांक सिंगला खरेदी करायचे होते. दोघांचे नाव आणि मूळ किंमत (२० लाख) सारखीच असल्याने हा गोंधळ झाला. त्यावेळी पंजाब किंग्जच्या लिलावाच्या टेबलवर प्रीती झिंटा, नेस वाडिया, प्रशिक्षक संजय बांगर आणि ट्रेव्हर बेलिस उपस्थित होते. फ्रँचायझीला चूक…
पुणे : प्रतिनिधी अ.भा.त्रिपदी परिवाराच्या माध्यमातून केवळ आध्यात्मिक कार्यावर भर न देता त्यास विज्ञानाची जोड देऊन समाजात पर्यावरण जनजागृत्ती करण्यावरही भर दिला जात आहे.त्यादिशेने महाराष्ट्रासह गुजरात,कर्नाटक,मध्यप्रदेशातही प्रत्यक्ष उपक्रम राबविले जात असल्याचे प्रतिपादन प.पू.बाबा महाराज तराणेकर यांनी येथे केले. येथील लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.या सोहळ्यात,पूज्य नाना महाराज तराणेकर प्रणित अ.भा.त्रिपदी परिवार यांचे अर्ध्वयु तसेच दत्त संप्रदाय व त्रिपदी परिवाराचे वर्धिष्णू करण्याच अलौकिक कार्य यशस्वीरित्या केल्याबद्दल बाबा महाराज तराणेकर यांचा कै.लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट(पुणे)यांच्यावतीने विशेष सन्मानपत्र देऊन तसेच आचार्य पगडी देऊन विशेष गौरव करण्यात आला. पुण्याच्या वेद भुवनचे आचार्य मोरेश्वर शास्त्री घैसास यांच्याहस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.…
संभाजीनगर : वृत्तसंस्था बहिणीला भेटायला आलेल्या २४ वर्षीय नराधमाने बहिणीच्या घरासमोर राहणाऱ्या एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दारूच्या नशेत घरात घुसून त्या महिलेवर नराधमाने बलात्कार करून तिचा साडीने खून केल्याची खळबळजनक घटना वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे मंगळवारी उघडकीस आली. दरम्यान, या प्रकरणी तात्काळ पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुलाब आबा बेलदार (वय २४, रा. भोजे चिंचपुरे ता. पाचोरा जि.जळगाव) असे नराधमाचे नाव आहे.दरम्यान, या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मूळचा पाचोरा येथील रहिवासी असलेला गुलाब हा त्याची बहीण लोणी खुर्द येथे राहते. या बहिणीला भेटण्यासाठी तो तिथे आला होता. बहिणीच्या घरासमोर राहणाऱ्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा आणि राज्यसभेतून विरोधी पक्षातील १४१ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे उपसभापती जगदीप धनकड यांची नक्कल करून निषेध आंदोलन केले होते. ही नक्कल करत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी हे आपल्या मोबाइलवर चित्रीकरण करताना दिसले. या घटनेचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एक्स या सोशल मीडिया साईटवर पोस्ट टाकून विरोधकांच्या कृतीचा निषेध व्यक्त केला. तसेच राज्यसभेचे नियमित कामकाज सुरू झाल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सर्व सत्ताधारी खासदार उभे…
जळगाव : प्रतिनिधी आजारपण आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्याने जळगाव तालुक्यातील धानवड येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे पाच वाजता उघडकीस आली आहे. शिवाजी चिंधा पाटील (५५, रा. धानवड ता.जि. जळगाव) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आजाराला कंटाळलो डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील धानवड येथे शिवाजी चिंधा पाटील आपले पत्नी, दोन मुलं आणि नातवंडे यांच्यासह वास्तव्याला आहेत. मंगळवारी पहाटे ५ वाजता त्यांनी राहत्या घराच्या मागच्या खोलीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहलेले सुसाईड नोट आढळून आली आहे. चिठ्ठीत आजाराला आणि कर्जाला…