मुंबई : प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी मृत्यूच्या बातमीने चर्चेत आलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला राज्य सरकार आणखी एक दणका देणार आहे. रत्नागिरीतील मुंबके येथील दाऊदच्या मालकीची जमीन आहे. त्याच्या या जमिनीचा पुढील महिन्यात ५ जानेवारी २०२४ रोजी लिलाव करण्यात येणार आहे. भारतातून फरार असलेला आणि १९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम कासकर हा मूळचा कोकणातील आहे. रत्नागिरीतील मुंबके हे दाऊदचे मूळ गाव आहे. दाऊदने तस्करी, खंडणी आणि इतर बेकायदेशीरमार्गाने अमाप संपत्ती जमवली. त्यातून त्याने काही मुंबईसह विविध ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्या होत्या. आता दाऊदच्या याच मालकीच्या जागांचा लिलाव करण्यात येणार आहे. रत्नागिरीतील मुंबके येथील डॉन दाऊद इब्राहिम याच्या…
Author: Kishor Koli
मुंबई : प्रतिनिधी ज्येष्ठ दिग्दर्शक प्रशांत नील यांचा या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ‘सालार पार्ट १ : सीझफायर’ सतत चर्चेत आहे. आज म्हणजेच २२ डिसेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून त्यांच्या आवडत्या अभिनेता प्रभासबद्दल चाहत्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा आहे. शाहरुख खानचा ‘डंकी’ काल म्हणजेच २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर ३० कोटींची कमाई केली. ‘सालार’ आता एका दिवसानंतर प्रदर्शित झाला आहे.ॲडव्हान्स बुकिंगमध्येही त्याने ‘डंकी ‘ला मागे टाकले होते आणि पहिल्या दिवसाच्या कलेक्शनमध्येही ‘डंकी’ला मागे टाकण्याच्या मार्गावर आहे. पृथ्वीराज सुकुमारन आणि श्रुती हासन यांच्यासोबतचा प्रभासचा ‘सालार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी…
पर्ल : वृत्तसंस्था भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेत साई सुदर्शन, रिंकू सिंग आणि रजत पाटीदार या ३ खेळाडूंनी पदार्पण केले. यापैकी साई सुदर्शनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सर्वांनाच प्रभावित केले. पहिल्या दोन सामन्यांमध्ये डावखुऱ्या फलंदाजाने अर्धशतके झळकावून लोकांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर तिसऱ्या सामन्यात बॅटने तो विशेष काही करू शकला नाही, पण मैदानात अप्रतिम झेल घेऊन सर्वांनाच चकित केले. डायव्हिंग करताना त्याने अतिशय अप्रतिम झेल घेतला. साई सुदर्शनला त्याच्या या शानदार झेलसाठी ‘इम्पॅक्ट फील्डर ऑफ द सिरीज’ म्हणून निवडण्यात आले. एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अजय रात्रा यांनी बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले की,…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था संसदेचे हिवाळी अधिवेशन संपले तरी खासदारांच्या निलंबनावरून जोरदार घमासान चालू आहे. विरोधी पक्ष केंद्र सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. इंडिया आघाडीतले पक्ष राजधानी दिल्लीसह देशभरात ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीदेखील केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी म्हणाले, आपल्या देशात आता बोलण्याचे स्वातंत्र्य राहिले नाही. देशभरात प्रचंड बेरोजगारी आहे.हे बेरोजगार तरुण सरकारविरोधात आक्रमक होऊ लागले आहेत. संसदेची सुरक्षा भेदून दोन तरुणांनी लोकसभेत घुसून केलेल्या राड्याचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला. संसदेतल्या घुसखोरी प्रकरणावरून सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले, संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा तर आहेच, परंतु त्या तरुणांनी हे…
जालना : वृत्तसंस्था सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीमध्ये गुरूवारी दाखल झाले होते. बराच वेळ चालेल्या चर्चेतून कोणताही मार्ग निघाला नाही. त्यामुळे सरकार अन् मनोज जरांगेंमधील बैठक निष्फळ ठरली आहे. नोंदी असलेल्या सबंधीत नातेवाईकांना आणि सर्व रक्तातील सगेसोयरे यांना हे प्रमाणपत्र मिळावे,. रक्ताचे सगेसोयरे हा शब्द आपण गृहीत धरला होता. आमच्या मामाला किंवा मावशी यांना देखील प्रमाणपत्र मिळावे, या मागणीवर जरांगे ठाम आहेत. मात्र, असे करता येणार नाही आणि तसा निर्णय देखील घेता येणार नसल्याचे गिरीश महाजन म्हणाले आहे. त्यामुळे आजची बैठक निष्फळ ठरली आहे. दरम्यान यावेळी बोलतांना गरीश महाजन म्हणाले की, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला…
ठाणे : वृत्तसंस्था देशात आणि राज्यात सध्या ‘जेएन-वन’ हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी आरोग्य यंत्रणेसह जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस्ची यंत्रणा सज्ज ठेवावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली. त्यामध्ये आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था श्रीराम जन्मभुमी अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामाचे भव्य-दिव्य मंदिर साकार झाले आहे. येत्या २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन होईल. प्रभू श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्यने रामभक्त अयोध्येत येणार आहेत. या लाखो पाहुण्यांच्या स्वागतासाटी अयोध्या तयार आहे. पण, सध्या अयोध्येतील हॉटेल्सचे दर गगनाला भिडले आहेत. प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी हॉटेल्सचे दर ७०,००० रुपयांवर गेले आहेत. २२ जानेवारी २०२४ रोजी देशभरातून सुमारे ४ ते ५ लाख भाविक अयोध्येला पोहोचण्याचा अंदाज आहे. हा आकडा आणखी जास्त असू शकतो. या कार्यक्रमासाठी अयोध्येतील बहुतांश हॉटेल्स आधीच फुल्ल झाली आहेत. ज्या हॉटेलमध्ये या तारखांना खोल्या उपलब्ध आहेत, त्याचे भाडे…
जामनेर : प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील नेरी दीगर येथे तहसीलदार आणि त्यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात पत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवलेला एक लाख साठ हजार रुपयांचा ११८ गोण्या रेशनचा तांदूळ जप्त करण्यात आला. काळ्या बाजारात विक्रीसाठी हा तांदुळ जाणार होता. या प्रकरणी पुरवठा निरीक्षकांनी दिलेल्या तक्रारीवरून जामनेर पोलिसांत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांदळासह वाहन (बोलोरो पिकअप) जप्त करण्यात आले आहे. जामनेर तालुक्यातील तहसीलदार नानासाहेब आगळे यांना (दि. २०) गुप्त माहिती मिळाली की, रेशन दुकानाचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जात आहे. त्यांनी तलाठी नितीन मनोरे, अजय गवते, चेतन ताथे, अभिलाष ठाकरे, प्रमोद इंगळे, राजेश देवले, गोदाम व्यवस्थापक अशोक सोनवणे यांना तात्काळ…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभेचे कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी सभागृहात घुसून राडा केल्याच्या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने संसद भवन परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्योरिटी फोर्सकडे (सीआयएएसएफ) सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. सीआयएसएफ हे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे, जे देशातील वेगवेगळ्या सरकारी संस्था, मंत्रालयांच्या इमारती, अणूऊर्जा प्रकल्प, अंतराळ संस्थेची ठिकाणं आणि विमानतळांना संरक्षण देतं. दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने सीआयएसएफला संसद भवन संकुलाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता सीआयएसएफ आणि अग्निशमन दल मिळून संसद परिसरात अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यासाठी एक आराखडा तयार करतील. संसदेची सुरक्षा व्यवस्था पाहणाऱ्या सुरक्षा पथकासह सीआयएसएफ संसद भवन परिसराचं…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने कर्णधारपदावरून काढले. त्यानंतर मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी याप्रकरणी मौन सोडले आहे. आकाश यांनी एका वाक्यात याबाबत सर्व काही स्पष्ट सांगितले आहे. रोहितने मुंबई इंडियन्सला आयपीएलमधील सर्वाधिक जेतेपदं जिंकवून दिली पण मुंबई इंडियन्सने फक्त एक पत्रक काढले आणि रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढले. हार्दिक पंड्या हा आमचा पुढच्या वर्षासाठी कर्णधार असेल, असे मुंबई इंडियन्सने स्पष्ट केले. रोहितला कर्णधारपदावरून काढल्यावर मुंबई इंडियन्सला चाहत्यांचा रोष स्विकारावा लागला. बऱ्याच चाहत्यांनी मुंबई इंडियन्सची साथ सोडून दिल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले पण रोहितला कर्णधारपदावरून काढल्यानंतर मात्र मुंबई इंडियन्सकडून कोणतीही प्रतिक्रीया आली नव्हती पण या प्रकरणावर आता मुंबई…