Author: Kishor Koli

जळगाव : प्रतिनिधी घाटकोपर जॉली जिमखान्याच्या वतीने १३ ते १५ जानेवारी २०२४ दरम्यान घाटकोपर जॉली जिमखाना, फातिमा हायस्कूल समोर, विद्याविहार (पश्चिम), येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांसाठी होणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांना आयोजकांच्या वतीने तब्बल १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके व चषक देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtra carromassociation. com या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनकडे जिल्हा कॅरम असोसिएशनने नावे देण्याची अंतिम मुदत २८ डिसेंबर २०२३ असून यापूर्वी खेळाडूंनी आपल्या क्लबमार्फत महाराष्ट्र कॅरम…

Read More

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. सत्ताधीश कुणीही असो पण आजमितीला किंचितही विरोधी आवाज सत्ताधाऱ्यांना सहन होत नाही, असे मनसेने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधताना म्हटले आहे. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना देशभर अभिवादन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व अन्य सर्वच प्रमुख नेत्यांनी वाजपेयींना दिल्लीतील सदैव अटल समाधीस्थळी जावून पुष्पांजली वाहिली. मनसेने एका ट्विटद्वारे वाजपेयींना आदरांजली वाहिली. तसेच त्यांचा एक व्हिडिओ शेअर करत विद्यमान नरेंद्र मोदी सरकारवरही निशाणा साधला. या व्हिडिओत वाजपेयी सत्तेचा मोह…

Read More

पुणे : प्रतिनिधी मागील दोन-तीन वर्षांपूर्वी राजीनामा देतो म्हणून सांगत होते मात्र निवडणूक जवळ आली की पदयात्रा सुचतेय, अशा निशाणा साधताना आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार अमोल कोल्हेंविरोधात प्रबळ उमेदवार देऊन कोल्हेंचा पराभव करणारच, असा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवला.निवडणूक जवळ आली की कुणाला संघर्षयात्रा तर कुणाला पदयात्रा सुचतेय. लोकशाहीत प्रत्येकाला अशा यात्रा काढण्याचा अधिकार आहे पण ५ वर्षे मतदारसंघात लक्ष द्यायचं होतं, अशा शब्दात अजित पवार यांनी कोल्हेंवर टीका केली. अजित पवार यांच्या याच टीकेला आणि पराभूत करण्याच्या चॅलेंजला खासदार कोल्हे यांनीही उत्तर देत ‘है तय्यार हम’ म्हणत शड्डू ठोकला. “दादा हे खूप मोठे नेते आहेत. त्यांच्या आव्हानाला…

Read More

मुंबई : प्रतिनिधी इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या लिलावाआधी मुंबई इंडियन्सने त्यांचा माजी खेळाडू हार्दिक पंड्याला संघात घेतले. त्यासाठी गुजरात टायटन्ससोबत ट्रेड करण्यात आला. या निर्णर्याने अनेकांना धक्का बसला.पाचवेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला २०२२ मध्ये विजेतेपद मिळवून देणाऱ्या हार्दिकसाठी १५ कोटी रुपये मोजले.याशिवाय मुंबईने अतिरिक्त ट्रान्सफर फीज भरली. त्याची माहिती केवळ आयपीएलच्या गव्हर्निंग समितीला आहे मात्र आता या रकमेचा उलगडा झाला आहे. मुंबई इंडियन्सने पंड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड केले. तेव्हा हार्दिकला मिळणारे १५ कोटी रुपये मुंबईच्या पर्समधून वजा झाले. इतकीच रक्कम गुजरातच्या पर्समध्ये जमा झाली. पण पंड्याच्या पगारापेक्षा अधिक रक्कम गुजरात टायटन्सला ट्रान्सफर फीज म्हणून मिळाली. मुंबईने तब्बल…

Read More

मुंबई : प्रतिनिधी एलियन्सबद्दल दररोज नवनवीन दावे समोर येत असतात. असे म्हटले जाते की, एलियन्स हे यूएफोने वारंवार पृथ्वीवर येत असतात. ब्रिटनमध्ये अडीच वर्षांत सुमारे १००० यूएफओ दिसले आहेत, असा दावा करण्यात आला आहे. या दाव्यापूर्वी, एका तज्ज्ञाने सांगितले होते की, एलियन्सचा शोध लागू नये म्हणून ते आपल्या सूर्यमालेच्या अगदी बाहेर गडद अंधाऱ्या ठिकाणी लपलेले असू शकतात पण,आता नासाच्या एका माजी संशोधकाने अनोखा दावा केला आहे. यूएफओचे पायलट हे महासागराखाली असू शकतात असा दावा त्यांनी केला आहे. २००१ ते २००५ या कालावधीत नासाच्या एम्स रिसर्च सेंटरमध्ये काम केलेले केविन नूथ यांच्या मते, अशी कारणे आहेत ज्यावरुन असे दिसून येते की,…

Read More

मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत नाचताना शिवसेना उबाठा गटाचे नशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा चांगलाच गाजला होता. याप्रकरणी आता पोलिसांकडून खोलात जाऊन चौकशी देखील सुरु आहे मात्र आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नवा फोटो समोर आणून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. सुधाकर बडगुजर ज्या पार्टीमध्ये नाचत होते ती भाजपच्या पदाधिकाऱ्याने आयोजित केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.या पार्टीत भाजपच्या माथाडी कामगार संघटनेचा शहराध्यक्ष व्यंकटेश मोरे याचाही समावेश…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी युनिट २८६ मिडीयम रेजिमेंट तोफखाना कारगिल येथे कार्यरत असलेले जळगाव जिल्ह्यातील तळई(एरंडोल) येथील हवालदार नितीन तुळशीराम पाटील शहीद झाले आहेत. त्यांच्यावर तळई येथे शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.शहिद पित्याच्या पार्थिवाला मुखाअग्नी त्यांच्या दोन्ही मुली समृद्धी व काव्या पाटील यांनी दिला. शहीद जवानाला गावातील तरुणांनी पाचशे मीटर लांबीचा तिरंगा हातात धरून संपूर्ण गावातून अंत्यसंस्काराच्या ठिकाणापर्यंत तिरंगा रॅली काढण्यात आली. संपूर्ण गाव ”वीर जवान अमर रहे”, अशा घोषणांनी दुमदुमले होते. यावेळी संपूर्ण गावात महिलांनी आपल्या घरासमोर रांगोळ्या काढल्या. शासकीय मानवंदना देण्यात येऊन जवानाला अखेरचा निरोप देण्यात आला. अंत्यविधीसाठी युनिट २८६ मिडीयम रेजिमेंट कारगिल गनर्ससोबत नायब सुभेदार मुलानी…

Read More

संभाजीनगर : वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी बारटी, सारथी आणि महाज्योती या फेलोशिपसाठी राज्य सरकारतर्फे परीक्षा घेण्यात आल्या आहेत. राज्यभरात ही परीक्षा झाली आहे मात्र या परीक्षेत एक वेगळाच गोंंधळ पुढे आला.२०२३ चा हा पेपर २०१९ च्या सेट पेपरप्रमाणे असल्याचा धक्कादायक दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. म्हणजे २०१९ साली जी प्रश्नपत्रिका देण्यात आली तीच पुन्हा विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रश्नपत्रिकेत अगदी प्रश्नांचा क्रम सुद्धा तोच होता.२०१९ मध्ये सेटसाठी जी परीक्षा घेण्यात आली होती तोच पेपर २०२३ च्या या फेलोशिपच्या परीक्षेसाठी वापरण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सगळ्या प्रकारावर आता विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. अशातच ज्या विद्यार्थ्यांनी…

Read More

मुंबई : प्रतिनिधी भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचा आयपीएल २०२४ च्या मिनी लिलावापूर्वी गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्स संघात ट्रेड होऊन पुन्हा दाखल झाला. हार्दिकचे आगमन होताच मुंबईने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून पांड्याला संघाचा नवा कर्णधार बनवले मात्र, सध्या हार्दिकच्या फिटनेसबाबत अनेक बातम्या येत आहेत. हार्दिक पांड्याला वर्ल्ड कप २०२३ मध्ये दुखापत झाली होती, ज्यातून तो अद्याप बरा होऊ शकलेला नाही. आता काही रिपोर्ट्च्या मते, हार्दिक कदाचित आयपीएल २०२४ पर्यंत तंदुरुस्त नसेल आणि संपूर्ण हंगाम खेळू शकणार नाही. काही रिपोर्ट्सच्या मते, पांड्या पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि आगामी अफगाणिस्तान टी-२० मालिका तसेच आयपीएल २०२४ चा भाग असणार आहे मात्र,…

Read More

मुंबई : प्रतिनिधी भारतीय महिला क्रिकेट संघाने मुंबईत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला.या विजयासह टीम इंडियाने इतिहास रचला आहे. भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियावरील हा पहिला कसोटी विजय आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २१९ धावा आणि दुसऱ्या डावात २६१ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात ४०६ धावा आणि दुसऱ्या डावात २ गडी गमावून लक्ष्य गाठले. स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, रेणुका सिंग आणि स्नेह राणा यांनी भारतासाठी चमकदार कामगिरी केली. या अटीतटीच्या कसोटीत भारतीय संघाचा दबदबा कायमच राहिला. पहिल्या डावात २१९ धावा करून ऑस्ट्रेलियन संघ गडगडला. यादरम्यान ताहिल मेग्रॅथने अर्धशतक झळकावले. तिने ५६ चेंडूंचा सामना करत ५० धावा…

Read More