मुंबई : प्रतिनिधी तरुण वयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही काळापासून समोर येत आहेत. हे अत्यंत भीषण आहे, लहान वयात हृदयविकाराचा धक्का येणं ही एक चिंतेची बाब झाली आहे. असंच काहीसं नाताळच्या सकाळी ३२ वर्षीय जेना गुडसोबत घडले. रात्री ३ वाजता जेनाचा नवरा रस याला अचानक जाग आली, तेव्हा त्याने पाहिले की शेजारी असलेली जेना श्वास घेत नाहीये. आपल्या तीन आठवड्यांच्या बाळाच्या शेजारी पत्नीला मृतावस्थेत पाहून त्यांना धक्काच बसला. रस यांनी तात्काळ पत्नीला सीपीआर देण्यास सुरुवात केली तसेच लाऊडस्पीकरवर ९९९ वर कॉल केला. कॉल केल्याच्या काही मिनिटांतच सहा पॅरामेडिक्सची टीम तीन रुग्णवाहिकांमध्ये त्यांच्या घरी आली. जेना अजूनही…
Author: Kishor Koli
लखनऊ : वृत्तसंस्था इस्रायल आणि हमास यांच्यात ७ ऑक्टोबर पासून संघर्ष सुरू झाल्यानंतर इस्रायलमधील बांधकाम क्षेत्र ठप्प झाले. युद्धामुळे इस्रायलने पॅलेस्टिनी कामगारांना देशाच्या बाहेर जाण्याचे आवाहन केले.त्यामुळे वेस्ट बँकमधील हजारो कामगार आपल्या देशात परतले. यानंतर भारतातून कामगार आणण्याचे प्रयत्न केले जात होते. आता उत्तर प्रदेश सरकारने ही संधी साधून राज्यातील बांधकाम मजूरांना इस्रायलमध्ये पाठविण्याची तयारी दर्शविली आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशने इस्रायलची मजूरांची मागणी पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. इस्रायलमध्ये बांधकाम मजूरांना महिन्याला सव्वा लाख रुपये वेतन मिळेल, असे सांगितले जात आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या कामगार विभागाने यासंबंधी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार, “बांधकाम…
सेंच्युरियन : वृत्तसंस्था भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात पराभवासह भारताला पहिला धक्का बसला आणि त्यानंतर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरला आहे, हा भारतासाठी सर्वात मोठा धक्का होता, पण आता भारतासमोर आता अजून एक अडचण आली आहे. आयसीसीने भारताचे २ महत्त्वाचे गुण कमी केले आहेत. भारत आता पाचव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.याशिवाय आयसीसीने सर्व भारतीय खेळाडूंना १० टक्के दंडही ठोठावला आहे. यामुळे भारताचे मोठे नुकसान झाले आहे. सेंच्युरियन कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीने संघाला दंड ठोठावला आहे. आयसीसीने सर्व खेळाडूंना मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावला आणि दोन महत्त्वाचे…
सेंच्युरियन : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून, ते सध्या सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळत आहेत. या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारतीय संघाची टॉप ऑर्डर पूर्णपणे फ्लॉप झाली. मात्र,त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने जबाबदारी स्वीकारली आणि दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची शाळा घेतली. राहुलने भयानक झालेल्या खेळपट्टीवर जिथे प्रचंड बाउन्स आणि स्विंग होत असताना शतक झळकावले. राहुलने अवघड विकेटवर शतक झळकावून इतिहास रचला. त्याने १३७ चेंडूत १४ चौकार आणि ४ गगनचुंबी षटकारांसह १०१ धावा केल्या. या शानदार कामगिरीच्या जोरावर राहुलने कसोटी संघातील आपले स्थान पक्के केले आहे. राहुलच्या या शतकामुळे या टीम इंडियाच्या ३ खेळाडूंची…
नागपूर : वृत्तसंस्था एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तोवर महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाणार नाही.आमचा पक्ष आहे, पक्षाचं भलं कुठे होतंय, त्यानुसार विचार केला जाईल, असा सूचक इशारा बच्चू कडू यांनी दिला. यावर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बच्चू कडू यांच्यासाठी विचार करू, असे म्हणत असतानाच महायुती सरकारवर टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर हे प्रकरण आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्व्ेोकर यांच्याकडे सुनावणीसाठी गेले आहे.१६ आमदार अपात्रप्रकरणी राहुल नार्वेकर १० जानेवारी रोजी अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे. यावरून विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. १० जानेवारीच्या सुनावणीत १६ आमदार अपात्रच होतील, असा दावा विरोधकांनी केला असून…
वरणगाव : प्रतिनिधी वरणगाव पाणी पुरवठा योजनेत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर प्रकार आता उघडकीस येत आहेत. मोजमाप पुस्तिका ( एमबी) आधी ७५ लाखांची नोंद केली, त्यात खाडाखोड करुन नंतर ४० लाखांची नोंद केली. या पुस्तिकेत फेरबदल करण्याचा अधिकारी नसतांना पदाचा गैरवापर करुन ‘एसी’ नावाच्या ठेकेदाराची मोजमाप पुस्तिका असतांना ४० लाखांचा धनादेश वरणगाव नगरपालिकेने ‘अरिहंत’ला काम न करता दिला आहे. या गैरप्रकाराला जीवन प्राधिकरणाचे निकम व वरणगाव नगरपालिकेचे शेख हे जबाबदार असून मोठा आर्थिक घोळ समोर आला आहे. बोगस बॅक गॅरंटी नंतर मोजमाप पुस्तिकेचा देखील घोळ पुढे आला आहे. त्यानंतरही कुठलीच कारवाई न करता जीवन प्राधिकरण व वरणगाव नगरपरिषद शासनाचे…
जळगाव : प्रतिनिधी आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर केळीचं उत्पादन घेतलं जातं. परदेशातही मोठ्या प्रमाणात केळीची निर्यात केली जाते. त्यात जळगाव जिल्ह्याचा फार मोठा वाटा आहे. अशातच केंद्र सरकारने आता फक्त केळी विकून ८ हजार ३०० कोटी रुपये कमावण्याची योजना आखली आहे. यासाठी उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाने एक यशस्वी पायलट प्रोजेक्टही पूर्ण केला आहे. याचा सर्वाधिक फायदा केळी बागायतदारांना होणार आहे. सागरी मार्गाने इतर देशांमध्ये केळीची निर्यात करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. येत्या ५ वर्षात भारत केळी निर्यातीत प्रचंड वाढ करणार आहे. पुढील ५ वर्षांत देशातून केळीची निर्यात १ अब्ज डॉलर्स (सुमारे ८३०० कोटी रुपये) पर्यंत वाढवण्याची योजना आखली आहे. अलीकडेच…
हैदराबाद : वृत्तसंस्था आयपीएल स्पर्धेेसाठीचा लिलाव काही दिवसांपूर्वी दुबईत आयोजित करण्यात आला होता. या लिलावात मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीच्या जोडगोळीने विक्रमी कमाई केली. या दोघांसह अनेक खेळाडूंसाठी कोटीच्या कोटी उड्डाणं बोली लावण्यात आली. लिलावानंतर प्रत्येक संघाचे चित्र स्पष्ट झाले आणि असंख्य गमतीजमती समोर आल्या आहेत. लिलावानंतर मात्र सनरायझर्सने कर्णधाराची स्थिती केविलवाणी केली आहे. लिलावात सनरायझर्स संघव्यवस्थापनाने तब्बल २० कोटी ५० लाख रुपये खर्चून ऑस्ट्रेलियाचा वर्ल्डकपविजेता कर्णधार पॅट कमिन्सला ताफ्यात दाखल करुन घेतले. कमिन्सच्या नेतृत्वातच ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, ॲशेस, वनडे वर्ल्डकप जिंकला आहे. कर्णधार म्हणून त्याने प्रत्येक फॉरमॅटमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे. गोलंदाज म्हणूनही त्याने…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बहुप्रतिक्षित असलेल्या अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण आता जवळ आले आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी उदघाटनासाठी येत आहेत. नव्या संसद भवनाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच केल्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून टीका झाली होती. आता राम मंदिराचे उदघाटन करण्यावरून भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी टीका केली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुब्रमण्यम स्वामी हे गेल्या काही काळापासून भाजपावर आणि विशेषतः पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांवर सातत्याने टीका करताना दिसतात. नोटबंदीपासून ते कोरोना काळात घेतलेल्या काही निर्णयांवर त्यांनी टीका केलेली आहे. आता राम मंदिराच्या उदघाटनावरून केलेल्या टीकेमुळे ते चर्चेत आहेत.…
बॉलिवूड अभिनेता अरबाज खान नुकताच विवाहबद्ध झाला.मुंबईत कुटुंबियांच्या उपस्थितीत अरबाज आणि शूरा खान यांचा निकाह पार पडला. खरं तर दोन- तीन दिवसांपासून अरबाज आणि शूरा यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाली होती. आता दोघांचा निकाह देखील पार पडला. अरबाज आणि शूरा यांच्या निकाहचे फोटो, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण सगळ्यांना पडलेला एकच प्रश्न म्हणजे ही शूरा आहे तरी कोण? खरं तर फिल्म इंडस्ट्रीत मेकअप आर्टिस्ट असलेल्या शूराबद्दल फार काही माहिती उपलब्ध नाहीये. तिचे फोटोही फार समोर आले नाहीयेत. वय किती? ५६ वर्षीय अरबाज दुसऱ्यांदा लग्न करतोय म्हटल्यावर त्याच्या होणाऱ्या पत्नी चर्चा नसती झाली तरच नवल. शूरा खानच्या आणि…