पुणे : प्रतिनिधी शहरातील शेतकरी आक्रोश मोर्चात बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यापासून पायी मोर्चा काढण्यात आला होता. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे शेतकऱ्यांप्रती संवेदनशील होते, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग शेतकऱ्यांप्रती संवेदनशील होते आणि काही शेतकऱ्यांच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर ते महाराष्ट्रातील अमरावतीला गेले होते मात्र आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांची कोणालाच पर्वा नाही असे शरद पवार…
Author: Kishor Koli
सेंच्युरियन : वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेत भारताला ३ जानेवारीपासून दुसरा कसोटी सामना खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी नेटमध्ये सराव करताना भारताचा अष्टपैलून खेळाडू शार्दुल ठाकूरच्या खांद्याला जबर दुखापत झाल्याची बातमी समोर आली होती, त्यामुळे तो दुसऱ्या कसोटीत खेळेल की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता शार्दुलच्या या दुखापतीबाबत मोठी अपडेट मिळाली आहे. अष्टपैलू शार्दुल ठाकूर आता दुसऱ्या कसोटीपूर्वी वैकल्पिक प्रशिक्षण सत्रादरम्यान खांद्याला दुखापत झाल्यानंतर चांगल्या स्थितीत असल्याचे सांगितले जाते. सेंच्युरियन येथे शनिवारी शार्दुलच्या डाव्या खांद्याला दुखापत झाल्याची घटना घडली, एका सपोर्ट स्टाफच्या सदस्याच्या थ्रोडाऊनचा सामना करताना त्याला दुखापत झाली. चेंडू लागल्यानंतरही ठाकूरने फलंदाजी सुरूच ठेवली. भारतीय संघाच्या मेडिकल स्टाफने त्याच्यावर कोणतेही…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आम्ही लोकसभेच्या २३ जागा लढवणार असे विधान केले. तसेच आम्ही दिल्लीतील काँग्रेस नेत्यांसोबत जागावाटपावर चर्चा करू. त्यात राज्यातील नेते नसतील असे म्हटले होते. मात्र, त्यावर काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतला. आता नवी दिल्लीतल्या बैठकीत जागावाटपाबाबत काँग्रेसचा राज्याचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हा फाम्युला ठाकरे – पवार गटाला मान्य होईल का, वेगळा भाग आहे. दरम्यान, मातोश्रीवर पवार – ठाकरे यांच्यात बैठक झाल्याची माहिती आहे. शरद पवार गटाकडून ८ते१० जागा लढण्याची तयारी आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर…
मुंबई : प्रतिनिधी राम मंदीरासाठी आम्ही आमचे योगदान दिले होते. त्यामुळे मी मुख्यमंत्री झाल्यानंतरही मंदीरात जाऊन आलो आहे. अयोध्येत मी कधीही जाईल. कधीही दर्शन घेईन. याचे राजकारण होऊ नये, असे ठाकरे म्हणाले. बाबरी मशीद पडली तेव्हा भाजपचेच नेते होते, शिवसेनेचे कोणी नव्हते असे विधान फडणवीसांनी केले होते. यावरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केले. तेच (फडणवीस) चढले असतील आणि त्यांच्या वजनाने मशीद पडली असेल तर माहिती नाही, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली. बाबरी पडल्यानंतर सीबीआयचे स्पेशल कोर्ट झाले. आरोपी म्हणून नावे प्रसिद्ध झाली त्यात स्थानिक शिवसैनिक, अनेक खासदार आणि १०९ पदाधिकारी आहेत. मी स्वत: ३ वेळा सीबीआय कोर्टासमोर जाऊन आलोय. जे…
सातारा : वृत्तसंस्था देशभरात सध्या अयोध्येत होत असलेल्या प्रभू श्रीरामाच्या भव्यदिव्य मंदिराची चर्चा सुरु आहे. अशातच साताऱ्यातही एका गावात गावकऱ्यांनी एकत्र येत एका रात्रीत मंदिर बांधले आहे. या मंदिराची आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरु झाली आहे. सातारा तालुक्यात नागठाणे ग्रामस्थांनी एकत्र येऊन अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. साताऱ्याच्या नागठाणे जवळच्या चाहूर परिसरात असणारे रवळेश्वराचे मंदिर एका रात्रीत बांधून ग्रामस्थांनी हा अनोखा संकल्प पूर्ण केला आहे. नागठाणे गावापासून काही अंतरावरच झाडाझुडपात शंभू महादेवाचा अवतार असणाऱ्या रवळेश्वराची उघड्यावर असणारी मूर्ती गेल्या अनेक वर्षापासून पाहायला मिळत आहे. गावातील अनेक ग्रामस्थ या देवाच्या दर्शनासाठी आवर्जून येत असत. याविषयी ग्रामस्थांनी एकत्र येऊन या मूर्तीसाठी…
संभाजीनगर : वृत्तसंस्था जालना-मुंबई हाय स्पीड ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ उद्घाटन सोहळा वादाचा ठरला आहे. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन येथे एमआयएम आणि भाजपाचे कार्यकर्ते समोरा-समोर आलेले पाहायला मिळाले. खासदार इम्तियाज जलील यांचे संभाजीनगर स्टेशनमध्ये आगमन झाल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी-मोदी’ अशी घोषणाबाजी केली तर, पोलिसांनी एमआयएमच्या कार्यकर्त्यांना रेल्वे स्टेशन बाहेर काढले. जालना-मुंबई ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून तिचे उद्घाटन पार पडत असतांना उद् घाटन पत्रिकेत नाव नसल्यामुळे नाराजी नाट्य समोर आले आहे.इम्तियाज जलील यांनी आमंत्रण न मिळाल्याने आणि पत्रिकेत नाव नसल्याने भाजपावर टीका केली. त्यातच छत्रपती संभाजीनगर येथे ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे आगमन…
जळगाव : प्रतिनिधी विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्री आणि धोकेदायक व्यक्ती ठरलेल्या जिल्ह्यातील चार जणांना स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले. त्यानुसार चारही जणांची वेगवेगळ्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. जामनेर पोलिस ठाण्यात सात गुन्हे दाखल असलेल्या योगेश भरत राजपूत (२९, रा. जामनेर) हा बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करत होता. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईदेखील करण्यात आली. मात्र त्याच्या वर्तवणुकीत सुधारणा न झाल्याने जामनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पाठविला. तसेच पहूर पोलिस ठाण्यात वेगवेगळे १६ गुन्हे दाखल असलेला सुपडू बंडू तडवी (४२, रा. चिलगाव, ता. जामनेर) हादेखील हातभट्टीची दारू विक्री करत होता. त्याच्या…
जळगाव : प्रतिनिधी मेहरुण तलावामध्ये आंघोळीसाठी गेलेल्या शाहू नगर परिसरातील १३ ते १४ वर्षीय चार मुले पाण्यात बुडून गटागंळ्या खाऊ लागले. त्यापैकी तिघांना वाचविण्यात यश आले, मात्र ईशान शेख वसीम (१३, रा. शाहू नगर) या मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, २९ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास मेहरुण तलाव परिसरात घडली. शहरातील शाहू नगर परिसरात राहणारे ईशान शेख, मोईन खान अमीन खान (१३), अयान तस्लीम भिस्ती (१३) व असलम शेख सलाउद्दीन (१३) हे चौघे जण शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास मेहरुण तलाव परिसरात आंघोळीसाठी गेले. चौघेही पाण्यात उतरले व काही वेळातच ते गटांगळ्या खाऊ लागले. हा प्रकार आजूबाजूच्या…
जालना : वृत्तसंस्था मराठा समाजाल आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून आक्रमक आंदोलन करत आहेत. आता २० जानेवारीपासून अंतरवली सराटी येथून मुंबईपर्यंत दिंडी मोर्चा काढून मुंबईत उपोषण करण्याची घोषणा केली आहे. तसेच या आंदोलनासाठी सुमारे ३ कोटी मराठे मुंबईत येतील असा दावाही त्यांनी केला आहे. आंदोलनासाठी मुंबईत येणारे ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न केल्यास आम्ह्ी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोरच आंदोलनास बसू, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. आरक्षणासाठी मराठा समाजाकडून मुंबईत करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत शुक्रवारी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आंदोलनासाठी मुंबईत येणारी वाहने अडवू नयेत, अडवल्यास ती गृहमंत्र्यांच्या दारात उभी करू असा इशारा…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातून गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या परवान्यावरील मालवाहू वाहनांना ‘जीपीएस’ प्रणाली बंधनकारक करण्यात आली आहे. अन्यथा संबंधितांचा वाहन परवाना निलंबन करण्यात येईल किंवा दहा ते तीस हजारांचा दंड करण्याचा निर्णय जिल्हा प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समितीने घेतला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्य गौण खनिजाचे अवैध उत्खनन व अवैध वाहतूक रोखण्यासाठी गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ‘जीपीएस’द्वारे ‘रिअल टाइम मॉनिटरिंग’ प्रणाली बसविण्यासाठी परवानगीची प्रक्रिया ऑनलाइन करणे व ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याबाबत महसूल व वन विभागाने निर्देश दिले आहेत. १ जून २०२२ नंतर गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ‘जीपीएस’ प्रणाली बसविल्याचे…