डिसेंबर २०२३ च्या अंती प्रदर्शित झालेला शाहरुख खानचा चित्रपट डंकी २०२४ मध्ये दिमाखात दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जानेवारीमध्ये चित्रपटाने चांगली कमाई करायला सुरुवात केली आहे. शाहरुखचा हा चित्रपट देशात २०० कोटींचा आकडा गाठण्यासाठी वेगाने पुढे जात असल्याचे चित्र पाहायला मिळतेय. प्रभासचा ‘सालार’ डंकीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरला. सालार २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाल्यापासून बंपर कमाई करत आहे. ‘सालार’च्या तुलनेत डंकीची कमाई संथ होती पण चित्रपटाचे कलेक्शन तितकेसे वाईट नव्हते. पण आता चित्रपटाला नवीन वर्षाचा लाभ मिळ्याल्याचे दिसते. चित्रपटाने वर्षाच्या पहिल्या दिवशी किंवा सोमवार, १ जानेवारी २०२४ रोजी किती कमाई केली ते जाणून घेऊ. हा चित्रपट रिलीज होण्याआधीच…
Author: Kishor Koli
वाई(सातारा) : वृत्तसंस्था नायगाव (ता. खंडाळा) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांंना छगन भुजबळ व रूपालीताई चाकणकर यांनी अभिवादन केल्यानंतर राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) कार्यकर्त्यांनी पुतळ्यास दुग्धाभिषेक केला. महाराष्ट्र सदनात छगन भुजबळ यांनी घोटाळा केला आहे. त्यांचा हात पवित्र स्मृतीस लागला म्हणून राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे औद्योगिक सेलचे अध्यक्ष बंडू ढमाळ व इतर कार्यकर्त्यांनी पुतळ्यास दुग्धाभिषेक केला. यावेळी उपस्थित महिलांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. “जग कुठे चालले आहे आणि तुम्ही कुठे चालला आहात”, असे म्हणून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही बळाचा वापर करून कार्यकर्त्यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक…
जळगाव : प्रतिनिधी दुर्धर आजाराला कंटाळून तांबापूरा येथील एका ४२ वर्षीय प्रौढ व्यक्तीने राहत्या घरामध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना मंगळवारी २ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सतिष बाबुराव ससाणे असे मृत व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सतिष ससाणे हे तांबापुरा येथे पत्नी, दोन मुले आणि मुलगीसह वास्तव्यास होते. मिळले ती हातमजुरी करून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून ते एका दुर्धर आजारापासून त्रस्त होते. मंगळवारी २ जानेवारी रोजी सकाळी पत्नी…
मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारने हिट ॲण्ड रनसंदर्भात पारित केलेल्या नव्या कायद्याविरोधात वाहतूक संघटनांच्यावतीने संप पुकारण्यात आला आहे. मंगळवारी या संपाचा दुसरा दिवस असून याचा परिणाम शाळांच्या बसेसवरही होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये स्कूल बस बंद ठेवण्याचा निर्णय स्कूल बस मालकांच्या संघटनांनी घेतला आहे. यासंदर्भातील बातम्या समोर आल्यानंतर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्कूल बसच्या संघटनांनी या संपात सहभागी होऊ नये असे आवाहन केले आहे तसेच संपात सहभागी झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा थेट इशाराच शिक्षणमंत्र्यांना दिला आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार स्कूल बसच्या चालकांनी संपामध्ये सहभागी होऊ नये. नाहीतर कारवाईचा वेगळा विचार केला जाईल. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा…
मुंबई : प्रतिनिधी जानेवारी महिन्यात ऑपरेशन लोटस होण्याची शक्यता आहे. सगळ्या निवडणुकांच्या आधी हे होईल. काँग्रेसही फुटेल. राम मंदिर सोहळ्यानंतर किंवा आधीही महाराष्ट्रात या घडामोडी घडतील असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की, येणाऱ्या काळात राज्यातील काँग्रेस पक्ष भाजपा फोडेल त्यामुळे विरोधी पक्षच उरणार नाही. त्यामुळे आमच्या सारख्यांनाच विरोधी पक्षाची भूमिका घ्यावी लागेल, लढावे लागेल. जो अमाप भ्रष्टाचार चालला आहे आणि भाजपा भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात ओढून घेतंय ते बघून दु:ख होते. त्यामुळे आम्हाला वेदना होतात. हीच भाजपा भ्रष्टाचाराविरोधात लढायची का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच ज्या लोकांना राजकारणातून उचलून फेकून द्यायला हवे अशा…
मुंबई : प्रतिनिधी एकीकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला लाजिरवाण्या डावात पराभवाला सामोरे जावे लागले, तर दुसरीकडे सोशल मीडियावर चाहत्यांनी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराची खूप आठवण काढली. भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व केलेल्या अजिंक्य रहाणेला एक मोठी जबाबदारी आता मिळाली आहे, रहाणे आता या संघाचे कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. रणजी ट्रॉफी २०२४ साठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने पहिल्या दोन सामन्यांसाठी आपला संघ जाहिर केला आहे. या संघात अनुभवी भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे परंतु स्टार सलामीवीर पृथ्वी शॉ ऑगस्टमध्ये झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीतून सावरण्यात अपयशी ठरला आहे. १५ सदस्यीय संघात मागील हंगामातील बहुतेक खेळाडूंचा समावेश आहे. सरफराज खान, शिवम दुबे,…
मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूक येत्या एप्रिल, मे महिन्यात होणार असल्याने सत्ताधारी आणि विरोधक दोघांची जोरदार तयारी सुरू आहे. दिल्लीत मविआचा अंतिम फॉर्म्युला ठरला,आता उत्सुकता शिक्कामोर्तबाची आहे. गेल्या निवडणुकीत ज्यांनी ज्या जागा लढवल्या आणि उमेदवार निवडून आणले आहेत, ज्या ठिकाणी पराभव झाला पण कमी मतांनी, अशा जागा त्या- त्या पक्षाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यात दिल्लीत नुकतीच महत्त्वाची बैठक झाली होती. विशेष म्हणजे या बैठकीत वंचित आघाडी, राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी पक्ष,आमदार हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी यांना…
कोल्हापूर : वृत्तसंस्था राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर कोणाला आवडणार नाही? एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र आले तर सगळ्यांना आवडेल, अशा शब्दात मनसे-शिवसेना संभाव्य युतीवर आमदार भरत गोगावले यांनी भाष्य केले. त्याचवेळी येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची इच्छा पूर्ण व्हावी, असे देवीकडे साकडे घातल्याचे आमदार गोगावले यांनी सांगितले. शिवसेना नेते आमदार भरतशेठ गोगावले नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कुटुंबियांसह अंबाबाई देवीच्या दर्शनाला कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी अंबाबाई मंदिरातल्या गाभाऱ्यात जाऊन मनोभावे पूजा केली. गोगावले यांच्या हस्ते कुंकुमार्चन विधीही झाला. दर्शनानंतर गोगावले यांनी कोल्हापुरातील पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे-राज ठाकरे एकत्र येणार का? मनसेप्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने चाहत्यांना मोठा धक्का दिला. डेव्हिड वॉर्नरने आता एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या डेव्हिड वॉर्नर पाकिस्तानसोबत खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील संघाचा भाग आहे. ही कसोटी मालिका देखील वॉर्नरच्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतील शेवटची मालिका आहे. यानंतर डेव्हिड वॉर्नर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. याबाबत वॉर्नरने यापूर्वीच सांगितले आहे. वॉर्नरने या टूर्नामेंटमध्ये खेळणार एकदिवसीय आंंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्यासोबतच डेव्हिड वॉर्नरने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये पुनरागमन करण्याचे संकेतही दिले आहेत.निवृत्तीची घोषणा करताना डेव्हिड वॉर्नर म्हणाला की, जर तो चांगले क्रिकेट खेळत राहिला आणि ऑस्ट्रेलियन संघाला…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नवीन वर्षाच्या आधीच नवीन कोरोना व्हेरियंट जे.१ च्या प्रकरणांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. नव्या व्हेरियंटनंतर देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ८२६ नवीन रुग्ण आढळले आहेत. २४ तासात महाराष्ट्रात सर्वाधिक १३४ बाधितांची नोंद झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटकात १३१ रुग्ण आढळले आहेत. बिहार, कर्नाटक आणि केरळमध्ये कोरोनामुळे प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. यासह, कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ४००० च्या वर गेली आहे. रविवारी, देशात कोरोनाची ८२६ नवीन प्रकरणे नोंदली गेली आणि तीन लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी नवीन रुग्ण आढळल्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या ४३०९ झाली आहे.…