जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा तर्फे जळगाव येथील काव्यरत्नवली चौकात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन सभा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला विर सावरकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष दिलीपभाऊ सपकाळे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले . अभिवादन सभेत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवनसंघर्षावर काही प्रासंगिक उदाहरण देऊन प्रकाश टाकला . तद्नंतर छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेश सचिव हरिश्चंद्र सोनवणे यांनीही मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश सोनवणे यांनी , सूत्रसंचालन बापूराव पानपाटिल तर आभार प्रदर्शन कानळद्याचे ग्रामपंचायत सदस्य जगदीश सपकाळे यांनी…
Author: saimat team
भुसावळ, प्रतिनिधी । मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी मध्य रेल्वेच्या 10 कर्मचार्यांना (तीन मुंबई विभागातील, प्रत्येकी दोन नागपूर, पुणे आणि भुसावळ विभागातील आणि एक सोलापूर विभागातील) त्यांच्या सतर्कतेचे कौतुक म्हणून महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार प्रदान केला. डिसेंबर 2021 या महिन्यामध्ये अनुचित घटना टाळण्यासह रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या सतर्क कार्याची दखल घेत सोमवार, 3 जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात आले. पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, प्रशस्तीपत्रक व दोन हजार रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारार्थी कर्मचार्यांमध्ये सोपान पेढेकर (मास्टर क्राफ्ट्समन, कॅरेज आणि वॅगन वर्कशॉप, मुंबई विभाग), एस.के.ताराई (लोको पायलट), सुभाषकुमार यादव (सहाय्यक लोको पायलट, दोघेही…
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील एका भागातील राहणाऱ्या २९ वर्षीय विवाहितेचा अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात राहणाऱ्या २९ वर्षीय महिलेला शितपेय मध्ये गुंगीचे औषध देवून तिचे अपहरण करत हैद्राबाद येथे तिचे लग्न लावण्यासाठी घेवून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एवढेच नाही तर तरुणीला एका घरात दोन दिवस डांबून ठेवले. शहरातील एका भागात राहणारी २९ वर्षीय तरुणीला १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी संशयित आरोपी मोहम्मद आरीफ मोहम्मद अमानुउल्लाह (रा. नंदा नगर, तुकाराम गेट, उत्तरलाला गुडा, सिकंदराबाद, तेलंगाणा) याने तरुणीला तिच्या राहत्या घरात शितपेयातून गुंगीचे औषध देत बेशुध्द केले. त्यानंतर तशाच अवस्थेत तिला कारमध्ये…
जळगाव, प्रतिनिधी । केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात शहरातील विविध गटाकडून सांस्कृतिक नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित स्पर्धक, रसिकांनी भरभरून दाद दिली. नेहरू युवा केंद्र जळगाव आणि मू.जे.महाविद्यालय नृत्यकला विभागाच्या संयुक्त विद्यमाने आणि दिशा समाज प्रबोधन बहुद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य संजयभारंबे होते. व्यासपीठावर के.सी.ई.चे. प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.एल.पी.देशमुख, नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या उपस्थिती दीपप्रज्वलन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या निर्बंधामुळे कार्यक्रमाचे आयोजन छोटेखानीच करण्यात आले होते.…
जळगाव, प्रतिनिधी । जळगावातील एका भागातील तरुणी जात असतांना तिच्या हातातून एका अज्ञात चोरट्यांनी मोबाईल लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील नुतन मराठा महाविद्यालयाजवळ तरूणी मोबाईलवर बोलत असतांना अज्ञात चोरट्यांनी हातातून हिसकावून लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माधुरी धोंडू मिस्तरी वय 25 रा. रेणुका नगर, वरणगाव ता. भुसावळ ह.मु. प्रताप नगर जळगाव या शिक्षण घेत आहे. सोमवार ३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नूतन मराठा महाविद्यालयाजवळ एका ठिकाणी मोबाईलवर बोलत असतांना त्यांच्या पाठीमागून अज्ञात दोन जण येवून त्यांच्या हातातील ७ हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून…
रावेर, तालुका प्रतिनिधी । तालुक्यातील निंभोरा पोलीस स्थानकाच्या हद्दीत अवैध धंदे व धंद वाल्यांनी डोके वर काढले असून सर्वसामान्य व गरीब जनतेच्या संसाराची राख रांगोळी होत असतांना, कायदा सुव्यवस्था सांभाळणारे पोलीस मात्र …अर्थ…पूर्ण व्यवहारात मग्न असल्याचे खुलेआम चित्र दिसत असून त्याबाबत परिसरात चर्चा रंगली आहे.उपविभागीय अधिकारी फैजपूर, अप्पर जिल्हाधिकारी जळगाव व जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव यांनी याबाबत कठोर भूमिका घेत अवैध धंद्यांना वाव देणाऱ्या निंभोरा पोलीस उपनिरीक्षकांवर अंकुश ठेवावा अशी मागणी सर्वसामान्यामधून जोर धरत आहे. निंभोरा पोलीस स्थानकाच्या हद्दीत 29 गावांचा समावेश आहे . त्यात निंभोरा, तांदळवाडी, बलवाडी , शिंगत , विवरे बुद्रुक , विवरे खुर्द,मांगलवाड,खिर्डी यासम मोठ्या गावांचा…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । येथील केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याचे त्यांनी ट्विट करून सांगितले. मला सौम्य लक्षणे दिसत असल्याने कोरणा टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी तात्काळ कोरोना टेस्ट करून घ्यावी असाही सल्ला त्यांनी दिला आहे. आज मंगळवारी सकाळी आठ वाजून अकरा मिनिटांनी त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. अरविंद केजरीवाल होम क्वारंटाईन झाले आहेत दिल्लीचे सीएम केजरीवाल यांनी काल देहरादून मध्ये प्रचाराची रॅली काढली होती.
भुसावळ, प्रतिनिधी । स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या पाऊल वाटा महिलांसाठी खुल्या करून दिल्या नसत्या तर महिला खऱ्या अर्थाने सफल, शक्तिशाली आणि सामर्थ्यशाली बनल्या नसत्या. सावित्रीबाईच्या कार्यकर्तृत्वाचा अभिमान बाळगत महिलांनी सावित्रीबाईंना अंतकरणात जपून ठेवल पाहिजे. असे प्रतिपादन उपप्राचार्य प्रा उत्तम सुरवाडे यांनी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या अभिवादना च्या कार्यक्रमात बोलताना केले. भुसावळ कला विज्ञान आणि , पु.ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात स्टाफ ॲकॅडमी आणि एन.एस.एस अधिक दोन स्तर यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्टाप अकॅडमीच्या चेअरमन प्रा एम आर गुजर, कला शाखेच्या समन्वयक , प्रा स्वाती…
चोपडा, प्रतिनिधी । मनुस्मृतीने स्रियांचा शिक्षणाचा नाकारलेला अधिकार परत मिळवून देण्यासाठी प्राणांतिक प्रयत्न करून ज्यांनी स्त्री शिक्षणाचा ज्योत लावली त्या क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती निमित्त महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला,शास्र व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात चोपडा येथे त्यांना अभिवादन करणाऱ्या कार्यक्रमाचे दि.०३ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा.बी.एस.हळपे यांच्या हस्ते सवित्रीमाईंच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी अनुक्रमे ११ वी कला व वाणिज्य वर्गातील कु.हर्षदा सोनवणे व कु.निकिता पारधी यांनी मराठी व इंग्रजी भाषेतून सवित्रीमाईंच्या जीवनकार्यावर आधारित प्रभावी भाषण दिली. उपप्राचार्य प्रा.बी.एस.हळपे यांनी अध्यक्षयी भाषणातून विद्यार्थ्यांना स्वावलंबी होण्यासाठी मार्गक्रमण करण्याचे आवाहन…
जळगाव, प्रतिनिधी । शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव येथे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी दि. २७ डिसेंबर २०२१ ते दि. १ जानेवारी २०२२ या कालावधीत व्यक्तिमत्व विकास या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनात सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेले कौशल्य आत्मसात करून ध्येय निश्चित केले पाहिजे असे प्रतिपादन संस्थेचे प्राचार्य डॉ. पराग पाटील यांनी केले. व्यक्तिमत्व विकास या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेदरम्यान डॉ. पराग पाटील, प्राचार्य, डॉ. प्रशांत अरगडे, विभागप्रमुख औषधनिर्माणशास्त्र, डॉ. कुलदीप बन्सोड, शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय कराड, डॉ. अमोल लांडगे, प्राचार्य, एसएसबीटी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, जळगाव, डॉ. दादासाहेब करंजुले, शासकीय तंत्रनिकेतन अहमदनगर, भालचंद्र हाबडे, नाशिक, डॉ. विवेक…