जळगाव, प्रतिनिधी । कोरोना महामारीच्या काळात म्युकरमायकोसिस आजाराने देखील ‘एन्ट्री’ मारली होती. एका रुग्णाला म्युकरमायकोसिस झाल्यानंतर अत्यंत कठीण परिस्थिती मधून बाहेर पडून व सहा महिन्यानंतर आज पूर्णपणे बरा झाला. कृतज्ञता म्हणून रुग्णाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची बुधवार दि. ५ जानेवारी रोजी सदिच्छा भेट घेतली. यावेळी “रूग्णालयाच्या वैद्यकीय पथकाचे अविरत सहकार्य लाभले, म्हणून आज मी बरा झालो व माझ्या कुटुंबाला दिलासा मिळाला” अशी भावुक प्रतिक्रिया रुग्णाने व्यक्त केली. घनश्याम उखा कोळी (वय ६५, रा. तऱ्हाडी ता. अमळनेर) असे या रुग्णाचे नाव आहे. जून महिन्यात त्यांना म्युकरमायकोसिस आजाराची लागण झाली. आजाराचे निदान झाल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…
Author: saimat team
मुंबई, – राज्यभरात कोरोनाची प्रकरणं वाढताना दिसतंय. त्यातच दिवसागणिक ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या वाढतेय. अशातच आता कोरोनावर उपचार देणाऱ्या डॉक्टरांनाही संसर्ग होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतंय. मुंबईतील सरकारी रूग्णालयातील निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील सर जे.जे रूग्णालयातील मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. गणेश सोलुंके यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, जे.जे रूग्णालयातील 62 निवासी डॉक्टरांना आता कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना संसर्गाच्या या लाटेमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची संख्या वाढली आहे. कोरोना बाधित डॉक्टरांमध्ये जेजे रुग्णालयातील 62, लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये 50, केईएममध्ये 40 आणि नायर रुग्णालयामधील 40 निवासी डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. संसर्गक्षमता अधिक असल्यामुळे डॉक्टरांना कोरोना झाल्याचं…
जळगाव, प्रतिनिधी । आयुष्यात एखादे ध्येय गाठायचे असेल तर आवडतीचे क्षेत्र निवडा आणि त्याचा सातत्याने पाठलाग करा परंतु ते करत असताना आयुष्यातील आनंदही अनुभवावा, असे मनोगत रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयामधील प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या सर्व विभागाच्या ‘आगाज’ या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या स्वागत समारंभावेळी व्यक्त केले. याप्रसंगी रायसोनी इस्टीट्यूटचे अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, अभियांत्रिकी प्रथमवर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वढोद्कर हे व्यासपीठावर उपस्थित होते. विविध संधी, त्यांची तयारी कशी करावी, कोणत्या गोष्टी आत्मसाद कराव्यात, नियोजन कसे करावे या विषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. डॉ. प्रणव चरखा…
जळगाव प्रतिनिधी – “नायलॉन मांजाची निर्मिती, आयात, विक्री, साठवणूक व वापर करण्यास जळगाव जिल्ह्यात कायमस्वरूपी बंदी घालण्यात आलेली असल्याने या मांजाची खरेदी, विक्री करू नये” अशा आशयाचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. “मकर संक्रांत व इतर सणांच्या वेळेस पंतग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक किंवा इतर कृत्रिम वस्तूपासून बनविलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्या धाग्याची निर्मिती, आयात करणे, विक्री, साठवणूक व वापर करण्यास जळगाव जिल्ह्यात कायमस्वरूपी बंदी घालण्यात आलेली असल्याने या मांजाची खरेदी, विक्री करू नये” अशा आशयाचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.…
जळगाव, प्रतिनिधी । स्वातंत्र्य चौकातून पायी जाणाऱ्या व्यक्तीच्या हातातून पैश्यांची पिशवी लंपास झाल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील स्वातंत्र्य चौकातून पायी जाणाऱ्या व्यक्तीच्या हातातून ८ हजार रूपये ठेवलेली पिशवी अज्ञात तीन जणांनी दुचाकीवरून लांबविली होती. या गुन्ह्यातील एका संशयित आरोपीला जिल्हापेठ पोलीसांनी अटक केली आहे. शेख मेहबुब शेख फैयाज रा. नशिराबाद ता.जि.जळगाव हे सोमवारी ३ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास स्वातंत्र्य चौकातून पायी जात असतांना तीन अज्ञात चोरटे दुचाकीवर ट्रिपल सीट बसून त्यांच्या मागून येवून शेख मेहबुब यांच्या हातातील आठ हजार रूपये ठेवलेली रकमेची पिशवी जबरी हिसकावून लांबविल्याची घटना घडली…
जळगाव, प्रतिनिधी । अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव जिल्ह्यामध्ये अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ‘सिंधूताई सपकाळ’ यांचे मंगळवारी रात्री ८ वाजून १० मिनिटाने ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने हजारो अनाथ बालकांची माय हरपली असल्याकारणाने महाराष्ट्र मध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अभाविप तर्फे जिल्हाभरात माईंना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. जिल्ह्यात जळगाव, महानगरांमध्ये नूतन मराठा महाविद्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच एरंडोल येथील डी.डी.एस.पी महाविद्यालयामध्ये माईंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य तसेच महाविद्यालयीन सर्व विद्यार्थी उपस्थित होते. अमळनेर तालुक्यामध्ये प्रताप महाविद्यालय येथे…
जळगाव, प्रतिनिधी । म्हसावद टायगर ग्रुप हा अनेक वर्षांपासून समाज कार्यात अग्रेसर आहे टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य पै. तानाजी भाऊ जाधव, सागर कांबळे व पैलवान ऋषिकेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक नवीन उपक्रम राबवण्यात आला. म्हसावद टायगर ग्रुप तर्फे अनाथांना वाढत्या थंडी मुळे ब्लँकेट वाटप करण्यात आले वाटप करत असताना गरिबांचे डोळे पाणावले एक हात मदतीचा वाटप करत असताना सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
मुंबई, वृत्तसंस्था । राज्यात करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये आणि परीक्षांच्या बाबतीत मोठा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात घोषणा केली असून राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. तसेच, सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मंगळवारी यासंदर्भात सविस्त बैठक झाल्यानंतर आज उदय सामंत यांनी यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे. “सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, तंत्रनिकेतन, विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांमधली परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विजेची…
जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्हा दिव्यांग सेनेच्या आंदोलनाला अल्पसंख्यांक सेवा संघटनेचे जाहीर पाठींबा दिला आहे. दिव्यांग सेनेने जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव समोर 35 किलो धान्य तात्काळ वाटप करण्यात साठी आंदोलन सुरू केले. या रास्त मागणीला अल्पसंख्यांक सेवा संघटनेने जाहीर पाठिंबा दिला.पाठिंबा देऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त करतांना जहाँगीर ए खान प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्यांक सेवा संघटना, जिल्हा अध्यक्ष अपंग मुंतझिम खान , दीव्यांग सेना राज्य सचिव भरत जाधव,अक्षय महाजन,शकील शेख,हितेश तायडे, भिमराव म्हस्के,तोहसिफ शाह,सादिक पिंजारी,नितीन सूर्यवंशी, धनेश्वर पाटील आदी उपस्थित होते.