Author: saimat team

जळगाव प्रतिनिधी । ३१ वर्षीय तरूणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी ६ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमोल छगन सपकाळे (वय-३१) रा. आव्हाणे ता.जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमोल छगन सपकाळे हा भाऊ रविंद्र आणि आई विजूबाई यांच्यासह वास्तव्याला आहे. हातमजूरी आणि वाहन चालकाचे काम करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करत होता. गुरूवारी ६ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता आईला गावाला जावून येतो असे सांगून घराबाहेर निघाला. अमोल हा गावाला न जाता आव्हाणे शिवारातील रेल्वे खंबा क्रमांक ३००/ ३७ ते ३२६ या दरम्यान धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली.…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालय जळगाव येथे मुख्या. रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 कोटी सूर्यनमस्कार अभियान राबविण्यात आले. आयुष मंत्रालय व पतंजली योग पीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा प्रभारी अध्यक्षा मनीषा पाटील यांनी नेहा जगताप , सीमा पाटील तसेच आपल्या टीमच्या सहकार्याने सुर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांच्या समोर करून दाखविले. विद्यार्थ्यांकडून सदरची प्रात्यक्षिके करून घेतली. विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे महत्त्व समजावत आपण दररोज सूर्यनमस्कार केले पाहिजेत असा सल्लाही यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आला. कार्यक्रमासाठी धनश्री फालक , सूर्यकांत पाटील, योगेश भालेराव यांनी परिश्रम घेतले तर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Read More

धानोरा ता.चोपडा, वार्ताहर । येथे आज गुरुवार रोजी दुपारी १ वाजता धानोरा सह परिसरातील मोजक्या शेतकऱ्यांनी कोरोना नियम पाळत विविध मागण्यांसाठी अंकलेश्वर-बऱ्हामपुर महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. आज रोजी शेतकरी विविध प्रकारचे संकटांनी मेटाकुटीला आला आहे.असंख्य संकटं डोक्यावर असतांना विज वितरण कंपनीकडून मात्र विजकनेक्शन तोडण्याचा सपाटा सुरू आहे.ही विज तोडणी तात्काळ थांबवावी,कांद्याचे झालेल्या नुकसानीची भरपाई देऊन हमी भाव द्यावा,कापसाचा हमीभाव वाढवून दहा हजार मिळावा, केळीला बोर्डाप्रमाणे भाव मिळावा, शेतीसाठी आठ तासांऐवजी किमान १२ तास तरी विजपुरवठा व्हावा.व मिळणाऱ्या विजेप्रमाणेच बिलं आकाराणी करावी अशा विविध मागण्यांसाठी धानोरा येथे अंकलेश्वर-बऱ्हामपुर महामार्गावर असलेल्या जळगाव चौफुलीवर संतोष सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील शेतकऱ्यांनी कोरानाचे सर्व‌ नियम…

Read More

जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथे बाळशास्री जांभेकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला. पहुर पत्रकार संघटना यांच्या वतीने गृप ग्रामपंचायत पहूर पेठ मध्ये बाळशस्री जांभेकर यांच्या प्रतिमांचे पुजन करून पहूर भागातील सर्व पत्रकार बांधवांचे स्वागत करून पत्रकार दिन साजरा केला. त्या नंतर पत्रकार दिना निमित्ताने पहुर नगरीतिल सर्व पत्रकार बांधवांचे पहूर पेठ गृप ग्रामपंचायत,महात्मा फुले शिक्षण संस्था,पहुर पोलिस स्टेशन,भारतमाता पतसंस्था,आर.टि.लेले विद्यालय आणि आरोग्यदूत अरविंद देशमुख या सर्वांच्या वतीने पहूर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविंद्र घोलप,उपअध्यक्ष ,किरण जाधव,सचिव शंकर भामेरे,सदस्य शांताराम लाठे,शरद बेलपत्रे,मनोज जोशी,प्रविण कुमावत,रविंद्र लाठे,गणेश पांढरे,जयंता जोशी,या सर्व पत्रकारांना रूमाल,टोपी,पेन,फुल,डायरी आणि अरविंद देशमुख यांच्या कडून सर्व…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत (नीट-पीजी) ओबीसींना २७ टक्के आणि आर्थिकदृष्टया मागास घटकाला १० टक्के आरक्षण लागू करण्याविरोधातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत (नीट-पीजी) ओबीसींना २७ टक्के आणि आर्थिकदृष्टय़ा मागास घटकाला १० टक्के आरक्षण लागू करण्याविरोधातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे. तसंच आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षणालाही सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दाखवला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने नीट-पीजी समुपदेशन प्रक्रिया रखडली आह़े ही प्रक्रिया लवरकच सुरू होणे महत्वाचे असल्याचे नमूद करत या प्रकरणावर शुक्रवारी निर्णय देण्यात येणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले…

Read More

जळगाव । जिल्ह्यात दिवसभरात ४६ कोरोना बाधित रूग्ण आढळले. तर एक बाधित रूग्ण बरा होऊन घरी परतला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली. जिल्हा कोवीड रूग्णालयाने बुधवारी पाठविलेल्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात दिवसभरात एकुण ४६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहर- १५, भुसावळ-२१, अमळनेर-२, धरणगाव-१, एरंडोल-३, रावेर-१, चाळीसगाव-३ असे एकुण ४६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. दिवसभरातून जिल्ह्यात एक रूग्ण बरा होवून घरी गेला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ९५२ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २३७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आता जिल्ह्यात एकुण १३६ रूग्ण विविध…

Read More

जळगाव । छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल कॉम्प्लेक्सच्या आवारात हत्याराच्या धाकाने विद्यार्थ्यांना धमकावणार्‍या एका तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल कॉम्प्लेक्स परिसरात गुरूवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास एक तरूण अंदाजे (वय २० ते २५ वयोगटातील) हा नशेत असतांना हातात हत्यार घेवून जाणाऱ्या व येणाऱ्या नागरीक व विद्यार्थी, विद्यार्थींनींना पैसे मागवून धमकावत होता. या वेळी काहीनी त्याला हटकले असता त्यांच्यापाठीमागे लागून त्यांना हत्याराचा धाक दाखत होता. काही नागरीकांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हे क्रीडा संकालाजवळ येवून तरूणाला ताब्यात घेतले.

Read More

जळगाव । शहरातील समर्थ कॉलनीतील एका विवाहितेचा दुकानासाठी माहेरुन ५ लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी छळ करणार्‍या पती विरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गायत्री भामरे वय (वय ३३) यांचा पती जितेंद्र अंबादास भामरे (वय ३९, रा. दशरथनगर, जुना खेडी रोड, जळगाव) याने १२ ऑक्टोंबर २०१८ ते ८ नोव्हेंबर २०२१ दरम्यान दुकानासाठी माहेरुन १ लाख रुपये आणावेत म्हणून शिवीगाळ करत शारिरीक व मानसिक छळ केला. तसेच गायत्री यांच्या मुलीलाही शिवीगाळ करत, गायत्री यांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून गायत्री ह्या माहेरी निघून आल्या.या प्रकरणी गायत्री यांनी दिलेल्या तक्रारीवरुन त्यांचे पती जितेंद्र अंबादास भामरे यांच्या विरोधात…

Read More

जळगाव । जामनेर येथील मारहाण करून खून केल्या प्रकरणातील पतीला जिल्हा न्यायालयाने जन्मठेपसह दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल जिल्हा व सत्र यांनी दिला आहे. जामनेर येथील शिक्षक कॉलनीत अनिल चावदस सपकाळे याने त्याची पत्नी मनीषा सपकाळे हिच्या डोक्यावर मारहाण करीत तिला 3 फेब्रुवारी रोजी गंभीर जखमी केले होते. उपचार सुरु असताना तिचा 4 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी मनीषा सपकाळे हिची आई प्रभाबाई निना कोळी यांच्या फिर्यादीवरुन जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. न्या.एस.डी.जगमलानी यांच्या न्यायालयात कामकाज झाले. याप्रकरणी संशयित अनिल सपकाळे यास दोषी धरीत न्यायालयाने त्यास जन्मठेप व 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने…

Read More