Author: saimat team

अडावद ता.चोपडा, प्रतिनिधी । ग्रामीण भागातील अडावद ता.चोपडा येथील “शामराव येसो महाजन विद्यालयात” विद्यार्थ्यांना कोवॅक्सिंन लसीकरणाचा पहिला डोस देऊन प्रारंभ दिनांक- ७ जानेवारी 2022 रोजी करण्यात आला. शासनाने नुकतेच १५ ते १८ वर्षे वयोगटाच्या मुलांना लसीकरण करण्यास अनुमती दिली. चोपडा तालुक्यात ग्रामीण भागात पहिल्यांदाच शामराव येसो महाजन विद्यालयातील विद्यार्थ्यांना लसीकरण करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी ६७ विदयार्थी व विद्यार्थिनींनी याचा लाभ घेतला. सदरचे लसीकरण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विष्णुप्रसाद दायमा,डॉ.अर्चना पाटिल,आरोग्य सहायक -प्रकाश पारधी,आरोग्य सेवक-डॉ.महेंद्र पाटिल, विजय देशमुख, आरोग्य सेविका-निवेदिता शुक्ल, आशा सेविका-शारदा महाजन, हिराबाई माळी यांच्या पथकाने शिबिरासाठी परिश्रम घेतले. प्रसंगी…मुख्याध्यापक-आर.डी.माळी सर, उपशिक्षक-आर.के. पिंपरे…

Read More

जळगाव | जिल्हा महिला असोसिएशनच्या सदस्या व दिलासा व्यसनमुक्ती केंद्राच्या सचिव अंजली पाटील यांची जळगाव महानगरपालिकेच्या गर्भधारणा पूर्व आणि जन्म पूर्व निदान प्रतिबंध कायदा(पीसीपीएनडीटी) सल्लागार समिती वर निवड करण्यात आली आहे. अंजली पाटील या २५ वर्षापासून व्यसनमुक्ती व महिला व बालकल्याणाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. महानगरपालिका आयुक्तांनी अंजली पाटील यांची निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल जिल्हा महिला असोसिएशनच्या वासंती दिघे, दिलासा व्यसनमुक्ती केंद्राचे साहेबराव पाटील, सुधीर वसाने यांनी अभिनंदन केले आहे.

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था I वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत (नीट-पीजी) ओबीसींना 27 टक्के आणि आर्थिकदृष्टय़ा मागास घटकाला 10 टक्के आरक्षण लागू करण्याविरोधातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे. तसेच आर्थिक दुर्बल घटकांसाठी 10 टक्के आरक्षणालाही सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दाखवला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने नीट-पीजी समुपदेशन प्रक्रिया रखडली असल्याने ही प्रक्रिया लवरकच सुरू होणे महत्वाचे असल्याचे नमूद करत या प्रकरणावर आज शुक्रवारी निर्णय देण्यात येणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले होते. त्यानुसार कोर्टाने आज निर्णय दिला आहे. गतवर्षी जून महिन्यात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. त्यावरील सुनावणीदरम्यान सुप्रीम…

Read More

जळगाव : प्रतिनिधी I बालगंधर्व संगीत महोत्सवाचा प्रारंभ गुरुवारी भरतनाट्यम आणि कथ्थक नृत्याच्या जुगलबंदीसह संतूर वादनाने झाला. घुंगरांची झनकार आणि तबल्याच्या तालावर कलावंतांचे पदलालित्य, अदांची जुगलबंदी रंगली होती. देह आणि सूर मिळले अन्‌‍ सायंकाळ जणू नाचू लागली. टाळ्यांच्या कडकडाटाने नाट्यगृह गुंजले. भरतनाट्यम व कथ्थक नृत्याच्या संगमाने मानसी मोदी व मानसी करानी या कलावंतांच्या नृत्य सौंदर्याने प्रेक्षकांचे मन मोहून गेले. पंडित संदीप चॅटर्जी यांच्या संतूर वादनाने संध्याकाळ सूरमयी झाली. जळगावच्या कलावंतांनी शिवतांडव नृत्य सादर केले. महोत्सवाचे उद्घाटन महापौर जयश्री महाजन, आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. विवेकानंद कुलकर्णी, चांदोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक चांदोरकर, दीपिका चांदोरकर, अरविंद देशपांडे उपस्थित…

Read More

जळगाव : प्रतिनिधी I गांधी रिसर्च फाउंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे लोकसहभागातुन शहरात कॉलनी परिसरातील खुल्या भुखंडांवर वृक्षारोपण उपक्रम सुरु आहे. रविवारी सकाळी 1030ः वाजता रामेश्‍वर कॉलनीतील हनुमान मंदिर,नवीन पाण्याच्या टाकीजवळ वृक्षरोपण केले जाणार आहे. संपुर्ण शहरभर हा उपक्रम राबवला जाणार असुन इच्छुक व्यक्ती, संस्था, महिला बचत गट, मंडळ यांनी गांधी रिसर्च फाउंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांच्याशी मराठी प्रतिष्ठान, 4 मुळे कॉम्प्लेक्स, गणपतीनगर, जळगाव व कांताई सभागृह, जुनी नटराज टॉकीज नवीन बसस्थानकाशेजारी जळगाव येथे संपर्क साधावा.

Read More

धरणगाव, जिल्हा प्रतिनिधी I पत्रकार दिनानिमित्त धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाच्या वतीने येथील शासकिय विश्राम गृहात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी पहिले मराठी वृत्तपत्रकार व दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व माल्यार्पण केले. यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष ॲड.वसंतराव भोलाणे, शहराध्यक्ष लक्ष्मण माळी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर आधारीत मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे सदस्य ॲड.वसंतराव भोलाने, लक्ष्मण माळी, कडू महाजन, धर्मराज मोरे, भगीरथ माळी, बी.आर.महाजन, जितेंद्र महाजन, आर.डी.महाजन, अविनाश बाविस्कर, बाळासाहेब प्रभूदास जाधव, सतीश शिंदे, विनोद रोकडे, योगेश पाटील, दिनेश पाटील, धनराज पाटील, लक्षमण पाटील, पी.डी. पाटील, राजेंद्र वाघ आदी उपस्थित होते.

Read More

जळगाव : प्रतिनिधी I स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपुर व वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 9 खुल्या राष्ट्रीय रांगोळी स्पर्धा 9 जानेवारी रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत बालगंधर्व खुले नाट्यगृहात आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना राष्ट्रीयस्तरावर सुमारे 6 लाख रुपयांपर्यतची बक्षिसे दिली जाणार असुन, प्रत्येक स्पर्धकास संस्कृती मंत्रालयातर्फे सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. प्रत्येक स्पर्धकास ऑनलाईन नोंदणी आवश्‍यक आहे. यासाठी स्वतः चा मोबाईल सोबत आणावा लागेल. इतर तांत्रिक मदत प्रतिष्ठानकडुन मिळेल. नोंदणी झाल्यावर तीन तासांत रांगोळी (ठिपक्या ठिपक्यांची, संस्कार भरती प्रमाणे, पोट्रेट, गालिचा) पुर्ण करुन रांगोळी काढतानाचा फोटो काढायचा आहे. रांगोळी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी I सण, उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून दोन ते तीन गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक किंवा हद्दपारीची कारवाई पोलिसांकडून केली जाते. पण, माहिती अधिकारक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्यावर शहरासह राज्यात 10 गुन्हे दाखल असतांना सुध्दा त्यांना पोलिस सरंक्षण दिले जाते आहे. हे पोलिस सरंक्षण काढून दिपककुमार गुप्ता यांना सुध्दा दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावे, अशी मागणी आरपीआयचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदमध्ये केली. दीपककुमार गुप्ता यांना मिळालेले पोलिस सरंक्षण काढून त्यांना दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात यावे, या मागणीसाठी आरपीआयतर्फे शुक्रवार दि.7 रोजी दुपारी 12 वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार आहे.…

Read More

फैजपूर ता.यावल, प्रतिनिधी I मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व मराठी पत्रकार दिनानिमित्त फैजपूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात घेण्यात आलेल्या या बैठकीत फैजपूर शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सलीम पिंजारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते शहराध्यक्ष प्रा.उमाकांत पाटील यांनी सलीम पिंजारी यांची निवड झाल्याचे जाहीर केले. उर्वरित कार्यकारणीत उपाध्यक्ष पदी मयूर मेढे, कार्याध्यक्ष वासुदेव सरोदे, योगेश सोनवणे, सचिव संजय सराफ तसेच ज्येष्ठ पत्रकार अरुण होले खजिनदार तसेच प्रा. राजेंद्र तायडे शाकीर मलिक, ईदु पिंजारी, जावेद काझी, कामिल शेख, राजू तडवी निलेश पाटील पुढील प्रमाणे कार्यकारिणी सदस्य आहे. यावेळी प्रा. उमाकांत पाटील यांनी आद्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी I महापालिकेच्या नगररचना विभागातील गैरकारभाराबाबत आरोप केल्यानंतर महापालिका आयुक्तांनी नगररचना विभागात सर्व पारदर्शक कारभार सुरु असल्याचे सांगितले होते. मात्र, नगररचना विभागात मोठ्या प्रमाणात दलाली सुरु आहे का नाही. याबाबतची सर्व चौकशी करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी समिती गठीत करून दुध का दुध पाणी का पानी करावे असे आव्हान शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे. समिती गठीत करण्याच्या मागणीसाठी प्रशांत नाईक यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका प्रशासनाकडे आतापर्यंत माहितीच्या अधिकाराखाली अनेकळवेळा पत्रव्यवहार करून मनपा नगररचना विभागातील किती फाईली प्रलंबित आहेत. तसेच लोकशाही दिनातील याबाबत प्रशासनाने उत्तर दिलेले नाही. तसेच या प्रकरणी केलेल्या आरोपात…

Read More