Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । भाजप नेते गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी खबरदारी म्हणून कोरोना प्रतिबंधक चाचणी करून घ्यावी असे आवाहन आमदार गिरीश महाजन यांनी केले आहे. दरम्यान, काल गिरीश महाजन यांनी पक्षांची बैठक घेतली. यावेळी खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. भाजप नेते गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर महाजन हे पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. गिरीश महाजन हे गेल्या दोन दिवसांपासून विविध विकास कामांच्या बाबत मतदारसंघात दौरे करत आहेत. तसेच शनिवार दि. ८ जानेवारी रोजी त्यांच्या हस्ते तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन होणार होते. याबाबत…

Read More

जळगाव, प्रतिनिधी। स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने 20 व्या अर्थात द्विदशकपूर्ती बालगंधर्व महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मुंबई येथील श्रीरंग भावे, धनंजय म्हसकर, वेदश्री ओक यांच्या मर्म बंधातली ठेव ही… या नाट्यसंगीताच्या मैफलीने जळगावकर रसिकांच्या हृदयात आनंदोत्सव जागवला. नाट्यसंगीताच्या कलाकृतीच्या सादरीकरणाने बालगंधर्व महोत्सवाची उंची वेगळ्या उंचीवर गेली. बालगंधर्वच्या दुसऱ्या दिवसाच्या नाट्यसंगीत मैफलीला पंचतुंड नररूंडमालधर, शाकुंतल या संगीत नाटकातील नांदी आजच्या कार्यक्रमाची बहारदार सुरवात झाली. या कार्यक्रमाचे निरूपन सुसंवादिका दिप्ती भागवत यांनी केले. मराठी रंगभुमी ही चिरंजव असून याला वैभवशाली इतिहास आहे. ही रंगभूमी भविष्यातही रसिकांचे मनोरंजन करत राहिल. अशा शब्दात रंगभुमीची आत्मकथा दिप्ती भागवत हिने ऐतिहासिक संदर्भासह सादर केली. यानंतर नाट्य संगिताच्या…

Read More

जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा येथील युवासेना शाखा प्रमुख विनोद जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त फ्रेश सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे शिवसेना विभाग प्रमुख नागेश्वर पाटील युवा सेनेचे कार्तिक काळे अक्षय पाटील युवा सेना मिडीया सेल प्रमुख मुकेश जाधव सागर बेलेकर सरपंच तुळशीराम वाघ रोजगार हमी चे सदस्य अरुण सावकारे हरिभक्त पारायण कन्हैयालाल महाराज हरिभक्त पारायण देवराज महाराज आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात हिवरखेडा तवा चिंचखेडा तवा तसेच वाकोद येथील रवींद्र जोशी भैय्या जोशी सुरेश जोशी परशुराम पारधी या तरुणांनी…

Read More

‘लसीकरणाशिवाय पर्याय नाही. राज्याची तिसऱ्या लाटेकडे वाटचाल होत असून, तिसऱ्या लाटेला थोपवयाचे असेल; तर लस हाच एकमेव पर्याय आहे. यापुढे नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाईल. गर्दी टाळण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाला वेळप्रसंगी गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात,’ अशा स्पष्ट इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिला. राज्यात मुंबई, ठाणे आणि पुणे या तीन प्रमुख शहरांत करोनाचा प्रादुर्भाव तुलनेने अधिक आहे. शिवाय ही शहरे आणि त्यांच्या परिसरात होत असलेला ओमायक्रॉन आणि करोनाचा प्रसार पाहता, त्या ठिकाणच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि, राज्यातील इतर भागांमध्ये तशी परिस्थिती नाही. अन्य भागांत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. पण, रुग्णसंख्येत…

Read More

चाळीसगाव | चाळीसगावाहून वेगाने जाणाऱ्या मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना शहरातील ओझर ते पातोंडा रस्त्यावर घडली आहे. याबाबत अज्ञात चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. चाळीसगावाहून भडगावकडे वेगाने जाणाऱ्या छोटा हत्ती या मालवाहू गाडीच्या (क्र. एम.एच.१९ सीवाय ५८२५) धडकेत दुचाकी (क्र.एम.एच.१९ सीएस ४३५६ ) स्वार जागीच ठार झाल्याची घटना काल सायंकाळी ६:४५ वाजताच्या सुमारास शहरातील ओझर ते पातोंडा रस्त्यावर घडली आहे. या अपघातात पितांबर आनंदा पाटील (वय-६३, रा. बोरखेडा, ता. चाळीसगाव) याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अनिल दयाराम…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । लोकशाही मराठी पत्रकार संघ जळगाव तालुका संपर्क प्रमुखपदी अशोक पाटील यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हामध्ये सुध्दा लोकशाही मराठी पत्रकार संघ मजबूत होत असुन काही नियुक्त्या पत्रकार दिनानिमित्त करण्यात आल्या. लोकशाही मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन बोंबले राज्य उपाध्यक्ष अमोल जी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लोकशाही मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष व लोकशाही मराठी पत्रकार संघाचे महासचिव जिशान आफताब यांच्या आदेशानुसार काही पत्रकारांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यावेळी जळगांव तालुकातील शिरसोली येथील आवाज टिव्ही न्युज चॅनल प्रतिनिधी अशोक पाटील यांची नियुक्ती जळगांव तालुका संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली

Read More

जळगाव । माहेरून पैसे आणावे, म्हणून नेहरूनगरातील माहेरवासिनीचा छळ झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयश्री नीलेश मोरे (वय-२९) यांचा विवाह नीलेश सुधाकर मोरे (रा. मुंबई) याच्याशी झाला. काही दिवसानंतर पती नीलेश मोरे याने पैश्यांची मागणी केली. त्यासाठी विवाहितेला शारीरिक व मानसिक छळ केला. विवाहितेला सासू, जेठ व जेठाणी यांनी २४ ऑक्टोबर २०२१ रोजी घरातून हाकलून दिले. याबाबत विवाहितेने एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यावरून विवाहितेचा पती निलेश सुधाकर मोरे, सासू आशा सुधाकर मोरे, जेठ प्रशांत सुधाकर मोरे, जेठाणी काजल प्रशांत मोरे (सर्व रा. मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोहेकॉ अल्ताफ…

Read More

भुसावळ प्रतिनिधी | भुसावळ ते देवळालीच्या दरम्यान मेमू रेल्वे सुरू होण्याची शक्यता असतांनाच आता याच प्रकारातील रेल्वे गाडी भुसावळ ते इगतपुरीच्या दरम्यान धावणार आहे. मध्यंतरी कोरोनाचा प्रकोप कमी झाल्याने बर्‍याचशा रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या असल्या तरी मात्र भुसावळ ते देवळाली पॅसेंजर सुरू न करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी होती. भुसावळ-देवळाली शटल सुरू करण्याऐवजी आता रेल्वे प्रशासनाकडून भुसावळ-इगतपुरी मेमू गाडी १० जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या गाडीला मेल, एक्स्प्रेस या गाडीचे तिकीट दर आकारले जाणार आहे. भुसावळ- इगतपुरी मेमू गाडी ही भुसावळ जंक्शनवरून सकाळी सातला सुटून इगतपुरीला दुपारी तीनला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ही गाडी इगतपुरी येथून…

Read More

चोपडा, प्रतिनिधी ।  येथील नगर परिषद रुग्णालय व महिला मंडळ माध्यमिक विद्यालय यांच्या सहयोगाने १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरण मोहिमेत विद्यालयातील इयत्ता नववी व दहावीच्या २२२ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. या विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस यशस्वीरित्या देण्यात आला. यावेळी योग्य ती काळजी घेत व विद्यार्थ्यांचे लस दिल्यानंतर काही काळ निरीक्षण करण्यात आल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. शहरातील शालेय विद्यार्थ्यांच्या लसीकरण मोहिमेची सुरुवात महिला मंडळ माध्यमिक विद्यालयापासून करण्यात आली. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता, भीती असे संमिश्र वातावरण होते. आपण ‘लसवंत’ झाल्याचे समाधान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. प्रारंभी विद्यार्थ्यांना लसीकरणाविषयी माहिती देण्यात आली. नगर परिषद रुग्णालयातील अधीपरिचारक सचिन शिंदे,…

Read More

चोपडा, प्रतिनिधी । रोटरी क्लब ऑफ चोपडाच्या वतीने शहरातील पंकज विद्यालय येथे १ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान मोफत योग व प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या योग व प्राणायाम शिबिराचा समारोप ७ जानेवारी रोजी सकाळी ७:०० वाजता यशस्वीरीत्या करण्यात आला .शिबिरात सहभागी झालेल्या साधकांना पूरक व्यायामाबरोबरच विविध प्रकारची योगासने शिकवण्यात आली तसेच प्राणायामाचे प्रकार देखील सादर करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले प्रास्ताविकात म्हणाले ,योगामुळे अनेक व्याधी दूर होत असल्याचे शास्त्राने सिद्ध केले आहे. नियमित योगासने केल्याने मन प्रसन्न व उत्साही राहते .शरीर व मनाची कार्यक्षमता वाढते. अतिरिक्त वजन कमी होते .वजन कमी असल्यास वाढण्यास…

Read More